विना एजंट ड्रायव्हिंग लायसन्स बनवा व महागडे चालान वाचवा।

विना एजंट ड्रायव्हिंग लायसन्स बनवा व महागडे चालान वाचवा।

मित्रांनो सध्या देशात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आलेले आहेत व सरकारकडून नियम मोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे व आकारण्यात येणाऱ्या दंडाचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे।

कारण देशात नवीन वाहतूक कायदा करण्यात आलेला आहे।

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट समोर येत असेल तर ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स नसणे व लायसन्स नसल्यामुळे लोकांना चालान भरावे लागते।

आता लोक लायसन्स का काढत नाहीत?  

तर काहीच्या मनात अशी भिती असते की तिथे खूप वेळ जाईल किंवा काही लोक असा विचार करतात की एजंट भरपूर पैसे घेईल व असा कोणता मी रोज रोज दंड भरणार आहे?  इत्यादी।

मित्रांनो आपण जी गाडी चालवितो त्याचे लायसन्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे कारण विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे,   जर तुमची वाहन चालविताना चुक नसेल पण जर तुमच्याकडे परवाना नाही तर अशा अपघातांमध्ये कायद्याने तुम्हाला दोषी ठरविले जाऊ शकते,   व परवाना नसला तर गाडीची इंशुरंस क्लेम मिळत नाही,    त्यामुळे नियम हे आपल्यासाठीच बनविलेले असतात म्हणून नियम पाळले तर ते आपल्याच फायद्याचे राहील।

विना एजंट लायसन्स काढण्याची सोपी पद्धत

लायसन्स चे दोन भाग असतात एक लर्निंग लायसन्स व दुसरे पर्मनंट लायसन्स ( लर्निंग म्हणजे शिकाऊ तर पर्मनंट म्हणजे कायमस्वरूपी)

Learning license

हे काढण्यासाठी तुम्हाला शासनमान्य ओळख पत्र, पत्ता पुरावा,  1 फोटो व सही स्कँन करून लागते व एक declaration form.

आता सारथी.परिवहन.gov. in  या वेबसाइटवर जा,  तिथे  learning license  वर क्लिक करा व आपली माहिती भरून फोटो , सही व इतर कागदपत्रे (आधार कार्ड व declaration form) अपलोड करा .  आधार कार्ड हे  id proof व address proof दोन्ही चे काम कऱते म्हणून आधार असल्यास उत्तम , नाहीतर अलग अलग ओळखीचा व पत्त्याचा पुरावा ही सादर करू शकतो,   declaration form  वेबसाइटवर मिळतो त्याची प्रिंट काढून भरून घ्यावी।

नंतर त्याची फी असते ते फी आपण आनलाईन मोबाईल वरून भरू शकतो,  अर्थात ही सगळी प्रोसेस आपण घरबसल्या मोबाईल वरून करू शकतो,  कागदपत्रे स्कँन करताना ही बाहेर जाण्याची गरज नाही,  आपल्या मोबाईल मध्ये चांगले क्लियर फोटो काढून घ्या व ते अपलोड करून घ्या।

आपल्याला कोणते लायसन्स घ्यायचे आहे त्यानुसार अलग अलग फी असते,  जसे काही लोक मोपेड चे घेतात,  काही बाईक किंवा काही 2 व्हीलर, 4 व्हीलर कंबाईन घेतात।

ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला slot booking  करावे लागेल परीक्षेसाठी, तर आपल्याला कुठली तारीख व कुठला वेळ हवा आहे,, त्याप्रमाणे मोबाईल वर सिलेक्ट करा। स्लाँट बुकिंग झाल्यानंतर त्यावेळी दिलेल्या ठिकाणी परीक्षा देऊन यावे। परीक्षेला जाताना आनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे व फी भरल्याची पावती सोबत न्यावी।

परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रश्नांचे एक अँप प्ले स्टोर वर आहे ते वाचून घेतल्यास परीक्षा हमखास पास व्हाल,  परीक्षा संगणकावर घेतली जाते व अगदी कमी वेळात संपून जाते,  त्यामुळे कामातून जरासा वेळ काढून आपण हे काम करू शकतो।

नंतर लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी परिवहन विभागातर्फे एक learning license देण्यात येते व ते सहा महिन्यांकरिता वैध असते,  हे लायसन्स मिळाल्यानंतर एका महिन्यात आपण  permanent license  करिता अर्ज करू शकतो।

जे व्यक्ती परिक्षेत फेल होतात त्यांना परत सात दिवसांनी बोलविले जाते।

Permanent license

Learning license  मिळविल्यानंतर एक महिना झाल्यावर जर आपण गाडी व्यवस्थित चालवू शकत असाल तर permanent license साठी अर्ज करावा।   पुन्हा सारथी परिवहन या वेबसाइटवर जाऊन पर्मनंट लायसन्स या बटनवर क्लिक करावे व आपला लर्निंग लायसन्स नंबर व जन्मतारीख टाकावी,  नंतर पर्मनंट लायसन्सची जी काही फी असेल ती आनलाईन भरावी व ट्रायल साठी स्लाँट बुकिंग करून घ्यावे,  ही प्रकिया सुद्धा मोबाईल वर करता येते।

आपला लर्निंग लायसन्स च्या वेळेस चा संपूर्ण फार्म, पर्मनंट ची फी भरल्याची पावती ,लर्निंग लायसन्स ,हेलमेट, ज्या गाडी ने ट्रायल देणार आहो त्याची कागदपत्रे,  इंशुरंस,  पीयुसी सोबत घेऊन जावे।

टु व्हिलर ची ट्रायल एखाद्या इंग्रजीत असणार्‍या 8 च्या अक्षराप्रमाणे गोल राऊंड मध्ये होते,  तिथे व्यवस्थित वेळेवर इंडिकेटर देणे ,व पाय टेकवता येत नाही प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल होऊ शकते,  परिवहन अधिकारी तुम्हाला व्यवस्थित गाडी चालविता येते की नाही हे बघत असतात।     4 व्हिलर साठी ही अधिकारी रिवर्स, व इत्यादी ड्रायव्हिंग कौशल्य तपासत असतात।

जर त्या परिक्षेत कोणी उमेदवार फेल झाल्यास परत 7 दिवसाने तो ट्रायल देऊ शकतो।

ट्रायल पास झाल्यानंतर आपल्या मोबाईल वर एक दोन दिवसांनी मँसेज येतो व आपला लायसन्स नंबर त्यामध्ये दिलेला असतो तो नंबर आपण डिजी लाँकर या अँप मध्ये इनपुट केल्यास आपल्याला त्वरित लायसन्स ची साँफ्ट काँपी मिळते जी आपण कुठेही मागितल्यास आपल्या स्मार्टफोन वरती दाखवू शकतो , लायसन्सची हार्ड काँपी सुद्धा काही दिवसांत पोस्टाने घरी येते।

डिजीलाँकर या अँपवर आपण गाडीची काही कागदपत्रे नंबर आणि डेट टाकून मिळवू शकतो जसे की लायसन्स व आर सी

आणि

इंशुरंस व पी यु सी सारखी कागदपत्रे स्टोर करून किंवा अपलोड करून ठेवू शकतो म्हणजे कागदपत्रे प्रत्येक वेळेस सोबत बाळगायची गरज राहणार नाही ।

तर यावरून तुम्हाला कळले असेलच की आता ड्रायव्हिंग लायसन्स साठी कुठल्याही एजंट किंवा वशिल्याची गरज नाही ते फक्त मोबाईल च्या एका क्लिकवर काढता येते, फक्त यासाठी आपल्याला थोडासा वेळ काढावा लागेल।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: