चुकुनही चेहर्‍यावर कोणतीही केमिकलयुक्त क्रिम लावू नका

चुकुनही चेहर्‍यावर कोणतीही केमिकलयुक्त क्रिम लावू नका

मित्रांंनो सुंदर दिसण्यासाठी लोकं वेगवेगळी रसायने चेहर्‍यावर लावतात व काही काळासाठी सौंदर्य चेहर्‍यावर येतेसुद्धा पण नंतर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम आपल्याया पाहायला मिळतात,  तुम्ही बघितले असतील काही लोक खूप सुंदर असतात व समाजात त्यांना सौदर्यां मुळे  जास्त भाव मिळतो पण तेच काही वर्षांनंतर त्यांना बघाल तर त्यांचा चेहरा खराब झालेला असतो,  चेहर्‍यावर काळे डाग पडलेले दिसतात व गाला वर काही भोक पडलेले दिसतील व त्यांच्या नैसर्गिक चेहरा पूर्णतः खराब झालेला दिसतो।

तर असे का होते???

आपल्याकडे सौंदर्य टिकविण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम चेहर्‍यावर लावतात काही काही लोक तर सुंदर असूनसुद्धा अजून सुंदर होण्यासाठी क्रिम लावत असतात,  आता ह्या क्रीम कश्या काम करतात हे ज्याला माहिती होईल तो कधीही यांच्या आहारी जाणार नाही।

केमिकलयुक्त क्रिम कशा काम करतात?

कोणतेही केमिकल आपल्या चेहर्‍याला उजळविण्यासाठी चेहर्‍यावरचे आवरण म्हणजेच लेयर ला काढत असते ती लेयर निघाल्यामुळे चेहरा थोडा लालसर होतो व काही दिवसांनी तो पहिलेपेक्षा चांगला दिसायला लागतो कारण ती वरची चेहर्‍यावरची लेयर निघालेली असते।

जेवढे दिवस आपण उन्हात जाणे टाळतो व चेहऱ्याची काळजी घेतो तेवढे दिवस चेहरा मस्त दिसतो पण जर चुकून का आपण उन्हात गेलो तर त्या त्वचे ची लेयर निघुन गेल्यामुळे आपला चेहरा जळून जातो। कारण सुर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी आपल्या त्वचेला काही नैसर्गिक लेयर दिलेल्या असतात व वरची लेयर जास्त मजबूत असते कारण आपल्या त्वचेच्या संरक्षणासाठी ती रचना केलेली असते । त्वचेची मजबूत लेयर निघून गेल्याने ऊन्हात गेल्यास चेहरा पहिल्या पेक्षा जास्त काळा होतो।

जसे की एक उदाहरण घेऊया –

जेव्हा आपण एखादी लाकूड बघू तर ते आपल्याला त्याच्या रंगाप्रमाणे दिसेल,  जर त्याचं लाकडाला आपण जाळू तर ते लाल होईल व पहिल्या अवस्थेपेक्षा ते जळत असताना अधिक लालसर व आकर्षक दिसेल पण नंतर ते लाकूड पूर्ण जळल्यानंतर ते एखाद्या कोळश्याप्रमाणे दिसेल।  

या सारखेच आपल्या चेहऱ्याचे आहे, पहिले केमिकल आपल्या चेहर्‍याला लाल करतं व परतं काढून टाकते त्यामुळे चेहरा सुंदर दिसायला लागतो पण नंतर त्या चेहर्‍यामध्ये समोर संकटाशी लढण्यासाठी संरक्षण उरत नाही व तो पहिल्यापेक्षा जास्त खराब होतो।

चेहर्‍याला प्रत्येक ठिकाणी भोके असतात ज्याद्वारे घाम निघतो व अनावश्यक असलेली विषारी तत्वे घामाद्वारे बाहेर टाकली जातात त्यामुळेच चेहरा वरून एकदम चोपडा नसतो पण या केमिकलयुक्त क्रीम चेहर्‍याला सुंदर दिसण्यासाठी चोपडे करतात व त्यामुळे चेहर्‍यावरची भोके बुजली जातात व परिणामी पिंपल व इतर समस्या उद्भवतात। कारण भोके बुजल्या मुळे  विषारी तत्वे बाहेर निघायला त्यांना वाट मिळत नाही। व जिथून जागा मिळेल तिथून निघण्याचा प्रयत्न करतात व आपण पिंपल निघाले असे म्हणतो।

निसर्गाने दिलेले त्वचा इतकी सक्षम आहे कि समस्या आली तर ती स्वतःच रिकवर करू शकते,  नुसती त्वचा च नाही तर आपले संपूर्ण शरीर छोट्या मोठ्या समस्या स्वतःच बर्‍या करत असते,

जसे की एखाद्या ठिकाणी काही छोटी शी जखम झाली तर आपले शरीर आँटोमँटिक एक काळी कवच तयार करते व जखम ठीक करते।

आपले शरीर हे वयानुसार म्हातारे होत असते व त़्वचेवर सुरकुत्या पडतात आणि हे नैसर्गिक आहे, पण जर योग्य व्यायाम व सकस आहार असेल तर आपण हे काही प्रमाणात टाळू शकतो।   व म्हातारपणी ही फीट राहू शकतो पण म्हातारपणाला कोणी टाळू शकत नाही।

आपल्या मानेखाली जिथे आपण कपडे घालते व जो भाग उघडा नसतो तो भाग जेवढा गोरा असेल,  तेवढीच उजळपणा आपल्याला मिळू शकते,  त्यापेक्षा जास्त नाही।

जर चेहरा कपडे घातलेल्या भागापेक्षा काळा असेल तर तो सूर्याच्या किरणा मुळे जलला असतो तर तो उजळू शकतो।

नैसर्गिक काय वापरावे?

1 कच्चे दूध  चेहर्‍यावर लावून ठेवल्यास चेहर्‍यावर चमक येते व चेहरा तजेलदार दिसतो।

2 कोरफड हे अत्यंत गुणकारी आहे,  यामुळे चेहरा मुलायम व मऊ होतो।

3  हळद सुद्धा अत्यंत गुणकारी आहे,  प्राचीन काळापासून हळदी चे महत्त्व आहे

4 आवळा त़्वचेसाठी खुप गुणकारी,  पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने चेहरा सुंदर दिसतो,  पेस्ट करणे शक्य नसल्यास ज्युस पिले तरी फायदा होतो।

असे भरपूर नैसर्गिक उपाय आहेत ज्याद्वारे चेहर्‍याला आपण दीर्घकाळ सुंदर ठेवू शकतो।

सोबतच सुंदर दिसण्यासाठी आपले अंतर्मन सुद्धा चांगले असणे आवश्यक आहे कारण आपल्या अंतर्मनाचा प्रभाव चेहर्‍यावर झळकत असतो।

जसे की – एखादा व्यक्ती खूप खूष आहे, त्याचा परिवार सुखी आहे तर ते त्याच्या चेहऱ्यावर दिसते।

काही लोक नाराज असतात,  दुःखी असतात, घरी पैशांचा प्राँब्लेम असतो तर त्या गोष्टी त्यांच्या चेहर्‍यावर दिसतात व परिणामी चेहर्‍यावरचे सौंदर्य गायब होते।

तर सौंदर्य जपण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खुष राहणे शिकावे लागेल,  समाधानी राहणे शिकावे लागेल,  प्रगती करण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी तणावात जीवन जगू नये।

उदाहरण घ्यायचे झाल्यास एखादा संन्यासी बघा तो जंगलात राहतो ,मोहमायेचा त्याग करतो तर त्याच्या चेहऱ्यावर एक अलग प्रकारचे तेज असते।

ते कधी कोणती क्रीम लावतात का?  नाही ना।

तर जेवढे आपले अंतर्मन साफ राहील तसेच चेहर्‍यावर दिसेल म्हणून आतून खुष राहण्याचा प्रयत्न करा, तुमचं सुख तुमच्या चेहऱ्यावर दिसेल।

आपल्या जवळचे काही पाळीव प्राणी बघा जसे बैल, कुत्रा यांचे चेहरे नेहमी फ्रेश असतात जरी ते रोज आंघोळ करीत नाहीत,  जरी ते कोणतीही क्रीम लावत नाहीत तरीसुद्धा सुंदर दिसतात त्याचे कारण एकच  ते म्हणजे ते प्राणी कसलही टेंशन घेत नाहीत,  सुखी समाधानी असतात म्हणून सुंदर दिसतात।

कोणतीही क्रीम लावून जर माणूस सुंदर झाला असता तर रजनीकांत गोरा झाला असता ना????  मायकेल जँक्सन ला गोरं होण्यासाठी एवढ्या सर्जरी करा़व्या लागल्या असत्या का? हो कि नाही।

आता ह्या सौंदर्य प्रसाधनांच्या एवढ्या जाहीराती का येतात?

तर हा एक खूप मोठा व्यवसाय आहे व लोकांना सुंदर दिसायला आवडते,  प्रत्येकाला मी खुप चांगले दिसावे असे वाटते म्हणून हा व्यवसाय खूप मोठा झाला।

आता मोठमोठ्या कंपन्या इतके महागाचे उत्पादने बनवितात मग त्या उत्पादनाच्या विक्रिसाठी मोठमोठ्या जाहिराती केल्या जातात,  कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती मध्ये नैसर्गिक सुंदर असलेल्या व्यक्तींलाच घेतले जाते,  कधीही कुरूप दिसणाऱ्या व्यक्तीला क्रीम लावून गोर बनवून दाखवतं नाहीत।

तर या खूप मोठ्या व्यवसायाला टिकविण्यासाठी अशा जाहिराती केल्या जातात कि जेणेकरून लोकांना वाटते की अमुक तमुक उत्पादन वापरणे जरूरीच आहे,  त्यामुळे यांचा सेल वाढतो व कंपन्या कोट्यवधी रूपये कमवितात।

पुन्हा एक गोष्ट नुसते गोरे असणे म्हणजे सुंदर दिसणे होत नाही , गोर्‍या लोकांपेक्षा काही सावळे लोक हि चांगले दिसतात

कधीकधी खूप गोरे असणारे लोक खूप चांगले दिसत नाहीत

,  सौंदर्य हे आपल्या शरीराच्या रचनेवर अवलंबून असते आपल्या रंगावर नाही।

तर मित्रांनो सांगायचा एकच उद्देश आहे कि कोणतीही केमिकल युक्त क्रीम माणसाला दीर्घकाळ सुंदर बनवू शकत नाही। आपली त्वचा जशी नैसर्गिक आहे तशीच राहणार आहे।

आपले सौंदर्य टिकविणे हे आपले खानपान,  व्यायाम, मनाची शांती, घरचे वातावरण,  आपण कुठल्या वातावरणात राहतो व काम करतो या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: