काळ – मराठी चित्रपट

काळ

नुकताच  “काळ ” हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला ,  या सिनेमाच्या टीझर व ट्रेलर ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती।

या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा हाँरर थाटणीचा चित्रपट मराठी सिने रसिकांना पाहायला मिळेल म्हणून मराठी चाहत्यांना या सिनेमाविषयी खुपच उत्सुकता होती,  पण हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात काही प्रमाणात अपयशी ठरतो।

कथा

चार मित्र मिळून एक कंपनी चालू करतात, जी भूत प्रेत शोधण्याचे काम करीत असते व त्यानुसार त्यांना एका खुण झालेल्या ठिकाणी ते शोधण्याचं कामं मिळते व ते आपले कँमेरा व इतर साहित्य घेऊन त्याठिकाणी जातात व आपली शोधमोहीम राबवतात

यासारखे अनेक सिनेमे आपण हिंदी  मध्ये बघितलेले आहेत, जसे की रागिनी एम एम एस वगैरे।
आणि  मराठीत असा प्रयत्न निर्मात्यांनी केला त्याबद्दल त्यांचे आभार पण सिनेमा अजून चांगला होऊ शकला असता।

का बघावा

मराठी मध्ये नवीन विषय आहे त्यामुळे ट्राय करायला काही हरकत नाही पण  जर आपल्या कडे अतिरिक्त वेळ असेल तरचं बघावा  । नाहीतर या सिनेमाला टाळले तरी चालेल कारण पैसे वाचतील।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: