स्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा

स्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा

खरं तर सिनेमा म्हणजे एखाद्या कथेला व्यवस्थित संगीत व डायलॉग सोबत गुंफुन त्यामार्फत लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणे।   पण आजकालच्या व्यावसायिक जगात सिनेमे फक्त पैसे कमविण्यासाठी तयार करण्यात येत आहेत व त्याचेच एक उदाहरण म्हणजे स्ट्रीट डांसर।

आता सिनेमे वाल्यांना पैसे कमवायला मनाई नाही परंतु काही तरी नुसते बनवायचे म्हणून बनवायचे असे करणेही चुकीचेच म्हणावे लागेल।

सिनेमा बनविण्यात दिग्दर्शक किंवा डायरेक्टर हा किती महत्त्वाचा आहे हे असले फालतु सिनेमे पाहिल्यावरच लक्षात येते।

सिनेमाचं सर्व शूटींग विदेशात आणि नाव दिलं आहे स्ट्रीट डांसर ,वा रे वा बालीवुड !! म्हणजे यांच्या मते जो व्यक्ती विदेशात जाऊ शकतो तोही गरीबचं आहे असंच यांना वाटते।

इकडे लोकांचे खाणापिण्याचे ही वांदे असताना जे लोक बाहेर विमानाने उडतात ते पण गरीब असं यांचं म्हणणं आहे।

सगळा सिनेमा एखाद्या डांस रिअँलिटी शो प्रमाणेच आहे म्हणजे तुम्ही घरी टीव्हीवर एखादा शो बघितला तरी चालेल तो ही यापेक्षा चांगला असतो, 

सिनेमाची गाणी आणि  डांस चांगले आहेत, म्हणजे ज्यांना डांस खुप आवडतो त्यांनी पाहायला काही हरकत नाही।

त्या गरमी सांग मध्ये तर अशा काही स्टेप्स आहेत जेणेकरून आपण काही वेब सिरीज बघत आहोत असे वाटते,  त्यामुळे फँमिली सोबत बघताना थोडं खराब वाटतं ।

आता  बघुया सिनेमाची कथा,

लंडनमध्ये एक भारतीय व एक पाकिस्तानी असे दोन डान्स ग्रुप असतात,  त्यामधला पाकिस्तानी ग्रुप किती चांगला आहे  व भारतीय ग्रुप किती खराब आहे हे दाखविण्यात दिग्दर्शकाने खुप इंटरेस्ट घेतला आहे  , म्हणजे कधीकधी हा विचार येतो कि सिनेमा खरचं भारतात बनला आहे कि पाकिस्तान मध्ये ।

त्यानंतर ते एका शो मध्ये भाग घेतात इत्यादी आणि प्रभु देवा त्यांना डांस चं मार्गदर्शन करतो इत्यादी वगैरे वगैरे।

म्हणजे सांगायचीही काही गरज नाही तुम्ही आपोआप समजून गेले असणारचं।

नवीन काहीही नाही,  तसं पाहिलं तर रेमो डिसूझा ने फक्त आपल्या कोरिओग्राफी वर लक्ष द्यावं त्याला बाकी डायरेक्शन मधलं  काहीही समजतं नाही,  त्याचं फालतु कामं याआधीही लोकांनी रेस 3 मध्ये बघितलंचं होतं।

सिनेमा का पाहावा?

जर तुम्ही डांस चे डाय हार्ट फँन असाल किंवा त्यात करियर करणार असाल तर बघु शकता,  डांस स्टेप तुम्हाला निराश करणार नाही।

पण जर तुम्हाला सिनेमा म्हणून एक उत्तम कलाकृती बघायची असेल तर हा सिनेमा खुप निराश करू शकतो, 
यापेक्षा तानाजी परत पाहिलां तरी लाखपटीने बरं होईल।

धन्यवाद।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: