जवानी जानेमन

जवानी जानेमन

मित्रांनो आज सैफ अली खान, तब्बू , आलिया फर्निचरवाला आणि चंकी पांडे यांचा ” जवानी जानेमन ”
हा सिनेमा रिलीज झाला। व हा सिनेमा मला खुप आवडलाही ।

कथा।

सैफ अली खानने जँझ नावाचे पात्र केले आहे,  हा जँझ म्हणजे एक चाळीशीतला माँडर्न व्यक्ती , त्याला पैसे उडविणे,  रोज नवनवीन मुलींशी संबंध ठेवणे,  पार्टी अश्याच गोष्टी करायला आवडतात,  त्याला लाइफ मध्ये कमिटमेंट नको असते,   म्हणून तो लग्न करत नाही  ।

कोणतीही मुलगी दिसली तरी ती लवकरात लवकर कशी हातात येईल याचाच विचार तो करतो , त्याचे जीवन अगदी मस्त चाललेले असते।

पण एके दिवशी हा नायक अचानक टेंशन मध्ये येतो कारण एक वीशीतली मुलगी (आलिया फर्निचरवाला )त्याच्याकडे येते व ती त्याची मुलगी आहे असे सांगते। त्यातल्या त्यात वरून ती मुलगी गर्भवती सुद्धा असते व तिचा बॉयफ्रेंड तिला या अवस्थेत सोडून गेलेला असतो।

नंतर जेव्हा तो आपल्या मुलीला म्हणतो कि, ” तुझा बॉयफ्रेंड किती केयरलेस आहे,  तो तुला अशा अवस्थेत कसा काय सोडून जाऊ शकतो?  ”  तेव्हा त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होते व तेव्हा तो आपल्या आईवडिलांना भेटायला घरी जातो।

सिनेमामध्ये एक चंकी पांडे चे इंटरेस्टिंग पात्र आहे ,तो एका बार चा मालक असतो व तोही सैफ सारखाच अय्याशी करणे,  रोज नवनवीन मुलींशी झोपणे असले कामे करत असतो त्यामुळे त्याने लग्नसुद्धा केलेले नसते।   पण एकेदिवशी त्याला लकवा मारतो तर डाँक्टर त्याला नाँर्मल आयुष्य जगायला सांगतात पण तो आता या वयात नाँर्मल आयुष्य कसे जगणार ? त्याची साधी काळजी घ्यायलाही कोणी नसते।

हे बघुन तो नायक खुप इमोशनल होतो व शेवट काय होणार आहे ते तुम्हाला समजलेच असणार।

तब्बू ने सैफ ने प्रेग्नंट करून सोडलेल्या प्रेयसीचे म्हणजेच आलिया च्या आईची भूमिका केलेली आहे।

अँक्टींग च्या बाबतीत सर्वच कलाकारांनी छान काम केले आहे व सिनेमाचे कथानक आणि डायलॉग्जही प्रभावशाली आहेत।

यातून काय बोध घ्यायला हवा।

खरं तरं जवानी कधी ना कधी संपणार चं आहे, त्यामुळे आपल्याला कठीण समयी आपल्या माणसांची आवश्यकता असते , म्हणून आपल्या आयुष्य कधीही स्वार्थी जगू नये।

नाहीतर आपली अवस्था त्या लकवा मारलेल्या बार मालक सारखी होऊ शकते ज्याला बघायलाही कोणी नसते।

का पाहावा।

खुप काही शिकण्यासारखे आहे व सिनेमागृहातून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा नक्की काही ना काही चांगला  बदल स्वतःमध्ये अनुभवाला येईल ।।।।

धन्यवाद।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: