Parasite जगभरात पसंत केला गेलेला oscar nominated सिनेमा

जगभरात चर्चेचा विषय ठरलेला व आँक्सर च्या स्पर्धेत मजबूतीने उभा असलेल्या चित्रपट ज्याचे नाव आहे “पँरासाईट”, त्याची चर्चा आज आपण करणार आहोत ।

पँरासाईट या सिनेमाबद्दल, त्याच्या कथेबद्दल लिहावे याबद्दल भरपूर लोकांच्या सूचना आल्या होत्या , खरतंर तुम्ही आमच्या लेखनाला चांगला प्रतिसाद देत आहात हे बघून खुप आनंद होतोय।

तर बघुया असं या सिनेमात काय आहे कि ज्यामुळे या सिनेमाने संपूर्ण जगाला भुरळ घातलेली आहे।

तर पँरासाईट या शब्दाचा मराठी अर्थ होतो दुसऱ्यावर अवलंबून असणारा किंवा परजीवी।

आपण सगळीकडे बघतोच की,  गरीब लोकं कसे श्रीमंतांवर अवलंबून असतात व नेहमी काम मिळविण्यासाठी श्रीमंत लोकांच्या मर्जीत गरीबांना राहावे लागते,  पण जर आपण अजून त्यामध्ये थोडं निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येईल की,  गरीब जसे श्रीमंतांवर अवलंबून आहेत त्याचप्रकारे श्रीमंत लोकसुद्धा गरीबांवर अवलंबून आहेत,  जसे की घरकाम करण्यासाठी, त्यांची खाजगी कामे करण्यासाठी,  स्वयंपाक करण्यासाठी, गाडी चालविण्यासाठी इत्यादी।

तर या साऊथ कोरियन सिनेमामध्ये हाच नवीन विषय मांडण्यात आला आहे।

सिनेमाची कथा

तर एक गरीब कुटुंब असते ते एका बेसमेंट टाइप च्या घरात राहतात  ते इतके गरीब असतात की जेव्हा शहरातील प्रशासनाकडून जेव्हा मच्छर पळविण्यासाठी मशीनद्वारे धूर मारला जातो तेव्हा ते आपली खिडकी खुली ठेवतात,  फुकटच्या वायफायसाठी नेटवर्क मिळविण्यासाठी त्या छोट्याशा घरामध्ये कसरत करतात , कधीकधी कोणी बेवडा व्यक्ती त्यांच्या खिडकीजवळ मूत्रविसर्जन सुद्धा करून जातो।

त्यांच्या घरात चार व्यक्ती असतात, आई – वडील व दोन मुले ज्यापैकी एक मुलगी असते जवळपास 20-21 वर्षांची व तिच्यापैक्षा 1 – 2 वर्षांनी लहान तिचा भाऊ असतो।

ते अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतात।

एक दिवस या गरीब घरातील मुलाला एक त्याचा मित्र एका अतिशय श्रीमंत घरातील मुलीला इंग्रजी शिकविण्याचे काम मिळवून देतो। कारण त्याचा मित्र त्या मुलीला लाइक करत असतो व त्याला वाटते तिला दुसरा कोणी शिकवायला गेला तर तो तिला पटविण्याचा प्रयत्न करेल,  म्हणून तो जेव्हा बाहेर हायर एज्युकेशन साठी जातो तेव्हा आपली नोकरी या गरीब कुटुंबातील मुलाला देतो ।

जिथे तो गरीब मुलगा खोटे डॉक्युमेंट बनवून (चांगल्या युनिवर्सिटी मध्ये शिकल्याचे प्रुफ म्हणून) काम करायला जातो व मित्राच्या वशिल्या मुळे त्याची नोकरी पक्की होते।

त्या श्रीमंत कुटुंबात ही चार लोक असतात, आईवडील व दोन मुले ।

श्रीमंत फॅमिली चा हेड एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर असतो , त्याची पत्नी, टीन एजर मुलगी व एका 10 ते 12 वर्षाचा मुलगा असे चार लोक या श्रीमंत फॅमिली मध्ये असतात

आता या गरीब मुलाला इंग्लिश ट्युटर चे काम मिळाल्यानंतर तो हळू हळू त्याच्या घरातील सर्वांना तिथे काम मिळवून देतो,  जसे की  वडीलांना ड्रायव्हर,  आईला मेड इत्यादी।

आणि हे सगळं करताना ते लोकं चुकीच्या गोष्टींचा वापर करतात  , जसे की जे तेथील जुने लोक खुप वर्षांपासून तिथे काम करीत होते,  त्यांना कुठली तरी शक्कल लढवून त्यांना कामावरून कमी करण्यात येते व यामध्ये या गरीब कुटुंबाचा हात असतो कारण या सर्वांना तिथे काम मिळवायचे असते।

जेव्हा त्या श्रीमंत कुटुंबातील मुलाला एका आर्ट टीचर ची गरज असते तेव्हा तो गरीब मुलगा आपल्या बहीणीची शिफारस करतो व ती खोटे कागदपत्रे बनवून नोकरी जाईन करते। दोघा बहीण भावाच्या पगारात घर व्यवस्थित चालणार नाही म्हणून ते परत शक्कल लढवितात।

एके दिवशी मालक त्या गरीब मुलीला सोडायला गाडी पाठवितो तेव्हा ती मुलगी आपले काही कपडे गाडीमध्ये उतरविते, व ते कपडे त्या मालकाला दिसतात तेव्हा आपला ड्रायव्हर गाडीमध्ये चुकीचे कामे करतो असे समजून ड्रायव्हर ला कामावरून काढण्यात येते , व तेव्हा ती आपल्या वडीलांना आपले अंकल आहेत अशी ओळख देऊन ड्रायव्हर ची नोकरी मिळवून देते।

नंतर तो गरीब कुटुंबातील ड्रायव्हर तिथल्या हाऊस मेड ला एका फळाची एलर्जी असते व ते फळ जेव्हा तिच्याजवळ ठेवले जाते तेव्हा ती जोराजोरात खोकलते , ड्रायव्हर ते फळ तिच्याजवळ ठेवतो व ती खोकताना जो पेपर वापरते त्यावर टोमॅटो साँस लावतो, जे रक्ताप्रमाणे दिसते यामुळे त्या मेड ला टीबी झाली आहे असे सिद्ध करतो व तिलाही नोकरीवरून काढण्यात येते,  नंतर तिच्या जागी तो आपल्या बायकोला मेड म्हणून लावतो

पण हे गरीब कुटुंबातील चारही लोक एकाच कुटुंबातील आहेत असे ते कोणलाही सांगत नाहीत।

आता काम मिळविल्यानंतर त्या गरीब कुटुंबाकडे  पैसा येतो व त्यांची स्टांडर्ड आँफ लिविंग सुधारते।

नंतर एक दिवस श्रीमंत कुटुंबातील मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालकाचे कुटुंब बाहेर जाते तेव्हा हे गरीब कुटुंबातील चारही जण मस्त त्यांच्या घरी पार्टी करतात, यांचा मस्त एंजॉय चाललेला असतो।

त्यांच्या मनात असा विचार येतो कि,  हे श्रीमंत लोक चांगले आहेत पण कधीकधी त्यांना असे वाटते की ते श्रीमंत आहेत म्हणून चांगले आहेत।

तेव्हा घरात जुनी काम करणारी मेड येते जिला या लोकांनी कपट कारस्थान करून घराबाहेर काढलेले असते,  

ती आल्यावर बाकीचे तिघेही लपून जातात व गरीब कुटुंबातील ती नवीन मेड तिला विचारते की तु इथे का आलीस?

तेव्हा त्या जुन्या मेड ची हालत खूप खराब असते व तिच्यावर नोकरी गेल्यामुळे खुप कठीण दिवस येतात।

ती मेड आपल्या नवर्‍याला घराच्या एके ठिकाणी बेसमेंट मध्ये लपवून ठेवते ज्या बेसमेंट बद्दल कोणालाही माहिती नसते, कारण ती मेड म्हणजे कामवाली बाई ज्या मालकाने हे घर या श्रीमंत कुटुंबाला विकले त्याच्या कडे सुद्धा काम केलेली असते व त्या घरात तो जुना मालक अशी सिक्रेट बेसमेंट बनवून ठेवतो की जर उत्तर कोरियाने जर साऊथ कोरियावर हमला केला तर लपायला ती जागा कामी येणार म्हणून।

त्या बेसमेंट मध्ये बाथरूम, फ्रीज सगळी व्यवस्था असते।

त्या जुन्या मेड चा नवरा एका लोन कंपनी कडून पैसे घेतो व त्यांचे अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे खाण्यापिण्याचे वांदे असतात व ते पैसे परत करू शकत नाहीत व त्यामुळे लोन कंपनीचे गुंडे तिच्या नवर्‍याला मारतील म्हणून ती त्याला 4 वर्षांपासून बेसमेंट मध्ये लपवून ठेवते।

व तिची नोकरी गेल्यामुळे तिच्या नवर्‍याला या नोकर लोकांनी मालकाला माहिती न पडता कमीत कमी थोडे जेवण  देत जावे याबद्दल ती जुनी मेड या लोकांना विणवन्या करते ।

पण या गरीब कुटुंबातील लोकांना त्यांची दया येत नाही,  जेव्हा गरीब असताना यांनी अत्यंत हालाखीची परिस्थिती पाहिलेली असते पण त्यांना त्या त्यांच्यापेक्षाही गरीब असलेल्या लोकांची दया येत नाही।

तिने आपल्या नवर्‍याला येथून घेऊन जावे असते ते लोक म्हणतात।

नंतर  त्या जुन्या मेड ला असे लक्षात येते की,  ते नोकर लोक सगळे एकाच कुटुंबातील आहेत व त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी जुन्या लोकांना प्लॅनिंग करून कामावरून काढलेले आहे।  ती त्यांच्या विडियो शूट करते व मालकाला दाखविण्याची धमकी देते।

एवढ्यात मालकाच्या पत्नीचा फोन येतो कि पावसामुळे ते मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कँप ला जाऊ शकले नाहीत व लवकरच घरी पोहोचतील म्हणून,  मग हे चारही लोक त्या जुन्या मेड वर हमला करतात व तिला ही त्या बेसमेंट मध्ये टाकून देतात। या धावपळीत जुन्या मेड ला गंभीर दुखापत होते व तिचा त्यात आतमध्येच मृत्यू होतो।

नंतर हे श्रीमंत कुटुंब परत येते पण त्यांना इकडे काय घडलेले आहे त्याची किंचितही कल्पना नसते।  ते आपल्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्याची योजना ठरवितात।

इकडे श्रीमंत  पती पत्नी चर्चा करत असतात कि गाडीमध्ये त्याच्या ड्रायव्हर ची अंगाची खूप वास येते म्हणून,  ही गोष्ट तो ड्रायव्हर ऐकतो, तेव्हा त्याला खुप खराब वाटते,  एकदा तो मालकीनला मार्केट मध्ये नेत असताना ती श्रीमंत मालकीन त्याच्या अंगाचा वास येतो म्हणून खिकडीची काच खोलते ही गोष्ट ड्रायव्हर अनुभवतो व त्याला हे श्रीमंत लोक खूप खराब आहेत असे वाटायला लागते।

पावसामुळे त्या गरीब कुटुंबाचे संपूर्ण घर पाण्याने भरून जाते त्यांना झोपायला ही जागा नसते पण इकडे श्रीमंत कुटुंबातील लोक पाऊस आला म्हणून बरे झाले म्हणून आनंदित असतात यामुळेच त्यांच्या विचारांतील दरी वाढत जाते।

मग तो गरीब कुटुंबातील मुलगा त्याला वाटते कि त्या जुन्या मेड आणि तिच्या नवर्‍यामुळे यांचे कुटुंब व त्यांच्या नोकर्‍या धोक्यात येतील म्हणून तो बेसमेंट मध्ये त्यांना मारायला जातो।

ती मेड तर आधीच मेलेली असते पण तिचा नवरा या गरीब कुटुंबातील मुलावर प्रतिहल्ला करतो व त्यात तो मुलगा गंभीर जखमी होतो।

नंतर मेड चा नवरा बायकोचा बदला घेण्यासाठी बाहेर येतो व त्या गरीब कुटुंबातील लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो,  बाहेर वाढदिवसाची पार्टी असते तर पहिले तो त्या मुलाच्या आईवर(नवीन मेड) हमला करून तिला जखमी करतो नंतर त्या गरीब मुलाची बहीण (आर्ट टीचर) मोठ्या शिताफीने त्याला मारते पण यात तिचाही मृत्यू होतो।

श्रीमंत मालकाच्या मुलाने मेडच्या नवर्‍याला किचन मधून जेवण चोरताना या अगोदर ही पाहिलेले असते म्हणून तो त्याला भूत समजूत घाबरून कोसळतो,  म्हणून श्रीमंत मालक ड्रायव्हर (गरीब कुटुंबाचा मुख्य) ला गाडी काढण्यासाठी सांगतो पण अश्या अवस्थेत जेव्हा त्याची मुलगी मृत्यू मुखी पडलेली असते आणि पत्नी गंभीर जखमी असते तो गाडी न काढता चाबी त्याच्या दिशेने फेकतो।

जेव्हा तो मालक चाबी उचलायला जातो तेव्हा तो मेड चा नवरा तिथे पडलेला असतो व त्याच्या अंगाची खूप वास येते त्यामुळे त्या मालकाला त्याची खूप किळस येते हे सगळं ड्रायव्हर बघतो।

त्याला त्या मालकाचा खूप राग येतो, तो विचार करतो की अशा परिस्थितीत ही हे श्रीमंत लोक किती घाण विचार करतात,   मग तो तोच ड्रायव्हर म्हणजे गरीब कुटुंबातील मुलाचे वडील त्या मालकाला मारून टाकतो।

यामध्ये छोटीशी लव्हस्टोरी ही आहे त्या गरीब कुटुंबातील मुलाला श्रीमंत कुटुंबातील मुलीवर प्रेम होते ।

गरीब कुटुंबाला फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात येते व त्यांना शिक्षा होती,  त्याची बहीण मरण पावलेली असते व वडील पळून जातात व त्यामुळे आई व मुलाला शिक्षा होते।

नंतर श्रीमंत कुटुंबातील मालकीन तो बंगला एका जर्मन फॅमिली ला विकते तेव्हा तो गरीब मुलगा बंगला बघायला जातो तेव्हा त्याचे वडील याच बंगल्याच्या बेसमेंट मध्ये लपलेले आहेत हे त्याला समजते व मी भरपूर पैसे कमवून तो बंगला विकत घेणार अशा आशयाचे पत्र तो आपल्या वडीलांना लिहीतो।

खरतरं सिनेमा बघताना कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे ठरविणे खूपच अवघड आहे कारण

गरीब कुटुंब आपल्या समस्या सोडविण्यासाठी खोटे बोलतात , त्यांना असे वाटते की श्रीमंत लोक गरीबांची किळस करतात पण ते गरीब लोक ही आपल्या पेक्षा अत्यंत गरीब असलेल्या मेड व तिच्या नवर्‍यावर दया दाखवित नाहीत।

जुनी मेड बद्दल सहानुभूती वाटत असली तरी ती सुद्धा कोणालाही न सांगता आपल्या नवर्‍याला 4 वर्षापासून घरात लपवून ठेवते ।

श्रीमंत कुटुंब ही आपल्या जागेवर बरोबर आहेत असे वाटते पण ते सुद्धा गरीब लोकांची किळस करतात।

खरंतर जीवन जगताना प्रत्येक माणुस हा पँरासाईट आहे,  प्रत्येकाला एकमेकांची गरज पडतेच पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याने त्याचा गैरफायदा घ्यावा।

संपूर्ण जगातील संपत्ती काही ठराविक लोकांच्या हाती एकवटल्याने खूप लोक असे आहेत की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते।

हा सिनेमा आपले डोळे उघडण्यासाठी सांगतो कि जरी तुम्ही श्रीमंत असले तरी प्रत्येक माणसाला जगण्याचा समान अधिकार आहे।

सिनेमा नक्की बघा, खऱ्या सिनेमाची काय लेवल असते हे हा सिनेमा बघितल्यावर कळेल।  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: