त्याच्या त्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मला घायाळ केले ….

त्याच्या त्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मला घायाळ केले ….

हेलो मित्रांनो माझं नाव सांगत नाही मात्र एक माझ्या आयुष्यातली सुंदर गोष्ट मात्र सांगते।

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या Bsc च्या अंतिम वर्षाला शिकत होते , माझे वय तेव्हा 21 वर्षे होते।

मला कोणीतरी बॉयफ्रेंड वगैरे ठेवावा असं सतत वाटायचं कारण माझ्या सर्व मैत्रिणींचे बॉयफ्रेंड होते म्हणून मला नेहमी ग्रुप मध्ये कमीपणा वाटायचा पण घरचे वातावरण हे अतिशय कडक असल्यामुळे मला भिती वाटायची , तसेच माझ्या वडीलांची अतिशय मान व प्रतिष्ठा होती त्यामुळे बाहेर कुणाला माहीत झाले तर घरच्यांची बदनामी होईल म्हणून मी जास्त मुलांशी बोलणे टाळायची। शिवाय कॉलेज ची मुलं मला टपोरी वाटायची, मला एक साधा, सरळ मुलगा  हवा होता।


तसेच मला मुलं तर भरपूर प्रपोज मारायची पण ती सगळी ओळखीतली होती,   मला  बॉयफ्रेंड तर हवा होता पण जो माझ्या घरच्यांना ओळखणार नाही असा ।


तर एके दिवशी हाच विचार करताना आमच्या बाजूला एक शिक्षक राहतात,  त्यांच्याकडे एक मुलगा किरायाने राहायला आला,  तो दिसायला देखणा होता व राहायलाही माँडर्न होता आणि त्याच्या पेहरावा वरून तो टपोरीही वाटत नव्हता।  


मी सुरूवातीला त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही कारण मला घराजवळ असे काही करायचे नव्हते,  नंतर एक दिवस मी काँलेज मध्ये दुपारी 3 ला परत आली तर तो कुठेतरी जात होता तर आमचा आमनासामना झाला पण त्याने माझ्याकडे ढुंकूनही बघितले नाही। मला याचे खूप वाईट वाटले।


मी जरी थोडी शरीराने लठ्ठ असली तरी दिसायला चांगली आहे, म्हणजे निदान जवळुन जाणारे मुलं माझ्याकडे आवर्जून बघायचे पण हा कसा मुलगा आहे,  ज्यानी माझ्याकडे बघितले सुद्धा नाही  या गोष्टीने मला खुप मोठा अपमान झाल्यासारखे वाटले।


नंतर त्याच्याकडे लक्ष ठेवण्यास सुरूवात केली तर त्याच्या पेहरावावरून तो एखाद्या आफिस मध्ये काम करतो असे वाटायचे,  कारण त्याचे वय कमी असले तरी तो कॉलेज स्टुडंट नक्कीच नव्हता व ही माझी शंका खरीच निघाली।


नंतर तो जेव्हा सकाळी गॅलरीमध्ये ब्रश करायचा तेव्हा मी कॉलेजला जायची तेव्हा आमची नजरानजर व्हायची, मला त्याच्या अँटिट्युड चा राग तर यायचा पण रोज जणूकाही सकाळी मी याचकरिता सजायला लागली होती कि त्याने मला बघावे म्हणून।


जवळपास 3 महिने एकमेकांना बघण्यातचं गेली, तो मला मनापासून आवडायला लागला होता,  त्याच्यावर एवढा जीव जडला होता की मी त्याच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करायला तयार होते पण त्याच्या मनात काय चालू आहे ते मला अजिबात माहिती नव्हते।


असाचं एक दिवस उजाडला मी नेहमी प्रमाणे कॉलेज ला जाण्यासाठी गाडी काढली पण तो आज गॅलरीत ब्रश करताना दिसत नव्हता , मला त्याला बघायचे होते म्हणून जवळपास 2 ते 3 वेळा घरातून काही विसरल्याचे नाटक करीत मी आतबाहेर केले। मग शेवटी तो बाहेर आला , माझी नजर त्याच्या गॅलरीकडेच होती , तेव्हा त्याला बघुन चेहरा खुपच खुलला व स्मितहास्य करित मी हिंमत करत सांकेतिक खुण करून मी त्याला कशी दिसते असं विचारलं?  ( माझ्या चेहर्‍यावर गोल हात फिरवून)

तर त्यानेही हाताची तरजणी अंगठ्याला गोल केली व तीन बोटे वरती केली व सुंदर दिसतेस अशी काँम्लीमेंट मला दिली,  नंतर मी हसतं हसतं  काँलेजला गेली,  त्यादिवशी माझा आनंद गगनात मावेनासा झाला । तो अनुभव अत्यंत सुखद होता।

नंतर काही दिवसांनी अचानक मी माझ्या मोपेडच्या समोरच्या कप्प्यामधून पेन काढत असताना (माझे एक्स्ट्रा पेन, पेंसिल मी त्या कप्प्यात ठेवायची कारण कधी विसरला तर तो कामी पडायचा) मला एक कागद दिसला, त्यावर काहितरी लिहिले होते, कदाचित तो कागद, कागद कसला फोल्ड करून ठेवलेली जणू चिट्ठीचं ती ,खुप दिवसापासून ठेवलेला असावा कारण मी खूप दिवस तो गाडीचा कप्पा चेक केला नव्हता।


त्यानेच माझ्यासाठी प्रेमपत्र लिहिलेले असेल या खुशीने मी ते दिवसभर उघडून बघितलेचं नाही, मग 3 वाजता घरी आल्यावर देवाला नमस्कार करून,  माझ्या खोलीत निवांत बसली व ती चिठ्ठी उघडली तर त्यात काही इंग्रजी लेटर लिहिले होते व माझा चेहरा पडला।

मला चुकीचा भ्रम झाला होता असे मानुन, नंतर त्याच्याकडे पाहणे मी सोडून दिले व अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली।

या गोष्टीला एक महिना झाला,
एकदिवस अचानक रात्री 11 वाजता अभ्यास करताना तीच चिठ्ठी  माझ्या एका नोट्समध्ये दिसली तर मी असाच एक टाइमपास म्हणून त्याकडे बघु लागली व हे स्वप्न पाहू लागली कि कदाचित ते माझं प्रेमपत्र चं आहे।  व बघता बघता एक चमत्कार घडला।  


त्या कागदावर काही इंग्रजी लेटर्स लिहिलेले होते,  ते याप्रमाणे

nineseventhree………….  असे तर त्यामध्ये स्पेस ही दिलेला नव्हता पण अचानक माझ्या लक्षात आले की ते सर्व लेटर हे नंबर चे स्पेलिंग आहेत, मग मी ते स्पेलिंग नुसार नंबर लिहिण्यास सुरूवात केली तर एक 10 अंकी मोबाईल नंबर तयार झाला होता    व मी लगेच क्षणाचाही विलंब न करता त्या नंबर वर काँल केला। तर तिकडून एका मुलाचा हँलो म्हणून आवाज आला,  मी त्याला आपण कोण व आपला नंबर माझ्या गाडीत कसा?  असे विचारताच त्याने मला बाहेर गँलरीत बोलविले व स्वतः बाहेर येऊन हात दाखवू लागला।  मला पुन्हा एकदा त्याने सुखद धक्का दिला होता।

मला त्याचे नाव, गांव, जात, धर्म काहीही माहिती नव्हते,  एवढेच काय तर एवढ्या दिवसांत त्याचा आवाज पहिल्यांदा ऐकला होता पण मला त्याच्यावर नितांत प्रेम होते,  ते जसे लव अँट फर्स्ट साइट म्हणतात ना अगदी तसेच।।

त्याने चिठ्ठी लिहीताना कोणा दुसर्‍याने बघितली तर समजू नये म्हणून कदाचित ती शक्कल लढविली असावी पण मी त्याची स्मार्टनेस बघून खुप प्रभावित झाले होते।।

नंतर भेटीगाठी झाल्या व आम्ही लग्न केले,सुरूवातीला माझ्या घरच्यांचा विरोध होता पण त्याने आपल्या चांगल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली आहेत व तो आज आपल्या मेहनतीने खुप मोठ्या हुद्द्यावर पोहोचला आहे आणि मी त्याची बायको म्हणून मिरवत आहे। पण त्याने केलेला स्मार्ट प्रपोज आजही लक्षात राहतो व चेहर्‍यावर आणतो एक सुंदर स्मितहास्य।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: