बागी 3 ट्रेलर रिव्ह्यू

बागी 3 टाइगर श्राँफ चा दमदार कमबँक

रितीक रोशन सोबत वाँर सिनेमात  केलेल्या केलेल्या सुंदर अभिनयानंतर टायगर आपला पुन्हा एक अँक्शनपट घेऊन 6 मार्च रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे, सिनेमाचे नाव आहे बागी 3 ।

बागी 1 मध्ये टायगर व श्रद्धा यांनी सोबत काम केले होते,  नंतर बागी 2 मध्ये टायगर ची गर्लफ्रेंड दिशा पटानी ला कास्ट करण्यात आले आता परत बागी 3 च्या निमित्ताने टायगर व श्रद्धा यांची जोडी एकत्र पाहायला मिळेल।

या सिनेमाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले व यावरून हा सिनेमा परत एकदा टायगर ला अँक्शन अवतारात दाखविण्यास सज्ज आहे ।

कथा।

टायगर व रितेश देशमुख हे दोघे भाऊ असतात व रितेश जेव्हा पण कोणत्या अडचणी मध्ये फसतो तेव्हा तो आपल्या भावाला म्हणजेच टायगरला जोरात हाक मारतो व टायगर नेहमीप्रमाणे येऊन धडाधड सर्वांना मारतो।

या सिनेमात दोन भावांचे जबरदस्त बाँडिंग दिसणार आहे,  शेवटी रितेशला काही दहशतवादी आखाती देशांमध्ये किडनँप करतात व टायगर आपल्या भावाला वाचविण्यासाठी जातो,  आणि नक्कीच तो आपल्या भावाला परत आणतोही,  हिरो आहे भाऊ आणेल नाही तर कोणाला सांगेल।

श्रद्धा कपूर ही त्याला या कामात मदत करते , तिचं नावं नाही घेतलं तर कदाचित श्रद्धा नाराज होऊ शकते।

यामध्ये अंकिता लोखंडे ही आपल्याला दिसणार आहे, कदाचित ती रितेशच्या बायकोचा रोल प्ले करेल।

नेहमीप्रमाणे (म्हणजे बागी सिरीज) अहमद खान या सिनेमाला डायरेक्ट करीत आहे व साजिद नाडियादवाला निर्माते आहेत।

आता सिनेमा किती कमाई करणार याबद्दल माहिती नाही पण सध्या तरी बागी 3 चे ट्रेलर युट्यूबवर नंबर 1 आँन ट्रेडिंग वर आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: