खरा शिवभक्त

जो कधीही कोणाच्या आईबहीणीवर वाईट नजर ठेवत नाही तो खरा शिवभक्त।

जो कधीही देशाशी बेईमानी करीत नाही, भ्रष्टाचार करीत नाही तो खरा शिवभक्त।

जो लाख कुप्रवृत्तींच्या लोकांविरुद्ध लढतो तो खरा शिवभक्त ।

जो जातीभेद करत नाही व कुठल्याही धर्माचा अपमान करत नाही तो खरा शिवभक्त।

जो लोकांसाठी व जनतेच्या फायद्यासाठी काम करतो तो खरा शिवभक्त।

जो भगव्याचं व आपल्या धर्माचं नाव कधीही खराब होणार नाही याची काळजी घेतो,  तो खरा शिवभक्त।

जो आपल्या ताकदीचा प्रयोग फक्त चांगल्या कामासाठी करतो व आपल्या हुद्द्याचा व पदाचा गैरफायदा घेत नाही तो खरा शिवभक्त।

भलेही लाख संकटे  येतील तरी जो निकराने लढतो व कधीही हार मानत नाही तो खरा शिवभक्त।

जो नेहमी सत्याची बाजू घेतो तो खरा शिवभक्त।

आपल्या घरातील, नात्यातील किंवा कोणीही जवळची व्यक्ती जर चुकीचे काम करीत असेल तर त्याला स्वतःच जो शिक्षा करील तो खरा शिवभक्त।

ज्याचे चारित्र्य स्वच्छ आहे तोच खरा शिवभक्त।

आणि ज्याच्या नसानसांत छत्रपती शिवाजी महाराज सामावलेले आहेत तो खरा शिवभक्त।

चला या शिवजयंती च्या निमित्ताने  एक शपथ घेऊया की कधीही आपल्या देशाला, समाजाला व लोकांना आपल्या पासून काहीही त्रास होईल असे काम आपण करणार नाही।

आपले प्रत्येक पाऊल हे  देशाच्या विकासासाठी व जनतेच्या भल्यासाठी असेल।

छत्रपती शिवाजी महाराज की जय।

जय भवानी जय शिवाजी।
© fbpage/marathi cine review

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: