जेव्हा नैतिकतेचे धडे देणारा शिक्षक भेटला सिनेमागृहात ,

जेव्हा नैतिकतेचे धडे देणारा शिक्षक भेटला सिनेमागृहात ,

इमरान हाश्मी चा मर्डर सिनेमा बघताना।

गोष्ट 16 वर्षांपूर्वीची आहे तेव्हा वसतीगृहात राहून मी शिक्षण घेत होतो तेव्हा वसतीगृहाचा वार्डन ज्याला आम्ही सर म्हणायचो तो एक उत्तम वक्ता होता व वसतीगृहात राहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावणे,  त्यांना खूप सारे ज्ञान देणे व इतर बाबींविषयी विद्यार्थ्यांना मदत करणे हे त्याचे काम होते।

सोबतच तो खाजगी शिकवणी वर्ग ही घेत असे त्यामुळे सर्व वसतीगृहातील व इतर बाहेरची विद्यार्थी त्याच्या ट्युशन क्लास ला होते,  त्या व्यक्ती जवळ भरपूर ज्ञान होते त्यामुळे तो सामाजिक बांधिलकी च्या नात्याने विद्यार्थी घडविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करी।

मुलींच्या मागे लागल्याने आयुष्य कसे खराब होते व इतर व्यसने किती खराब असतात याबद्दलही विद्यार्थ्यांना जागरूक करीत असे।

या कामासोबतच तो एक धार्मिक शिक्षक ही होता जो लोकांना दुःखापासून कशी मुक्ती मिळेल?  इत्यादी गोष्टींचे ज्ञान द्यायचा। मुळात तो एक अत्यंत चांगला माणूस होता।

पण त्या वर्षी इमरान हाश्मी चा मर्डर पिक्चर आला होता, त्या सिनेमात इमरान व मल्लिका शेरावत चे अत्यंत बोल्ड सिन होते त्यामुळे तो सिनेमा खूप चर्चेत होता।

तेव्हा आजच्या सारखे युट्यूब , फेसबुक ची क्रेज नव्हतीच इंटरनेट  खूप महाग होते व लोकांजवळ मोबाईल फोन ही नव्हते,  काही काही लोक जे खूप श्रीमंत होते त्यांच्या कडे च मोबाईल होते त्यामुळे मर्डर सारखा सिनेमा बघणे म्हणजे कोणाला सांगायला शरम येई।

लोक तो सिनेमा बघायला तोंडाला बांधून जात होते,  अशी परिस्थिती आमच्या इकडे होती तर आम्ही काही वसतीगृहातले मित्र मिळून सिनेमा बघण्यासाठी गेलो,  सिनेमा सुरू झाला व इंटरवल मध्ये लाईट सुरू झाले तेव्हा तो आमचा ज्ञानी शिक्षक आम्हाला दिसला,  कारण थिएटरमध्ये जास्त गर्दी नव्हती।

कदाचित त्याला दिसू म्हणून आम्ही तिथेच लपून गेलो व त्याला न दिसण्यासाठी प्रयत्न करू लागलो।

परत इंटरवल नंतर लाइट बंद झाले व आम्ही सुटकेचा श्वास घेतला।  सिनेमा सुटल्यानंतर तो व्यक्ती जो आमचा शिक्षक होता एका थिएटर समोरच्या पानटपरीवर गेला व सिगरेट ओढायला लागला व आम्ही तो काय काय करतो हे बघत होतो।

त्यादिवशी आयुष्यात एका गोष्टीचा अनुभव आला कि लोक जसे दुसऱ्याला बनायला सांगतात तसे स्वतः असतीलच याची काही गॅरंटी नाही।   

नंतर त्या शिक्षकाने शेवटी आम्हाला बघितलेचं पण कोणालाही सांगितले ही नाही कारण त्याचासुद्धा भांडाफोड होईल याची त्याला भीती होती।

पण काहीही असो तो कसेही वागत असला तरी मुलांना मात्र त्याने चांगलेच मार्गदर्शन केले,  पण निदान माझेतरी असे वैयक्तिक मत आहे की आपण जे लोकांना सांगतो त्यानुसार स्वतः वागावे तरचं दुसऱ्यांना सांगण्याचा काहीतरी फायदा होईल।

तेव्हापासून आजपर्यंत कधीच कोणत्या ज्ञानी व्यक्तीवर मला भरोसा वाटला नाही, कदाचित मी चुकीचा असेन पण कोणावर विश्वास ठेवावासा वाटतचं नाही।

शिक्षक का  मर्डर सिनेमा बघत होता?  किंवा त्याने सिगरेट का ओढली?  या गोष्टींचा त्याला कोणीही विरोध करू शकत नाही कारण ते त्याचे वैयक्तिक प्रश्न आहेत ।

पण स्वतः तो जे करत होता ,त्याचं गोष्टी किती वाईट आहेत हे तो लोकांना सांगायचा म्हणजे लोका सांगे ब्रम्ह ज्ञान व स्वतः कोरडे पाषाण।  

खरं त्यादिवशी आम्ही वसतीगृहात जाऊन खूप जोराजोरात हसत होतो कारण आमचा महान शिक्षक पण मर्डर पाहायला होता,  आजपण जेव्हा मित्र भेटतात तेव्हा मर्डर वाल्या मास्तरची याद आल्याशिवाय राहत नाही व जेव्हा जेव्हा या गोष्टींची चर्चा होते तेव्हा आम्ही मनसोक्त हसतो।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: