हैप्पी,  हार्डी आणि हीर

हैप्पी,  हार्डी आणि हीर

हिमेश रेशमियाचा हैप्पी,  हार्डी and हीर हा सिनेमा हा कधी आला व कधी गेला हे लोकांना कळले पण नाही,  नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा हिरो म्हणून हिमेश ला लोकांनी पुन्हा नाकारले आहे।

रानू मंडल कडून गाणे म्हणवून घेतल्यानंतर या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती पण टिकिट खिकडीवर गर्दी खेचण्यात चित्रपट अयशस्वी झाला आहे।

कथा

हैप्पी एक सतत खुश राहणारा व्यक्ती आहे जो हीर वर प्रेम करतो,  हैप्पी ला कशाचेही टेंशन नसते त्याच्या आयुष्यात काय चालले आहे,  तो काय करणार आहे इत्यादी कशालाही तो सिरियसली घेत नाही।

हीर वर हैप्पी चे प्रेम असले तरी हीर मात्र त्याला एक फक्त मित्र समजते।

हीर ला एक असा व्यक्ती हवा असतो जो आयुष्यात ज्याने काहीतरी नाव कमावले आहे,  ज्याचे स्वतःचे काहीतरी कर्तुत्व आहे ।

नंतर येतो हार्डी,  हार्डी हा एका व्यावसायिक कुटुंबातील गुजराती तरूण असतो जो जसा हीर ला पाहिजे आहे तसाच असतो,   हीर ला ही तो आवडतो व हार्डी सुद्धा हीर च्या प्रेमात पडतो।

असा हा love triangle आहे,    सिनेमा पाहताना  हिमेशचा एखादा नवीन अलबम बघत आहो कि काय असेच वाटते कारण सिनेमात भरपूर गाणी आहेत व गाण्यांमध्ये स्टोरी फीट करण्यात आली आहे .

हिमेशला वारंवार लोकांनी हिरो म्हणून नापसंत केले आहे तरी तो वारंवार का  हिरो बनायचा प्रयत्न करतो? हे समजण्यापलीकडे आहे।

अँक्टिंग फक्त हिरोईन ने थोडीफार केलेली आहे,  आपला हिरो तर गाण्यामध्येच व्यस्त होता।  

का पाहावा????
अगदी कोणी फुकट दाखवत असेल तरी बघु नका आणि गाणी बरी आहेत जर बघायची असतील तर युट्यूब आहेच जिंदाबाद।।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: