भारताने गमावला अंडर 19 क्रिकेट विश्वचषक

भारताने गमावला अंडर 19 क्रिकेट विश्वचषक

दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या अंडर 19 क्रिकेट विश्वकरंडक सामना भारताने गमावला आहे तर बांग्लादेश चा संघ पहिल्यांदाच विश्वकरंडक जिंकण्यात यशस्वी झाला आहे।

भारतीय संघाने पहिले फलंदाजी करताना अतिशय संथ गतीने खेळी केली व धावसंख्या फक्त 177 वर नेऊन पोहोचविली , यामध्ये यशस्वी जयस्वाल च्या महत्वपूर्ण 88 धावांचा समावेश होता,  अजून एक दोन फलंदाज वगळता बाकीच्यांना काही खास करता आले नाही । बांगलादेश च्या गोलंदाजानी टीम इंडिया वर अंकुश ठेवण्यात यश मिळविले।

नंतर फलंदाजी साठी आलेल्या बांगलादेश ची सुरूवात व्यवस्थित झाली पण नंतर रवी बिश्नोई ने 4 गडी बाद करून सामना भारताच्या बाजूने झुकवला व अगदी शेवटच्या काही षटकांपर्यंत सामना भारतच जिंकेल असे वाटत होते पण

बांगलादेश चा कर्णधार अकबर अली ने चिवट खेळी करत आपल्या संघाला विजया पर्यंत नेले व त्याला साथ दिली ओपनर परवेज नी,  खरतरं परवेज रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता पण बांगलादेश ची परिस्थिती खराब असताना तो परत मैदानात आला व आपल्या संघाला विजय मिळविण्यात मोलाचा हातभार लावला, भारतीय गोलंदाजांनी अतिशय कमी धावसंख्या असतानाही भरपूर एक्स्ट्रा रन दिले।

भारतीय गोलंदाजीत अजिबात शिस्तबद्धता नव्हती व फिल्डिंग मध्येही भरपूर चुका झाल्या,  अतिशय सोपे सोपे झेल भारतीय फिल्डर्स नी सोडले।

बांगलादेश च्या 170 धावा झाल्या असताना पाऊस पडला व नंतर त्यांना डकवर्थ लुईस च्या नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: