दिल्लीकरांनी निवडले पुन्हा केजरीवाल

दिल्लीकरांनी निवडले पुन्हा केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भक्कम यश मिळवत पुन्हा एकदा बाजी मारली आहे।

विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार्‍या आम आदमी पक्षाला दिल्लीतील जनतेने भरभरून दाद दिली व अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीची धुरा सांभाळतील।

भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाला हरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते यात यशस्वी होऊ शकले नाहीत,  आणि काँग्रेस ची अवस्था आणखीनच वाईट झालेली आहे कारण कधीकाळी दिल्ली विधानसभेवर शासन करणारी काँग्रेस एकही जागा मिळवू शकली नाही व त्यांच्या बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर आहे।

दिल्लीतील जनतेने केजरीवाल यांच्या कामाला पसंत दिली व एक नवीन पद्धीतीच्या राजकारणाला सुरूवात झाली, असेच म्हणावे लागेल । पण काहीही असो अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा झपाट्यात दिल्लीकरांची सेवा करावी हीच अपेक्षा।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: