क्रिकेटचा थरार – भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा t20 सामना 29 जानेवारी 2020

क्रिकेटचा थरार

आपल्या देशात नेहमीच क्रिकेटला डोक्यावर घेतले जाते व भारतात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा चाहतावर्ग ही आहे, त्यामुळे एक थरारक क्रिकेट चा सामना बघणे ही क्रिकेट रसिकांसाठी जणू काही पर्वणीच असते। काल असचं काही घडलं न्यूझीलंड मध्ये।

भारत विरुद्ध न्यूझीलंड 29 जानेवारी 2020 

3 रा  T20   सामना 

भारताने न्यूझीलंडला 179 चं आव्हान 20 ओवर मध्ये दिलं,  व न्यूझीलंड चा संघ ते आव्हान घेऊन मैदानात उतरला व त्यांनी चांगली फलंदाजी केली,  काही वेळासाठी असं वाटू लागलं की कदाचित भारत हा सामना गमावितो कि काय?  पण कर्णधार विराट कोहलीने शेवटचा ओवर हा मोहम्मद शमी ला दिला व या ओवर ने सामना न्यूझीलंडच्या हातातून सोडवून आणला,  ज्याप्रमाणे एखाद्या चा तोंडातला घास हिसकावला जातो ना अगदी त्याप्रमाणे।

20 व्या षटकात न्यूझीलंडला 9 धावा हव्या होत्या व पहिल्याचं चेंडूत राँस टेलरने एक उत्तुंग षटकार शमीला हाणला व त्यांना उरलेल्या 5 चेंडूत फक्त 3 धावांची आवश्यकता होती।

नंतरच्या चेंडूत टेलरने एक धाव घेतली  व सामना 4 चेंडू व 2 रन अश्या स्थितीत आला।

व 95 धडाकेबाज धावा करणारा केन विलियम्सन स्टाइकवर आला।     शमीचा तिसरा चेंडू उसळी घेत केन च्या बँट ला लागून सरळ कीपर राहूलच्या दिशेने गेला व राहुल ने ही अत्यंत सुंदर अशा झेल घेतला व विलियम्सन माघारी तंबूत परतला।

नंतर मैदानावर साइफर्ट आला आता पाहिजे होते 3 बाँल व 2 रन।

शमीने 4 था चेंडू  डॉट काढला,  तेव्हा वाटलं की वा रे वा।

नंतर 5 वा चेंडू ही बँट ला लागला नाही व नवीन आलेला साइफर्ट चं स्ट्राइक वर होता पण त्याने त्याच क्षणी चेंडू हुकला तरी एक धाव धावून घेतली व सामना टाय झाला।

आता स्थिती होती 1 चेंडू आणि 1 रन ।

सर्वांच्या हृदयाचे ठोके वेगाने ठकठक करत होते कि आता शेवटच्या क्षणी काय होणार म्हणून। कारण आता टेलर आता स्ट्राइक वर आला होता ज्याने पहिल्या च चेंडूत षटकार मारलेला होता।

आणि शमीने शेवट अचुक वेगवान यार्कर फेकला व तो चेंडू टेलरचा बँटला किंचित लागून स्टंप ला जाऊन लागला व सामना टाय झाला।

सामना टाय झाल्यामुळे नियमानुसार सुपर ओवर खेळवण्यात आला।

सुपर ओवर

सामन्यात परत आणणाऱ्या शमीला विराट सुपर ओवर देईल असे वाटत असतानाच त्याने बाँल बुमराह कडे सोपवला व आज बुमराह ची न्यूझीलंड फलंदाजांनी चांगलीच धुलाई केल्यामुळे कर्णधार विराट चा हा निर्णय चुकतो कि काय? असे वाटु लागले।

सुपर ओवर साठी फार्मात असलेला केन विलियम्सन व मार्टिन गप्टील फलंदाजी साठी आले।

पहिला बाँल –  केन ने एक रन घेतला।

दुसरा बाँल –  गप्टील ने एक रन।

तिसरा बाँल –  बुमराह च्या आँफ साइड चेंडूवर आँफ कडे निघुन केन ने तो बाँल लेग साइड कडे खेचत बुमराह च्या गती वापरत षटकार खेचला। 

चौथा बाँल –  यार्कर टाकण्याच्या नादात तो लोवर फुलटाज बाँल झाला व केनने तो ही चेंडू ड्राइव्ह करत बाँलर च्या मागे आँफ साइड ला चौकार हाणला।

नंतर पाचवा बाँल –  बुमराहने चतुराई ने फेकला तर त्यावर एक सिंगल घेण्यात केन ला यश आले।
असे करत 5 चेंडूत न्यूझीलंड चे 13 रन आले ।

आता शेवटच्या बाँल साठी स्ट्राइक गप्टील कडे आली।

त्यानेही बाँलरच्या मागे लेग साइडला एक जबरदस्त चौकार ठोकून सुपर ओवर समाप्त केला।

आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 18 रन एका ओवरमध्ये लागणार होते कारण न्युझीलंडने 17 धावा केल्या होत्या।

नंतर भारताकडून बॅटिंग साठी आले हिटमँन रोहित आणि के एल राहुल।

आणि गोलंदाज होता न्यूझीलंडचा अव्वल गोलंदाज टीम साउदी।

पहिला चेंडू  –   रोहित ने खूप जोराने मारला पण बँटवर व्यवस्थित आला नाही व रोहित व राहुल ने 2 धावा घेतल्या, यावेळी रोहित रन आऊट होता होता वाचला।

दुसरा चेंडू –    रोहित ने परत जोरात मारण्याचा प्रयत्न केला पण 1 रन मिळाला।

तिसरा चेंडू –  के एल राहुल ने अत्यंत हुशारीने आँफ साइड चा चेंडू लेग साइड गँप मध्ये खेचत चौकार हाणला। 

व भारताचे 3 चेंडूत 7 रन झाले।

व अजुन भारताला 11 धावांची गरज फक्त 3 चेंडूत होती।

चौथा बाँल –  राहुल ने एक धाव घेतली।

4 बाँल मध्ये 8 रन होते तेव्हा असे वाटतं होते की कदाचित हा सामना भारताने गमावला,  कारण 2 चेंडूत 10 धावा निघणे अशक्य वाटतं होते।  पण क्रीज वर होता मुंबईचा राजा हिटमँन शर्मा।

5 वा बाँल – रोहित ने साउदी च्या बाँलवर एक उत्तुंग षटकार मारला व भारतीय फँन्स नाचू लागले व आपण अजूनही सामना जिंकू शकतो ही आशा पल्लवित झाली।

नंतर शेवटच्या बाँलवर 4 रन हवे होते।

तेव्हा परत साउदीने स्टंपवर बाँल फेकला व रोहितने परत एकदा बाँलरच्या मागे आँफ साइडने जोरदार षटकार हाणला व भारत हा सामना जिंकला।  सगळीकडे जल्लोष सुरू झाला। 

कँप्टन विराट आणि कंपनी रोहितला आलिंगन देण्यासाठी मैदानावर धावत आले।  व स्वभावाने शांत दिसणारा रोहित गोलंदाजांसाठी किती मोठा कर्दनकाळ आहे हे परत त्याने दाखवून दिले।

रोहितला त्याच्या कामगिरीसाठी मँन आँफ द मँच तर मोहम्मद शमी ला गेम चेंजर आँफ द मँच हा पुरस्कार मिळाला।

थोडक्यात काय तर शमीने सामना वाचविला आणि रोहितने जिंकविला।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: