अर्बन नक्षलवाद आणि राजकारण

अर्बन नक्षलवाद आणि राजकारण

महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या केसेसपैकी एक म्हणजे, भिमा कोरेगावचं दंगल प्रकरण. नुकतीच या प्रकरणाला एका वेगळ्या प्रकारची दिशा मिळताना दिसत आहे. जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांनी या प्रकरणाचा तपास जेव्हा पुन्हा सुरू करण्यास सांगितला तेव्हा राज्य सरकारने जसा यात हस्तक्षेप केला तसाच केंद्र सरकारकडून हा तपास थेट त्यांच्या आख्यायितीत घेण्यात आला आहे. मुळात हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप बऱ्याच जणांना निराशेचा ठरला असला तरी काही बाजूंचा विचार केल्यास काही नवी समीकरण आता उलगडण्याची शक्यता दिसत आहे. आणि या तपासणीत नुकत्याच हाती आलेल्या एका चिठ्ठीवरून बरेच मतभेद सुरू आहेत. मुळात भिमा कोरेगावचं दंगल प्रकरण ते थेट पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाची चिठ्ठी यांचा ताळमेळ सर्वासामान्यांना बसणं नक्कीच कठीण आहे. मंगळवारी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरातील विविध ठिकाणाहून पाच जणांना अटक करण्यात आली होती व त्यानंतर या ‘अर्बन नक्षल’ची जोरदार चर्चा सुरू आहे. हे अर्बन नक्सलवाद म्हणजेच माओवाद्यांची एक प्रकारची रणनीती आहे; ज्यात शहरांमध्ये नेतृत्व शोधणे, संघटना एकत्र करणे, संघटना आयोजित करणे आणि लोकांना एकत्र करणे आणि सर्व  प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कार्य आहे. सद्यस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा असा विश्वास आहे की, माओवादी शहरांमध्ये आपले नेतृत्व शोधत आहेत. असे मानले जाते की, यामुळेच अनेकदा माओवादी नेते हे सुशिक्षित असतात. जानेवारीत घडलेल्या भीमा-कोरगाव दंगली प्रकरणात पुणे पोलिसांनी वारवारा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वर्नन गोंजालविस आणि अरुण परेरा यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांकडून एक चिठ्ठी सापडली असून त्यात पंतप्रधानांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. मुळात हा कट अर्बन नक्षलवाद्यांनी रचला असण्याची शक्यता रचून पाच जणांना सरकारच्या ताब्यातच ठेवले आहे.


               सध्या तरी केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार असा काहीसा हा प्रश्न उभा राहिला आहे, शरद पवारांच्या मते राज्यात घडलेल्या घटनेची चौकशी ही राज्यामार्फतच विना हस्तक्षेप होऊ द्यायला पाहिजे होती, परंतु केंद्र सरकार मात्र त्यात मुद्दाम हस्तक्षेप करतयं की काय? अशी चिन्हेही इथे स्पष्ट होऊ लागली आहेत. पण या सर्व घटनांमधे एक मूळ नवी दिशा समोर आली आहे ती म्हणजे, “अर्बन नक्षलवाद”. आपल्या सर्वांनाच नक्षलवादाविषयी इतकचं ज्ञात असेल की, त्यांचा प्राथमिक लढा हा केवळ पर्यावरण, जमीन, वने व त्यांचे स्वतंत्र हक्क यांसाठी  राहिला आहे. परंतु गेल्या काही काळात नक्षलवाद्यांचा बऱ्याच पक्ष्यांनी राजकारण हस्तक्षेप करून पाहिजे तसा त्यांचा वापर करून घेतला. मुळात नक्षलवाद्यांना खतपाणी कोण घालतं? यावर अजूनही बरेच मतभेद आहेत. पत आता जरा आतंकवादापेक्षा देशावर मोठ संकट हे “अर्बन नक्षलवादाच्या” रूपाने तयार होऊ घालतयं असं म्हणावं लागेल. ठराविक शहरात आपले धागे दोरे जुळवून काही कट रचले जात असतील तर ते नक्कीच देशाच्या हिताच्या पथ्यावर न पडणारं षडयंत्र म्हणावं लागेल. या सर्व घटनांमधे आता प्रश्न असा उरतोय की, आपल्या देशाने आंतर्गत शत्रूंपासून आपल सरंक्षण कशा प्रकारे करावं? “अर्बन नक्षलवाद” नक्कीच देशाला लागलेली भ्रष्टाचारासारखीच भयानक कीड म्हणावी लागेल. अर्बन नक्षलवादाला तसेच मुळासकट नक्षलवादालाच मिटवण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू व्हायला हवे आहेत.

याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे, ती म्हणजे ज्या लोकांना पकडले गेले ते खरचं अर्बन नक्षलवादी किंवा त्यांचे साथीदार आहेत का? याचीही सखोल चौकशी व्हायलाच हवी कारण भारतीय राजकारणात नेहमीच सरकारला विरोध करणाऱ्या लोकांना कुठल्या तरी प्रकरणात गोवण्यात येते हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे।

त्यामुळे या प्रकरणात समोर काय होणार याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे।


By- किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: