बँक चेक द्वारे पैशाची देवाणघेवाण करता काय ? तर ही खास माहीती तुमच्यासाठी।


चेक किती प्रकारचे : TYPES OF CHEQUES असतात ?


CHEQUE काय आहे?

जेव्हा आपण पैशाची देवाणघेवाण करीत असतो त्यावेळी एक काँमन शब्द ऐकायला मिळतो तो म्हणजे चेक,  बरेच पैसे देणारे माझ्याकडून चेक घेऊन जा किंवा तुला चेक पाठवितो असे बोलतात।

तर हा चेक म्हणजे एक नोटेसारखे कागद आहे पण या कागदाला भरपूर महत्त्व आहे कारण ह्या कागदाची किंमत त्यावर लिहिल्या गेलेल्या रकमेवरून माहिती होत असते ।

जेव्हा एखाद्याला डायरेक्ट कँश न देता त्याला त्याच्या बँक अकाउंट मध्ये पैसे द्यायचे असते त्यावेळेस चेक हे माध्यम वापरले जाते।

बँक खात्यात पैसे देण्यासाठी वापरण्यात येणारा कागद म्हणजे चेक होय, कोणत्याही चेक तो चेक देणाऱ्याची सही,  तारीख, ज्याला चेक दिलेला आहे त्याचे किंवा त्या कंपनीचे नाव व तो चेक किती रूपयांचा आहे हे शब्द व अंकात लिहीलेले असते।

प्रत्येक दिला जाणारा चेक हा वेगळ्या प्रकारचा असतो , चेक वटविण्याची पद्धत, ठिकाण व चेक ची गॅरंटी आणि चेकवर असणारी किंमत याआधारे चेकचे वेगवेगळे प्रकार आहेत।  ते बघुया।।।।

  1. एखाद्या विशिष्ट स्थान किंवा ठिकाणावरून पडणारे चेकचे प्रकार
  1. Local Cheque

ह्या प्रकारचा चेक एका विशिष्ट शहरापुरताच मर्यादित असतो, म्हणजे तो चेक ज्या शहरात दिला गेला आहे तिथल्याच कुठल्याही बँक शाखेत तो क्लियर होतो त्याला लोकल चेक असे म्हणतात,

जर अशा प्रकारचा चेक दुसर्‍या शहरात क्लियर करायचा असेल तर आपल्याला अतिरिक्त बँकिंग चार्जैस द्यावे लागतात।             B)  Outstation Cheque

जेव्हा local cheque ला संबंधित शहराच्या बाहेर जाऊन वटविले जाते तेव्हा त्यालाच outstation cheque  असे म्हणतात, यासाठी बँक  fixed bank charges  घेत असते।

             C) At par Cheque

हा असा चेक असतो कि चेक दिलेल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत वटविता येतो व त्याला कोणत्याही प्रकारचे  extra charges  लागत नाही।

आजकाल जवळपास सर्वच बँका multicity chequebook  ची सुविधा देत आहेत ।             

              2) किंमतीच्या आधारावर पडणारे चेकचे प्रकार

Gift cheque  ची किंमत 100 रु. पासून 10,000 रुपये पर्यंत असू शकते।                 3)चेक वटविण्याच्या पद्धतीनुसार चेक चे प्रकार  


          A) Open Cheque

खुला चेक हा अश्या प्रकारचा चेक असतो ज्याला बँकेत  सादर केल्यानंतर काउंटर वर च पैसे मिळतात ,अश्या प्रकारच्या चेक च्या Clarence साठी आपल्याला वाट बघावी लागत नाही . गीव एंड टेक या पद्धतीने यामध्ये झटपट काम होते …..ओपन चेक असल्यास आपण चेक दाखवून तुरंत पैसे काढु शकतो किंवा चेक च्या मागे सही करून दुसर्‍या व्यक्तीला  authorize करू शकतो, ओपन चेक द्वारे बँक ट्रान्सफर पण लवकरच होते।


                   B) Bearer Cheque

बिअरर चेक असा चेक आहे जो account holder चा कोणताही प्रतिनिधि बँक मध्ये जाऊन त्याला वटवू शकतो, अशा प्रकारचा चेक  देते वेळी चेक च्या मागे पीछे सही करायची आवश्यकता नसते आणि फक्त चेक दिल्यानंतर पैसे मिळून जातात . हे चेक खुप risky असतात कारण जर चेक हरविला तर एखाद्याला भेटल्यास तो बँकेत जाऊन पैसे काढु शकतो।


                      C)  Crossed Cheque

क्रॉस्ड चेक एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे लिहीला जातो आणि या चेक च्या डावीकडे वरच्या बाजूला दो रेषा ओढल्या जातात, ज्यांच्या मध्ये “& CO.” or “Account Payee” or “Not Negotiable” असे लिहीले जाऊ शकते किंवा बहुतांश वेळा काहीही लिहीले जात नाही।

या चेक नी बँक मधून पैसे काढता येत नाही , याद्वारे ठराविक  रक्कम ही  त्या  व्यक्ति/संस्थे च्या खात्यात जमा करण्यात येते।

                    D)  Order Cheque

Order cheque मध्ये “bearer” हा शब्द कापून  त्याच्या जागेवर “order” असे लिहीले जाते, यामध्ये ओपन चेक प्रमाणेच चेक नी आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करता येतात किंवा चेक च्या मागे सही करून अन्य व्यक्तीला authorize करता येते।       4) गॅरंटी च्या आधारावर चेक चे प्रकार

  1. Self Cheque

    सेल्फ चेक तो चेक असतो ज्यामध्ये बँक अकाउंट होल्डर स्वतः चेक घेऊन बँक मध्ये जातो आणि जर तर पैसे काढायचे असतील तर चेकवरती  “for self” असे लिहीतो।

               B)  Post-dated Cheque (PDC)

पीडीसी हा एक समोर तारखीसाठी देण्यात येणारा चेक असतो ज्यामध्ये समोरील दिवसांची तारीख टाकल्या जाते, म्हणजे हा चेक लिहिलेल्या तारीखवर किंवा त्यानंतर क्लियर करता येतो,  advance  व्यवहार करण्यासाठी पीडीसी चा उपयोग होतो,   समोरील होणारे व्यवहार न विसरता ही करण्यासाठी लोक पीडीसी देत असतात,  कधी कधी चेक देणार्‍या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे नसतात व समोरील काही दिवसांत ते येणार असतात, त्यावेळी ही समोरील तारीख टाकून पीडीसी देण्यात येतो।                C) Ante-dated Cheque (ADC)


हा मागील तारीख चेक असतो, या चेक ला लिहीलेल्या तारखीच्या तीन महिने पर्यंतच्या मुदतीत क्लियर करता येतो,  कधी कधी काही चेक चे व्यवहार पोस्ट किंवा कुरियर ने होतात,  त्यामुळे अश्या प्रकारचे चेक रिसिवर ला उशीरा प्राप्त होत असतात।                  D) Outdated /Stale Cheque

प्रत्येक चेक ला लिहीलेल्या तारखीच्या तीन महिन्यात क्लियर करण्याचा नियम आहे पण जर तो चेक या कालावधीत क्लियर केल्या गेला नाही तर त्याला कालबाधित झालेला किंवा  outdated चेक असे म्हणतात । अश्या प्रकारचे चेक कुठलीही बँक  accept  करत नाही ।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: