असा मुख्यमंत्री होणे नाही!

असा मुख्यमंत्री होणे नाही!

लोकशाहीत राजकीय नेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ते लोकांचे पुढारी असतात, लोकांसाठी काम करतात व ज्या गटाचे नेतृत्व करतात त्या गटातील लोकांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी घेऊन कसलीही इच्छा न बाळगता समाजसेवा करत असतात।

ही झाली कालच्या म्हणजे होऊन गेलेल्या नेत्यांची गोष्ट अश्याप्रकारचे नेते आता नामशेष झालेले आहेत आता जिकडेतिकडे भ्रष्टाचार, जातीवाद ,गुंडगिरी आणि फक्त पैशांच्या मागे धावणारे नेते च मिळतात ।

याच विषयाला अनुसरून मुख्यमंत्री कसा असावा, त्याने कश्या पद्धतीने काम करावे ह्या सगळ्या गोष्टी एका सिनेमाच्या निमित्ताने मागच्या वर्षी पाहायला मिळाल्या एका दाक्षिणात्य चित्रपटातून।

सिनेमाचे नाव “ भरत अने नेनु “ त्याचा अर्थ म्हणजे मी भरत आहे,   म्हणजे जेव्हा एखादा मंत्री संविधान समक्ष शपथ घेतो ना तेव्हा सुरूवात करताना जसे स्वतःचे नाव घेतो त्याप्रमाणे या सिनेमाचे टायटल आहे।

आता या अगोदर  आपल्या कडे या विषयावर अनिल कपूर चा नायक चित्रपट येऊन गेला पण भरत अने नेनु नायक पेक्षा वरच्या लेवल चा आहे । नायक सिनेमा ही छान होताच पण भरत अने नेनु ला तोड नाही।

कथा

महेश बाबू हा एका राजकीय नेत्याचा मुलगा असतो,  त्याचे वडील व प्रकाश राज मिळून एक राजकीय पक्ष  काढतात।  प्रकाश राज पक्षाचे अध्यक्ष असतात तर महेश चे वडील मुख्यमंत्री बनतात।

महेशच्या आईचे लहानपणी च निधन होते, त्याची आई त्याला माणसाने खोटे वचन कधी देऊ नये व दिलेले वचन पाळावे याबद्दल शिकवण देते।

काही दिवसांत आईच्या मृत्युनंतर त्याचे वडील मुलाला आईचे प्रेम मिळावे म्हणून दुसरे लग्न करतात पण सावत्र आईचे प्रेम त्याला मिळत नाही।

नंतर तो लहानपणीच लंडनला शिक्षणासाठी जातो,  शिक्षणात तो अतिशय हुशार असतो। व तिथेच सेटल होण्याचा विचार त्याच्या मनात असतो।

वडीलांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर जेव्हा पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू होते तेव्हा प्रकाश राज भरतला पक्ष वाचविण्यासाठी मुख्यमंत्री बनवितो।

भरत मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व प्रथम वाहतूक नियमांबद्दल कडक कारवाई करतो,  नियम मोडणाऱ्या व्यक्ती ला हजारो रूपयांचे चालान आकारण्यात येते,  याचा उद्देश पैसे वसूली नसून लोकांनी नियमांचे पालन करावे हा असतो।

भरत कामाचा धडाका सुरू करतो त्यामुळे विरोधी पक्षासोबतच त्याच्या स्व पक्षातील लोक सुद्धा त्याच्या वर नाराज होतात।

गावोगावी दौरे करणे, अति पैसे वसूली करणारे काँन्वेंट स्कूल बंद करणे,  जिल्हा परिषद शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण देणे,  कधी कधी तर तो स्वतः शाळेत वर्गात जाऊन बसतो व शिक्षक कसे शिकवितात ते बघतो।

एकदा त्याच्याकडे काही ग्रामीण भागातील मुले त्यांच्या भागातील गुंड आमदाराची तक्रार घेऊन येतात तो भरत च्या पक्षातील नेता असतो

पण भरत त्या तक्रार घेऊन आलेल्या मुलाला अपक्ष  उभा करून निवडणुकीत त्याला मदत करतो।

नंतर प्रकाश राज चे दुसर्‍या पक्षातील नेत्यांशी संबंध असून त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे व भरतच्या वडीलांचाही त्यानेच खून केलेला असतो, भरत या सगळ्या गोष्टींचा निडरतेने सामना करतो।

तो ग्रामीण भागातील विकासासाठी डायरेक्ट निधी देतो त्यामुळे प्रत्येक गाव स्वतःचा विकास करतो त्यांना आमदारांची वाट पाहावी लागत नाही।

लोकांना समजेल असे सोप्या शब्दांत बजेट बनवितो, भरतचा प्रत्येक निर्णय हा लोकांसाठी असतो व अल्पावधीतच तो लोकप्रिय होतो,  लोक त्याच्यासाठी जीव द्यायला पण तयार होतात।

चित्रपटात कियारा अडवाणी भरत च्या गर्लफ्रेंड च्या रोल मध्ये आहे जी एका पोलिस कॉन्स्टेबल ची मुलगी असते। तिला अतिशय साधे व सुसंस्कृत दाखविण्यात आले आहे,  या चित्रपटात तिला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल ।

चित्रपटात एक्शन सीन भयानक व नवीन टाइप चे आहेत त्यामुळे प्रत्येक सीन अंगावर काटा आणणारा आहे,  सोबत त्याचे डायलॉग ही अतिसुंदर आहेत,  पिक्चर डबिंग वर्जन जरी बघितला तरी एवढी फिलिंग येते तर ओरिजिनल हिंदी असता तर काय झालं असत हे सांगता येणं ही अशक्य आहे।

सिनेमाचे म्युझिक, डायरेक्शन, अँक्टिंग, कँमेरावर्क सगळंच अप्रतिम आहे।

का पाहावा???

फक्त पाहा आणि पाहाचं हा सिनेमा जर सोडला तर खूप काही मिस करालं।

रेटिंग  ५/५

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: