पप्पा कंडोम म्हणजे काय हो?  एका निरागस मुलाचा प्रश्न!!

पप्पा कंडोम म्हणजे काय हो?  एका निरागस मुलाचा प्रश्न!!

आजकालची मुले ही खूपच हुशार आहेत व प्रत्येक वेळेस आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी समोर आहेत असचं नेहमी वाटते,   कारण त्यांना सगळं कळतं ,  सर्व गोष्टींत समोर असतात।  

आपल्या वेळी  साधं शाळेत कोणी एखादी गाणं किंवा कविता जरी म्हणायला लावली तरी डोक्याला घाम फुटायचां कारण डेरिंग च नव्हती मुळी।

आतातरं अशी मुले आहेत कि शिक्षक लोकं शाळेत अभ्यास करून येतात कारण कोण कधी काय विचारणार याची काही गॅरंटी नाही ,बरं असो।

तर लहानं मुलांची जी काहीतरी नवीन शिकून घेण्याची जी इच्छा असते ती खूप जास्त असते कारण त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न येत असतात, हे कसे?  ते कसे ? अश्याप्रकारे।

आपल्याही डोक्यात येत होते पण त्यावेळी आपण कोणाला कसे विचारावे?  कोणी काही बोलेल तर नाही ना? या भीतीनेच ते प्रश्न विचारायचे टाळायचो।  आणि जर कधी काही चुकुन विचारलं तर वडीलांचा मार पक्का च असायचा व शाळेत तर घरचे स्वतःच येऊन सांगायचे की,

“मास्तर पोराला बिनधास्त मारा, घरी ऐकतचं नाही म्हणून। “

तर कदाचित ही भीती आजच्या पिढीला नाही त्यामुळे पोरं डेरिंगबाज झाली आहेत।

तर गोष्ट आहे अश्या डेरिंगबाज मुलाची।

त्याचे लाडाचे नाव आहे घोरू (कदाचित तो झोपेत घोरतो म्हणून ठेवले असेल, खरे कारण माहिती नाही) माझ्या मित्राचा मुलगा । या धकाधकीच्या जीवनात मित्रांची भेट होणे अवघडचं म्हणून एका सुट्टीच्या दिवशी मित्राला भेटायला गेलो , सकाळचे 10 वाजले होते व त्याचा मुलगा घोरू त्याच्या ड्राइंग बुक मध्ये एक चित्र रंगविण्याचं काम करीत होता ,  व आमच्या (मी आणि मित्र) टी वी बघता बघता गप्पा रंगल्या होत्या।

तेवढ्यातचं वहीणींनी (मित्राची बायको)  नाश्ता आणला व मग त्या ही आमच्यासोबत गोष्टी करण्यात सहभागी झाल्या।

तसा माझा मित्र खूप हुशार असून अत्यंत गरीबीमधून त्याने शिक्षण पूर्ण केले व आता खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे व त्याची पत्नी सुद्धा अधिकारी आहे व दोघेही उच्चशिक्षित आहेत व त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा ।

तसा घोरू चा स्वभाव खूप चांगला आहे पण तो नेहमीच काही ना काही विचारत असतो,  त्याला सतत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते,  मोठ्या माणसांच्या गोष्टी अगदी मन लावून तो ऐकतो व त्या गोष्टी मधलं जर काही समजलं नाही तर लगेचच मधात प्रश्न विचारतो।

जसे  तो आपल्या आजीला विचारतो,   “आजी माझ्या मम्मीकडली आजीची साडी वेगळीचं असते तुझी साडी त्यांच्या साडीपेक्षा (लुगडं) वेगळी का आहे? “  ,  “आजोबा ऊन नसताना टोपी का घालतात? “ “तु आजोबांना नावाने हाक का मारत नाहीस? “

तो आपल्या आईला विचारतो,  “मम्मी तु आपल्या आईबाबांकडे का राहत नाहीस?   जसे पप्पा त्यांच्या आईबाबांकडे राहतात! “

तो त्याच्या वडीलांना विचारतो की,  “पप्पा तुम्ही किचनमध्ये जेवण का बनवत नाही, नुसते पेपर वाचता? “ इत्यादी असे भरपूर प्रश्न तो विचारतो।

तर त्याही दिवशी असेच आम्ही बसलो असताना टीवी चालू होता व एक कंडोम ची जाहिरात टिवीवर आली,  घोरू चे अर्धे लक्ष टीवी कडे होते तर आतापर्यंत दोन तीन वेळा ती जाहिरात येऊन गेली होती व तो त्याकडे मोठ्या जिज्ञासेने बघत होता,  त्याला वाटले काय असेल हे?  कशाची जाहिरात असेल?

व नेहमीच्या त्याच्या स्वभावामुळे त्याने प्रश्न विचारला !

“ पप्पा हे कंडोम म्हणजे काय हो ? “

आम्ही तिघेही गोष्टींत व्यस्त होतो,  त्याचा हा प्रश्न ऐकताचं आम्ही अचानक चुप झालो,  त्या क्षणी एक भयानक शांतता निर्माण झाली,  वहिणी पटकन किचनमध्ये गेल्या ,  मित्र आणि मी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो।

काय बोलावे काय सुचत नव्हते म्हणून थोडा वेळ दोघेही गप्पचं बसलो तेवढ्यात त्याने परत प्रश्न तोच केला।  तेव्हा मित्र चिडून बोलला, “तू बाहेर जाऊन खेळ ना जरा “  पण तो आपल्या जिद्दीवर अडून होता।

तेवढ्यात मंदिरात गेलेले घोरु चे आजीआजोबा परतले व घोरू आजोबांना बघताचं त्यांच्या दिशेने धावत गेला व नंतर तो विषय ही तिथेच संपला।

पण आपण जेव्हा शारिरीक शिक्षण किंवा तत्सम विषय मुलांना शाळेत शिकवायचे समर्थन करतो त्यावेळेस त्या गोष्टी कश्या सांगाव्या ? कोणत्या पद्धतीने सांगाव्या ? याचा विचार कदाचित आपण करतचं नाही।

पण हे सगळं सांगायचं ही एक वयं असते ना?  जरी कोणत्याही पद्धतीने सांगितले तरी त्या लहानशा मुलाला कोणी कसे समजावून सांगेल?  त्याचे उच्चशिक्षित असलेले आईवडील त्याच्या या प्रश्नाने गोंधळून गेले होते।

खरं तर आजकाल टिवी वर कधी काय येईल याची काही गॅरंटी नाही  आणि आपण मुलांना टीवी बघु नका असेही म्हणू शकत नाही कारण त्यांना काही करू नको म्हटले तर मुले तेच काम करण्याची जिद्द करतात।

मुळात एका शब्दातं सांगायचे झाल्यास टीवी कुटुंबासोबत पाहावा अशी परिस्थितीचं राहिलेली नाही त्यामुळेच कि काय बरेच लोक बेडरूममध्ये एक एक्स्ट्रॉ  टी वी लावतात की जेणेकरून मुलांसमोर बघताना uncomfortable  वाटू नये म्हणून।

पण या गोष्टीवरून एका गोष्टीचा अनुभव आला की,  आजकालची मुले काहीपण प्रश्न विचारू शकतात त्यामुळे अशी उत्तरे देताना आईवडीलांची तारांबळ उडणार आहे हे नक्कीच।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: