जेठालाल गाडी का घेत नाही????

जेठालाल गाडी का घेत नाही????

आज रविवार चा सुट्टी चा दिवस व गल्लीतील आपल्या पोरांच्या खेळता खेळता चर्चा रंगल्या, त्यातही एक महत्त्वाचा गंभीर विषय तो म्हणजे जेठालाल हा गाडी का घेत नाही?  तो एवढा मोठा व्यापारी, व्यवसाय करतो पण साधी गाडी का घेत नाही?  का सारखा रिक्षा नी ये जा करतो?  मग सर्व जण आपल्या आपल्या तर्क वितर्क वापरून उत्तरे देत होती तर काही मजेशीर उत्तरे आपल्या समोर सादर करीत आहोत ।

आता तुम्ही असे म्हणूच शकत नाही की हा जेठालाल म्हणजे नेमका कोण?  जेठालाल ला ओळखणार नाही असे खुप कमी लोक भारतात असतील, कारण हा जेठालाल घराघरांत पोहोचलेल्या व कित्येकदा टीआरपी मध्ये टाँप वर राहात असलेल्या  ” तारक मेहता का उलटा चश्मा ” या सिरियलचा नायक आहे।

त्याचे पुर्ण नाव जेठालाल चंपकलाल गडा आहे व तो गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान चालवितो।

तर आता मुद्दयावर येऊ।

जेठालाल का गाडी घेत नाही?  यावर चर्चेतून उदयास आलेली उत्तरे।

1 डुंब्या  –  अरे भाऊ तो लय कंजुस आहे म्हणून त्याची गाडी घ्याची हिम्मत नाय होत व पेट्रोल बी लय महाग आहे न गा भाऊ आता।

2  संत्या –  मले वाटते त्याचा बुडा लय कडक माणूस हाय म्हणून त्यानं गाडी घ्यासाठी मनाई केली असन , नाहीतर घेतली असती त्यानं गाडी।

3  चिंट्या –  चुप बे संत्या लेका काहीबी बोलतो,  भाऊ  मले वाटते त्याचं पोरगं लयं बदमास हाय टपू,  म्हणून त्याले वाटतं असन की हे पोट्ट गाडी फिरवाले नेईन व गाडी ठोकण  रस्त्यावर व त्याचे हात पाय मोडण म्हणून थो नसण घेत गाडी।

4  पक्या  –  होऊ शकते त्याच्याजवळ पैसा नसण गा गाडी घ्याले,  कायले गरीबाची मजाक उडवता तुम्ही! बिचारा चांगला आहे तसा जेठालाल सगल्यांच्या मदतीले धावून जाते।

5 गोल्या  –  मले वाटते त्याले सोसायटीत गाडी ठेवाले भिडे न परमिशन नसन दिली।

6 गोट्या – अबे लेका त्याच्या दुकानात गाडी ठेवाले जागा नाही बे,  म्हणून नाही घेत। 

7  पांडू – आगा त्याले मूळव्याध ची बिमारी असणं म्हणून गाडीवर कसा बसण तो,  म्हणून नाही घेत।

8 कैल्या –  अबे तर लेका पांड्या दुकान मांड्या,  मग रिक्षात बी बसूनच जाते न थो।

9  चंपत न तर हदचं केली , तो म्हणाला,
अबे त्याले गाडी चालवता चं नाही येत तर काऊन घेईन गाडी तो,  कसे बे तुम्ही।

10  उमश्या –  अबे मी सांगतो, तुमच्यात मी जास्ती शिकलो हाय,  खरं कारण हे की त्याच्याकडं ड्राइविंग लायसन नाही आणि तुमाले माहिती आहे नं कसे चालान मारते आता तर लायसन नसल्यावर, म्हणून तो गाडी घेऊन नाय रायला।

एवढ्यात आकाशाची आजी सोट घेऊन आली व सर्व पोट्टे पळाले।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: