Superr cop  थीरन

Superr cop  थीरन

जर तुम्हाला पोलिस हिरो असलेले सिनेमे आवडत असतील तर एक जबरदस्त साउथ सिनेमा आहे थीरन, जो युट्यूबवर ही हिंदीमध्ये उपलब्ध आहे।  कार्तिक, रकुलप्रित सिंह हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत।

कथा

ट्रक ड्रायव्हर असणारे वेगवेगळ्या राज्यातील लोकं जेव्हा  ट्रक घेऊन माल दुसर्‍या राज्यात पोहचवात तेव्हा ते त्या ठिकाणी चोऱ्या, बलात्कार, लूट करून तेथून पळ काढतात पण ह्या चोरांना पकडणे पोलिसांना अशक्य होऊन जाते कारण ते लगेच आपल्या अलग अलग ठिकाणी निघुन जातात।  ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या राज्यात अश्या लूटी करतात व निघुन जातात,  असले प्रकार करताना आपल्या जवळच्या शस्त्रांनी ते भयावह हिंसा करतात,  वाटेत आला त्याला मारणे अशी त्या चोरांची पद्धत असते।

त्यांच्या गावाकडला एक व्यक्ती हा सरकारी अधिकारी असतो व तो चोरून आणलेला माल विकून देण्याचे किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचे काम करीत असतो।

जेव्हा सुरूवातीला अशा घटना घडतात तेव्हा सरकार जास्त सिरीयसली घेत नाही पण एके दिवशी एका आमदाराच्या घरी अशी भयानक पद्धतीची चोरी होते तेव्हा सर्व यंत्रणा खडबडून जागी होते व कामाला लागते।

सिनेमातील गुंड खूप भयानक दाखविलेले आहेत त्यामुळे  सारखा थरकाप उडतो। प्रत्येक सिन मध्ये गुंडांनी आपली छाप सोडली आहे, जणू काही ते एक प्रकारचे राक्षसच आहेत असा भास सारखा सिनेमा बघताना होतो।

कार्तिक हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत सुंदर दिसतो व त्याचे कामही वाखाणण्याजोगे आहे,  रकुलप्रित नेही कार्तिक च्या बायकोचे पात्र चांगले केले आहे पण तिला जास्त काही करण्यासारखे सिन्स नाहीत।

नंतर दुसर्‍या राज्यांच्या पोलीसांची मदत घेऊन कार्तिक कशाप्रकारे गुन्हेगारांचा शोध घेतो व त्याला कशाप्रकारे संकटांशी सामना करावा लागतो हे सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल  ।

पण आजपर्यंत बघितलेल्या पोलिस सिनेमांपैकी हा सिनेमा सर्वाधिक थरकाप उडवणारा सिनेमा आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: