अत्यंत हुशार व बुद्धिमान लोकांची 10 लक्षणे।।।। जर तुमच्यातही ही लक्षणे असतील तर तुम्ही सुद्धा बुद्धिमान व्यक्ती आहात।।।।

अत्यंत हुशार व बुद्धिमान लोकांची 10 लक्षणे।।।। जर तुमच्यातही ही लक्षणे असतील तर तुम्ही सुद्धा बुद्धिमान व्यक्ती आहात।।।।

अत्यंत हुशार व बुद्धिमान लोक हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात मान, प्रतिष्ठा व पैसा मिळवितात , अशाप्रकारच्या खूप लोकांवर अभ्यास केल्यानंतर याप्रकारच्या लोकांची 10 सामान्य लक्षणे आढळून आली। ती खालीलप्रमाणे।।

1   जास्तीत जास्त बुद्धिमान लोकं ही डावखुरी असतात,  त्यांना डाव्या हाताने काम करणे, खेळणे , लिहिणे इत्यादी गोष्टींची सवय असते ।

2    हे लोक स्वभावाने आळशी असतात, व यांना सकाळी जास्त वेळ झोपायला आवडते,  म्हणजे जास्तीत जास्तं बुद्धिमान व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतात। पण हे लोक रात्री उशीरापर्यंत काम ही करतात हे ही विसरून चालणार नाही।

3    बुद्धिमान लोकं स्वतः खूप नीटनेटकं राहणे पसंत करतात पण त्यांच्या आजूबाजूच्या वस्तू नेहमी अस्ताव्यस्त असतात,  जसे की त्यांची खोली, पुस्तकांचा पसारा,  इकडेतिकडे पसरलेले कपडे इत्यादी।

4  या लोकांना राग लवकर येतो व चिडचिड करण्याची सवय असते  पण जेवढ्या लवकर राग येतो,  तेवढ्याच वेगाने परतही जातो।  तसेच हे लोक उत्तम हास्यविनोद करतात। दुसर्‍यांची गंमत करणे व हसणे व लोकांना हसविणे यांना आवडते।

5  लोकांची मदत करायला हे लोक मागेपुढे बघत नाहीत,   यांचे मन खुप मोठे असते व खर्च करायलाही असे लोक घाबरत नाहीत,  म्हणजेच बुद्धिमान लोक जास्त खर्चिक असतात ।

6  या लोकांचे घरच्या मंडळी शी जास्त जमत नाही किंवा मतभेद होतात कारण असे लोक समाजाचा व लोकांचा विचार पहिले करतात।

7  जास्तीत जास्तं बुद्धिमान लोक प्रेमविवाह करतात कारण ते प्रेमाबद्दल खुप संवेदनशील असतात,  जर प्रेमभंग झाला तर असे लोक आयुष्यभर अविवाहित राहतात,   बुद्धिमान लोकांच्या पत्नी अतिशय शांत व मृदु स्वभावाच्या असतात कारण असे लोक जास्त बोलके असल्याने त्यांना सतत कोणीतरी ऐकणारे लागते , म्हणून ते नेहमी स्वभावाने शांत मुलीच्याच प्रेमात पडत असतात व लग्न करताना किंवा प्रेम करताना हे लोक सौंदर्य किंवा पैशाकडे बघत नाहीत।

8  लग्न समारंभ, कार्यक्रम अश्या गर्दीच्या ठिकाणी जाणे असे लोक नेहमी टाळतात कारण त्यांना जास्त लोकांत मिसळणे आवडत नाही,  अशा लोकांचे  मित्र फार कमी असतात पण जिवलग असतात,  मित्रांसाठी हे लोक काहीपण करू शकतात।

9  सार्वजनिक ठिकाणी अश्या लोकांचे विवाद होऊ शकतात कारण असे लोकं कोणत्याही चुकीच्या गोष्टी खपवुन घेत नाहीत।  असे लोकं प्रभावशाली असतात, समोरच्या व्यक्तीवर एका क्षणांत प्रभाव पाडण्याची कला त्यांना अवगत असते।

10  बुद्धिमान लोक खेळ खेळण्यातही अग्रेसर असतात,  असे लोक नोकरीत जास्त काळ टिकत नाहीत,  टिकले तरी त्यांच्या सतत बदल्या होत असतात।   अशा लोकांचे शत्रूही त्यांचा आदर करतात,  तसेच बुद्धिमान लोक हे स्वभावाने निडर असतात, ते कोणालाही भित नाहीत कारण ते चुकीची कामे करीत नाहीत।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: