मराठी सिनेमा ‘मेक अप’

सैराटफेम रिंकू राजगुरू ला सर्वच लोकं ओळखतात, तिने आपल्या बिनधास्त अँक्टिंग ने भल्याभल्यांना वेड लावले आहे।

रिंकूचा नवीन सिनेमा प्रदर्शित झाला आहे त्याचे नाव आहे ‘ ‘मेक अप’ ।

सैराट नंतर रिंकूचा कागर हा सिनेमा पण येऊन गेला होता तिथेही तिने लोकांची मने जिंकलेली होती।

मेक अप हा सिनेमा गणेश पंडीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे,  गणेश पंडित यांचे सिनेमे एका वेगळ्या धाटणीचे असतात व त्यामधून काही ना काही चांगल्या गोष्टी ते सिनेरसिकांच्या हृ्दयावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात व त्यात यशस्वी ही होतात ।

सिनेमाचे प्लस पॉईंट्स

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही असणं या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू कारण एक शहरात राहणारी, चांगल्या घरची एकदम बिनधास्त मुलगी कशी असते  , कशी वागते ते अगदी मस्तपैकी रिंकूने सादर केलेले आहे।

सिनेमाची स्टोरी ही सुद्धा एक अलग छाप सोडते,  विषय जुनाचं असला तरी तो अगदी नव्या पद्धतीने मांडण्यात सिनेमाचे मेकर्स यशस्वी होतात।

नेहा कक्करने गायिलेले ‘मिले हो तुम हमको ‘चे मराठी वर्जन ही छान वाटते व त्या परिस्थितीत सिनेमात सूट होते।

सिनेमाची कथा

तर कथा अशी आहे की एक मुलगी पूर्वी (रिंकू) खूप बिनधास्त स्वभावाची आहे व तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत बोल्ड आहे , त्यामुळे तिचे लग्न जमण्यात अडचणी येतात कारण लोकांना तिचा अत्यंत बिनधास्तपणा आवडत नाही।

दुसरा आहे नील (चिन्मय उदगीरकर) हा अतिशय शांत स्वभावाचा व संस्कारी मुलगा आहे,  म्हणजे थोडक्यात हे दोघेही एकमेकांच्या विरूद्ध स्वभावाचे।

हे दोघं भेटतात व त्यांचे काय होते व त्यांच्या प्रेमातला निरागसपणा व नंतर तयार होणारी इमोशनल परिस्थिती हे सगळं आपल्याला कथेसोबत सामावून घेते, सिनेमा बघताना आपण जणूकाही आपलीच स्टोरी बघत आहोत की काय असा भास होतो , इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ही कथा सादर केली आहे।   स्टोरीबद्दल जास्त काही सांगत नाही कारण तुमचा सिनेमा बघण्याचा रस निघून जाईल ।

जे लोकं स्वतःच्या विश्वास रममाण असतात त्यांना लोकं पसंत करत नाहीत आणि जे लोकांप्रमाणे वागतात ते लोकांना आवडतात हाच अनुभव सिनेमा बघितल्यावर होतो।

का बघावा?

एक सुंदर मराठी कलाकृती आहे व तुम्ही परत एकदा रिंकू चे फँन व्हाल,  तसेच सैराट ची आर्ची जर शहराकडे वाढली असती तर कशी दिसली असती याचीही प्रचीती येईल।

थोडक्यात चांगला सिनेमा आहे व तुमचा विकेंड सुंदर बनवण्यासाठी हा सिनेमा नक्की बघा।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: