विक्रम भट चा hacked

hacked

विक्रम भट चा हँक्ड hacked हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला, खर तर हँकिंग म्हणजे समोरील व्यक्तीची संमती न घेता दुसर्‍या ची इंटरनेटवरील माहिती व डेटा कंट्रोल करणे व आपल्या मतानुसार आँपरेट करने या कंसेप्ट वर हा सिनेमा बनविण्यात आला आहे।

सिनेमाची कथा

एक इंडिपेडंट महिला असते व ती एक लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करते व तो व्यक्ती तिला फक्त युज करीत असतो,  त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो तिचे काँल घेतो व शरीरसुख जेव्हा त्याला पाहिजे असते तेव्हा तिच्याकडे येतो।

थोडक्यात त्याचे तिच्यावर प्रेम नसते व त्याचे पहिलेच लग्न ही झालेले असते,  हे तिला माहिती असून सुद्धा ती त्याच्यावर प्रेम करते व सतत त्याला फोन करते आणि तो नेहमीप्रमाणे तिचे काँल घेत नाही किंवा इच्छा असेल तरच घेतो।

तिसरा व्यक्ती एक 19 वर्षाचा मुलगा असतो जो एक हँकर असतो म्हणजे जो सिनेमात विलन आहे तो हाच आहे।

हा मुलगा तिच्यावर प्रेम  करतो  व सतत तिच्या मागेमागे करतो।

एके दिवशी ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या लग्न झालेल्या बॉयफ्रेंड ला फोन करते तर तो काँल घेत नाही त्यामुळे ती त्या 19 वर्षाच्या मुलासोबत रात्र घालवते,  नंतर सकाळी उठल्यावर मी खूप चुकीचे काम केले आहे असे तिला वाटते।

नंतर तो मुलगा तर विलन दाखविण्यात आला आहे त्यामुळे तो काहीतरी वेगळं करणारचं,  तर तो त्या महिलेबद्दल सिरियस होतो, पण ती महिला त्या रात्री एक चूक झाली अशी समजते ।

मग काय त्याला या गोष्टींचा राग येऊन तो तिच्या सगळ्या

सोशल मिडीया अकाऊंट व इतर महत्त्वाचे मेल वगैरे हँक करतो व तिला ब्लँकमेल करायला लागतो।

म्हणजे जर ती त्याच्याशी संबंध ठेवणार नाही तर तो तिचा सर्व प्रायवेट डेटा लीक करेल म्हणून।

अशाप्रकारे त्या हँकरने अनेक महिलांना ब्लँकमेल केलेले असते,  एकीला तर स्वतःच्या घरात त्याने कामवाली म्हणून ठेवलेली असते। म्हणजे तो मुलगा अत्यंत टाँप लेवलचा हँकर आहे असं दिग्दर्शकाला दाखवायचे आहे।

नेहमीप्रमाणे विक्रम भटच्या सिनेमाचा एक पार्ट असतो ग्लँमर तो इथेही आहेच,  हिरोईन पण एकदम बोल्ड दाखविली जाते ते पण इथेही दाखविले आहे पण सोबत एक चांगला विषय पण आहे।

मसाला चित्रपट आवडणार्‍या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार नाही पण ज्यांना थ्रिलर सिनेमे आवडतात अश्या लोकांना हा चित्रपट निराश करणार नाही।

का बघावा????

आजकालच्या महिलांनी ज्यांचे कामात अनेक पुरूषांशी व इतर सोसायटी शी संबंध येतात त्यांनी हा सिनेमा नक्की बघावा कारण यामुळे आपल्या काही फोटो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोक आपल्याला कसे ब्लँकमेल करू शकतात व त्यामुळे आपण समाजात वावरताना किती सावध राहिले पाहिजे हे या सिनेमातून महिलांना शिकायला मिळेल।

कारण आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात आपण बर्‍याच लोकांशी आपल्या खाजगी गोष्टी शेयर करत असतो तर त्या आपल्यावर भारी पडू शकतात।

तुमचे पैसे वाया जाणार नाही व सोबतचं नवीन काहीतरी पाहायला मिळेल व सिनेमाकडून जास्त अपेक्षा करू नये।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: