विकून टाक (मराठी)

सध्या जोरदार चर्चेत रंगलेल्या चित्रपटाची एकच सगळीकडे धुम उडत आहे, तो मराठी चित्रपट म्हणजे “विकून टाक”. काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली अर्थातच ही बाब रसिकप्रेक्षकांसाठी खूप उत्तम पर्वणी ठरली आहे. बाॅलिवूड विश्वात भरपूर नाव कमावलेले “चंकी पांडे” या चित्रपटामधून मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. अर्थातच त्यांच या चित्रपटातील काॅमिक पात्र मनावर वेगळा ठसा उमटवून जातं; परंतु तेवढ्या आत्मियतेने ते पात्र उमटल्या गेलं नसल्याने जरा खेद वाटत राहतो. ह्या चित्रपटाच्या लेखकाने योग्य घटकांची सिनेमा उभा करण्यासाठी घेतलेली मेहनत सार्थ झाल्याचंच बऱ्याअधिक प्रमाणात दिसत आहे.

चित्रपटाच्या लेखकाने सिद्धेश्वर एकांबे यांनी याआधी एकांकीकेच्या माध्यमातून छान वर्चस्व सिद्ध केलं होतं परंतु त्याला साजेशी छाप जरा फिकी पडली म्हणावी लागेल. “विकून टाक” चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी याअगोदर हास्यविनोदी लहेजाचे चित्रपट योग्यरीत्या हाताळले आहेत. जरी त्यांची खुबी त्यात असली तरी इथे नार्मल प्रमाणात ते कमी पडल्याच जाणवतं राहिलं.

मुळात चित्रपटाचा सर्वेसर्वा असलेला व्यक्ती मुकुंद थोरांबे हा दुबईमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणारा मुलगा आपल्या लग्नासाठी भारतात येतो. तथापि, त्याचे वडील बँक कर्जाची भरपाई करण्यात सक्षम न ठरल्याने ते आत्महत्या करतात. त्यावर पुढे बँक अॅक्शन घेत मुकुंदची संपत्ती जप्त करते आणि लग्नाच्या दिवशी मुकुंदचे सासरे परत येताथ. हताश झालेला मुकुंद आपली किडनी विक्रीसाठी ठेवतो. किडनी रॅकेट, बँकेचा दबाव आणि त्याला आवडणार्‍या मुलीच्या संघर्षात तो अडकून पडतो. मुकुंदचा संघर्ष हा या कॉमिक सिस्टमच्या पळवाटांवर वठवला गेला आहे.

“विकून टाक” चित्रपटाची कथा सुरवात ते शेवट धरून चालणारी आहे. कुठे काही भरकटल्याचं फारसं जाणवत नाही; परंतु चित्रपट अजून उत्तमरित्या साकारता आला असता हे निश्चित आहे. चित्रपटातील इतर व्यक्तिरेखेंबद्दल मत व्यक्त करायचं म्हणाल तर “समीर चौघुले” नेहमीप्रमाणेच त्याला तोड नाही. तो आॅनस्क्रीन झाला आणि त्याने जिंकलं, हे गणित जुळून येतचं. चित्रपटातील मुकुंदचा मित्र ( कान्या ) जी भुमिका पदार्पण केलेला अभिनेता रोहीत माने हा साकारतोय त्याने त्याच्या परीने उत्तमच अभिनय दिला म्हणावं लागेल. सोबतच मैत्रीणीच पात्र (धनश्री) थोडक्यात राधा हीदेखील छान काम करते. पुढे इतर पात्रांसोबतचा जो प्रवास घडत जातो त्यात तुम्हाला विनोदाच्या पंचेसची भडीमार आहे, हे नक्कीच.

या साऱ्यातून खऱ्या अर्थाने सांगायच तर इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित करून घेण्यासाठी आणि मुळात स्वत:हून ताणतणाव हरून दुसऱ्याच्या ताणतणावाची खमंग रेसिपी अनुभवायची असेल तर जा आणि नक्की पहा “विकून टाक” आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. सोबतच तुमच्या दैनंदिन जीवनाच्या टेन्शन्सना तुम्ही इथे “विकून टाका”.
कथेसाठी एकूण गुणांकन:- ३/५
एकून अभिनयासाठी:- ३.५/५
दिग्दर्शन आणि मांडणी:- २.५/५
ओव्हरआॅल चित्रपट:- ३/५

By किरण बंडू पवार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: