सांगा व्यवस्थेवाल्यायनं त्यायले फाशी द्यान कवां ????

जेव्हा एखाद्या राज्यात सरकार अल्पमतात येते

तवा कसं कोर्ट वाले गपकन निर्णय देते

आणं निर्भयाला देवाघरी जाऊन एवढे वर्षे गेले

तरी तिचे गुन्हेगार फाशी टाळून गेले

नेहमीच महिला सक्षमीकरणाचा तुमचा फोल ठरतो दावा

तरी तुम्ही म्हणता कि व्यवस्थेवर विश्वास ठेवा।।

गुन्हा करणारे करून क्षणांत मोकळे होते

आणि न्याय मागणारे वर्षोवर्षे अश्रू गाळतं रायते

यायच्या केसा लढाले पण लयं वकिलं येते

आणि कायद्याच्या पळवाटा त्यायले शोधून देते

अश्या वकिलांनी आपली माणूसकी विकली का बाराच्या भावात ?

कदाचित माय बहिणी नसतील यायच्या घरात

यायनं त्यायले वाचवाचा घेतला आहे ठेका

आणि जनतेले च सांगते व्यवस्थेवर विश्वास ठेवा ।।

जर त्या हैदराबादमध्ये त्यायले जाग्यावर गोळी मारली नसती

तर त्या बी पोरीची आत्मा न्यायासाठी वाट पाहात असती

असल्या दिरंगाई मुळे वाढते गुन्हेगारांची हिंमत

आणि त्याची मोजावी लागते आमच्या माय बहिणीले किंमत

आता तरी त्यायले लवकर देऊन टाका फाशी

आणि तिच्या आत्म्याला मिळू द्या थोडीशी शांती

नुसते बोल बोल बोलता थोडसे करून बी दावा

फक्त जनतेले सांगता व्यवस्थेवर विश्वास ठेवा।।।।

काऊन त्यायची तारीख वर तारीख पुढं ढकलून रायले

त्या हरामखोरायले काऊन वाचवुन रायले

त्या पांढर्‍या टी शर्ट वाल्यानं तर मस्त बाँडी बनवली

असं वाटते त्याले जेल मंधी दम बिर्याणी पुरवली

तुमचं असं कि नियम पाळणे वाल्याले हजार कागदं मागता

आणं तोडणे वाल्याले एका नोटेत सोडता

सांगा व्यवस्थेवाल्यायनं त्यायले फाशी द्यान कवां

का नुसते आम्हालेचं म्हणा कि व्यवस्थेवर विश्वास ठेवा।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: