प्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या

प्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या

आजकालची तरूण पिढी ही प्रेम या विषयावर खुप संवेदनशील असते व हे प्रेमात बुडालेले तरूण तरूणी आपल्या मतानी आपल्या विचारांवर,  आपल्याला वाटते तसे जीवन जगतात ।

आणि तसे बघितले तर प्रेम करणे काही वाईट नाहीच मुळी , प्रत्येक व्यक्ती हा कोणा ना कोणावर प्रेम करतचं असतो त्यामुळे प्रेम करण्यात काहीही गैर नाही।

पण समस्या त्यावेळेस निर्माण होते जेव्हा प्रेमविवाह करताना घरच्यांची संमती नसते अश्या वेळेस हे प्रेमीयुगुल पळून जाऊन लग्न करतात व पण हे दिसते तेवढं सोपं नसतं त्यामुळे प्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासून बघा तरचं लग्नाला सामोरे जा नाहीतर प्रेमविवाह केल्यानंतर ही भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते व आपल्यासोबत आपण ज्या व्यक्तींवर भरपूर प्रेम करतो त्याचेही आयुष्य बरबाद होऊ शकते। 

1  आपला जोडीदार –

खरं तर खुपदा असं होतं कि दोन लोकं आपली शारीरिक भुख क्षमविण्यासाठी जवळ येतात व त्यामधून जेव्हा गर्भावस्था होते तेव्हा त्यांच्याकडे लग्न करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो त्यामुळे लग्न करण्यात व जर ते खरं प्रेम नसेल तर भांडणतंटा व इतर गोष्टींचा उदय होतो व आयुष्य नरक बनून जाते,  म्हणून सर्वप्रथम हे नक्की करणे आवश्यक आहे कि आपला जोडीदार आपल्यावर खरे प्रेम करतो कि नाही ते। 

जर प्रेम खरे असेल तरच लग्न करण्याचा निर्णय घ्या,  नाहीतर जर फक्त शारिरीक सुखासाठी जवळ आला असणार तर ते समोरच्या वैवाहिक जीवनासाठी धोकादायक असू शकते।

2   आर्थिक स्थैर्य

प्रेमविवाह करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, कमीतकमी दोघांपैकी एकाला चांगली नोकरी किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे जेणेकरून आपले जीवन चांगले होऊ शकेल कारण हे जर नसेल तर पुढील आयुष्यात खूप कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते। 

म्हणून लग्न करून स्वतःला व जोडीदाराला कठीण परिस्थितीत टाकण्या अगोदर या गोष्टीचा नक्की विचार करावा।

3  घरचे आणि मित्र 

प्रेमविवाह केल्यानंतर जरी भरपूर पैसे असले तरीसुद्धा ही घरचे आणि मित्र यांचे भरपूर काम पडत असते जसे की आजारी असताना,  खासकरुन गर्भावस्थेत,  किंवा जर दोघंपण पतीपत्नी नोकरी करत असतील तर मुलांना बघण्यासाठी म्हणून घरच्यांची व चांगल्या मित्रमैत्रिणींची गरज पडते,  म्हणून शक्यतो घरच्यांशी बोलून च प्रेमविवाह करणे समजदारीचे राहील, आणि हे शक्य नसेल तर कमीत कमी दोघांपैकी एकाच्या घरचे आपल्या सोबत हवे आणि जर हेही शक्य नसल्यास चांगले मित्र मैत्रीणींशी चांगले संबंध ठेवावेत जे आपल्या सुखदुःखात आपल्याला मदत करतील।

4  विश्वास

एकमेकांवर विश्वास किती आहे हेही तपासून घ्यावे,  कारण जर विश्वास नसेल तर समोर खुप समस्या येऊ शकतात । म्हणून आपण स्वतःपेक्षा जास्त ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो असाच जोडीदार निवडावा।

5  कुटुंब नियोजन व आवडीनिवडी

कुटुंब नियोजन किंवा फँमिली प्लॅनिंग हे प्रेमविवाहात खुप महत्त्वाचे आहे, कारण आपल्यासोबत घरचे लोक जर नसतील तर एकमेकांची जास्त काळजी घ्यावी लागते,  त्यामुळे पत्नीला आयुष्य सुंदर जगण्यासाठी वेळ द्यावा व तिच्यावर लवकर बाळंतपण लादु नये,  याचा फायदा दोघांनाही होईल व आयुष्य सुंदर होईल।  कारण लग्नानंतर लवकरच मूलं झालं तर दोघांनाही नवीन जबाबदारी जड जाऊ शकते ।

तसेच एकमेकांच्या आवडीनिवडी व करियर बद्दल पहिलेचं बोलणं झालं तर चांगले राहील,  नाहीतर मग लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला नोकरी करू देत नाही,  अश्या इत्यादी समस्या येऊ शकतात।

मित्रांनो जीवन जगण्यासाठी प्रेमासोबतचं इतर व्यक्तींचीही गरज असते म्हणून शक्य असल्यास  घरच्यांशी बोलूनच निर्णय घ्या कारण जर तुम्ही स्वतःला चांगले सक्षम बनविले तर कोणीही तुम्हाला नकार देण्याचा प्रश्नच येणार नाही  ।।।।

धन्यवाद।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: