म्होरक्या

म्होरक्या

शुक्रवारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व अनेक चित्रपट महोत्सवात मध्ये दाखवल्या गेलेल्या व समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेला म्होरक्या हा चित्रपट प्रदर्शित झाला।

या चित्रपटाची सगळीकडेच खूप तारीफ होत आहे पण जास्त शहरांमध्ये सिनेमागृहे मिळालेली दिसत नाहीत।

कथा

चित्रपटाची कथा एका आश्या उर्फ अशोक नावाच्या मुलाची आहे जो एका मेंढपाळ घरातील आहे,  ज्याला शाळेची फारशी आवड नसते , त्याला पुस्तके अभ्यास नकोसा वाटतो।

तो आपल्या कामात व आपल्या जीवनात खूष असतो,  मेंढ्या पाळताना त्याचा आवाज ओरडू ओरडू कणखर झालेला असतो।

एके दिवशी त्याचे मित्र त्याची इच्छा नसताना त्याला शाळेत घेऊन जातात व नेमके त्याच दिवशी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड असते।

परेडमध्ये अशोक चा खणखणीत आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेतो।  तो जेव्हा सावधान, विश्राम बोलतो तेव्हा असे वाटते की कोणी मेजर आपल्या सैनिकांना परेड करवून घेत आहे,  त्यामुळे परेडमध्ये त्याला म्होरक्या म्हणजेच आँर्डर देणारा बनण्याची संधी मिळते।

अशोक सुद्धा तो म्होरक्या बनणार म्हणून खूष असतो पण तिथे त्याला एका मुलाचं आव्हान मिळते,  तो मुलगा म्हणजे गावातील पाटलाचा मुलगा ज्याचे नाव बाळ्या असते।

बाळयाला सुद्धा म्होरक्या बनायची इच्छा असते व तो एका प्रभावशाली कुटुंबातील मुलगा असल्यामुळे तो अशोकच्या मार्गात अडथळे निर्माण करतो।

सिनेमात जे दाखविले आहे ते सत्य परिस्थितीशी मिळणारे आहे जेव्हा तुम्ही बघत असाल की प्रभावशाली व्यक्तींच्या मुलांना गुण नसतानाही एखाद्या क्रिकेटच्या संघात स्थान दिले जाते ।

एखाद्या सुपरस्टार चा मुलगा गुण नसतानाही चांगले चित्रपटात काम करण्याची संधी मिळवतो,  

किंवा प्रभावशाली राज्यकर्त्यांची नाकर्ती मुले मोठमोठी पदे भूषवितात व परिणामी देशाचे नुकसान होते कारण या

वशिल्याने आलेल्या मुलांमुळे चांगले नेतृत्व व गुण असणारी हुशार मुले मागे राहतात।

व यामुळेच काही हुशार मुले हार मानतात व नशीबाला दोष देत आयुष्य काढतात पण काही अशी असतात जी मुले हार मानत नाहीत व सतत संघर्ष करतात व आपले ध्येय गाठतात।

संघर्ष करताना आपल्याला नेहमी एका गुरूची साथ लागते जो आपल्याला मार्गदर्शन करतो,  आपल्या चुका सुधारतो व बाहेर काय चाललंय?  , आपले विरोधक किती मजबूत आहेत?  याची जाणीव आपला गुरू आपल्याला करून देत असतो।

त्याचप्रमाणे अशोक लाही गावातील एका गुरूची साथ मिळते, हा गुरू गावातील एक वेडा असतो, अशोक सोडून गावातील सर्व त्याला वेडा समजतात पण तो व्यक्ती कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढलेला एक मेजर असतो पण काही कारणांमुळे तो एका वेड्याप्रमाणे जीवन जगत असतो।

हा व्यक्ती म्हणजे अण्णा, अशोकला शिस्त शिकवितो, त्याला तयार करतो,  त्याच्या चुका सुधारतो व त्याला परेडमध्ये म्होरक्या  बनण्यासाठी तयार करतो ।

अशोकची गरीब परिस्थिती,  त्याचे हलाखीचे जीवन,  त्याच्या चपला व सगळं ग्रामीण जीवन किती कठीण आहे व शहरातील जीवनाच्या तुलनेत ते किती कठीण जीवन जगतात हा ही अनुभव सिनेमा बघताना आल्याशिवाय राहणार नाही।

सिनेमा तांत्रिक बाबतीत थोडा मागे पडला आहे पण सिने दिग्दर्शकाने व संपूर्ण टीमने घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे या सिनेमाच्या चुका काढण्यात काहीही शहाणपणा नाही ।

कारण सिनेमाचे तेवढे बजेट नसतानाही त्या लोकांनी सिनेमा एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलाय ,यासाठी त्यांचे  जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच।

का बघावा????

एक उत्तम कलाकृती आहे व हा चित्रपट बघून त्यांना सपोर्ट करावा,  कारण त्यांना जर रसिकांची साथ मिळाली तरच पुन्हा अश्या नवीनवीन कलाकृती समोर बघायला मिळतील।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: