मलंग

मलंग

आदित्य रॉय कपूर,  दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू स्टारर  मलंग हा सिनेमा प्रदर्शित झाला,  सस्पेन्स थ्रिलर टाइप चा हा सिनेमा मोहित सुरी ने डायरेक्ट केला आहे ।

सिनेमा कुठेही बोरिंग वाटत नाही व एकदम चांगला पण नाही पण तुमचे तिकीटाचे पैसे ही पाण्यात घालवणारा नाही। म्हणजे सरासरी आहे, पण जर तुम्ही थ्रिलर सिनेमा चे चाहते असाल तर हा तुमच्यासाठी  चांगला सिनेमा ठरणार ।

प्लस पॉईंट्स

अनिल कपूर ची अँक्टींग व काँमिक टाइमिंग हि सिनेमाची जमेची बाजू आहे,  जेव्हा जेव्हा अनिल कपूर पडद्यावर येतो तेव्हा आग लावून जातो , त्याला बघतचं राहुशा वाटते।

अँक्शन सीन कमालीचे आहेत व मस्त शूट केलेले आहे,  जेव्हा अँक्शन सीन येतात तेव्हा आदित्य रॉय कपूर एक दबंग टाइप चा जबरदस्त अभिनेता वाटतो।

सिनेमा चे संगीत ही उत्कृष्ट नसले तरी छान आहे व चित्रपटाला साजेशे आहे।

कथा

सिनेमा ची सुरूवात होते एक जेल मधून जिथे आदित्य रॉय कपूर म्हणजे अद्वैत ठाकूर बंद असतो व जेल मधल्या गुंडाना धो धो धुतो।  नंतर 5 वर्षांची शिक्षा भोगून तो सुटतो व एक एक पोलिस वाल्यांची हत्या करायला सुरुवात करतो।

हत्या करताना तो अंजनेय आगाशे (अनिल कपूर)  या पोलिस आँफिसर ला काँल करून सांगत असतो।

आगाशे (अनिल कपूर)  हा क्राइम ब्रांच आफिसर असतो तर मायकल (कुणाल खेमू)  हा स्पेशल सेल आँफिसर असतो दोघेही त्या खूण्याच्या मागे लागतात।

तिसर्‍या खूणाच्या वेळी अद्वैत ठाकूर पोलिसांना सरेंडर करतो नंतर अनिल कपूर ने त्याला एनकाऊंटर साठी नेल्यानंतर त्याला खरी कहाणी माहीती पडते व तो अद्वैत ला मारत नाही।

अद्वैत (आदित्य रॉय कपूर) पोलिसांना का मारतो?

तर गोव्या ला तो आणि  सारा (दिशा पटानी) भेटतात,  त्यांच प्रेम होते व मग सारा प्रेग्नंट राहते पण अचानक हे कळल्यावर तो पळून जातो पण जेव्हा त्याला त्याच्या चुकीचा पश्चात्ताप होतो तेव्हा तो परत येऊन साराला शोधतो।

सारा ही अद्वैत सोडून गेल्यामुळे खचुन जाते व त्यांची एक मैत्रीण असलेल्या डेझी कडे राहायला जाते।   डेझी ही स्वभावाने चांगली असली तरी ती ड्रग्ज विकण्याचे काम करते तसेच पैशासाठी देहविक्री सुद्धा करीत असते।

आता मायकल ( कुणाल खेमू)  याच लग्न होणार असते पण तो नामर्द असतो त्यामुळे तो लग्नापूर्वी स्वतःला चेक करण्यासाठी डेझी कडे शरीरसुखासाठी जातो पण त्यावेळी डेझी घरात नसते व डेझी समजून तो सारा ला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण तो नामर्द असल्याने काहीच करू शकत नाही।  व तितक्यात अद्वैत ही तिकडे सारा ला शोधत शोधत पोहोचतो।

आता पोलिस आँफिसर असलेल्या माइकल ला असे वाटते की, सारा ही मी नामर्द आहे म्हणून बाहेर लोकांना सांगेल म्हणून तो साराला मारतो व अद्वैत ला खोट्या केसमध्ये जेल मध्ये टाकतो,  आता हे काम तो त्याच्या सोबतच्या तीन ज्युनिअर पोलिस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करतो पण त्यांनाही खरे कारण माहिती नसते।

म्हणून बदला घेण्याच्या उद्देशाने अद्वैत या सर्वांना एक एक करून संपवित असतो।  या कामात डेझी त्याला मदत करते।

शेवटी अजून एक सस्पेन्स बघायला मिळतो ते म्हणजे सारा मरत नाही तर प्रत्येक खूण साराच करत असते व अद्वैत तिला मदत करतो।

कुणाला खेमू म्हणजे मायकल च्या पत्नीच्या भूमिकेत आपली मराठमोळी अभिनेत्री (टेरेसा) अमृता खानविलकर आहे  , तिला जास्त सिन्स मिळालेले नाहीत पण जेवढे पण मिळाले त्यात तिने चांगला अभिनय केला आहे।

का पाहावा?

सिनेमात नवीन काही नाहीच पण जर विकेंड ला घरी बोर वाटत असेल तर बघायला काही हरकत नाही,  फक्त सिनेमाकडून जास्त अपेक्षा न ठेवलेलीच बरी।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: