म्युच्युअल फंड – गुंतवणूकीचा उत्तम पर्याय

“मुच्युअल “  हा शब्द नेहमी आपण आपल्या फेसबुक वर बघतो,  जेव्हा पण कोणाच्या प्रोफाईल वर आपण भेट देतो आणि तो व्यक्ती जर आपल्या मित्राचा मित्र असेल तर 1 म्युच्युअल फ्रेंड असं आपल्याला फेसबुक दाखवतं तर या शब्दाचा अर्थ आहे काँमन , म्हणजे जर  A  व B हे दोघ एकमेकांना ओळखत नाही पण  जर  C हा त्यांचा दोघांचाही मित्र असेल तर C  ला  A व B यांचा म्युच्युअल फ्रेंड म्हणता येईल, म्हणजे  C  जसा  A  चा मित्र आहे तसाच तो  B  चा ही आहे म्हणून तो म्युच्युअल फ्रेंड ठरतो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्यासारख्याच अनेक लोकांचा मिळून जेव्हा फंड तयार होतो त्याला म्युच्युअल फंड म्हणतात।

म्युच्युअल फंड बाजारात येण्याचे कारण

लोक आपले पैसे वाढविण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करत होते पण त्यापैकी जास्तीत जास्त लोक हे त्या गोष्टीच ज्ञान नसल्यामुळे पैसे गमावुन बसायचे,  त्यामुळे लोकांमध्ये शेअर बाजारा विषयी नकारात्मक भावना निर्माण झाली कि शेअर बाजारात पैसे बुडतात म्हणून  , त्यामुळे आपोआपच गुंतवणूक कमी होऊ लागली व त्याचा परिणाम संपूर्ण अर्थकारणावर झाला।   संपूर्ण जगामधील देशांना विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक लागते व त्या त्या देशातील शेअर बाजार हे काम करत असतो, बाजारात गुंतवणूक झाली की उद्योगधंदे वाढतात, नोकर्‍या निर्माण होतात व विकास होतो व त्यामुळे  खुप कमी लोकांना शेअर बाजाराचे ज्ञान नसल्यामुळे एका अश्या उत्पादनाची गरज निर्माण झाली की जे ज्यामध्ये लोकांना गुंतवणूकीचे ज्ञान नसले तरीही ते योग्य त्या गुंतवणूक करून पैसे मिळवू शकतील।

दुसरे कारण म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी स्वतःचे डिमॅट  खाते उघडणे व शेयर ट्रेडिंग करणे हे थोडे खर्चिक होते,  त्यामुळे फक्त श्रीमंत लोकच अश्या प्रकारची कामे करायची त्यामुळे जे लोक अगदी कमीत कमी गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी पर्याय आवश्यक होता व म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तो पर्याय लोकांना उपलब्ध झाला ।

म्युच्युअल फंड कसे काम करते???

जी कंपनी गुंतवणूक क्षेत्रात चांगले काम करीत असते अशा कंपनीला सेबी कडून मान्यता देण्यात येते व अशा कंपन्या नवनवीन फंड तयार करतात यांना असेट मॅनेजमेंट कंपनी असे म्हणतात,  या असेट मॅनेजमेंट कंपनी ज्या व्यक्तींना गुंतवणूक क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभव आहे व ज्यांनी यापूर्वीही गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला आहे अशा व्यक्तींना फंड मॅनेजर म्हणून नियुक्त करतात,  हे फंड मॅनेजर लोकांचे पैसे एका विशिष्ट फंडात गुंतवतात व त्याचं व्यवस्थापन करतात।

फंडाद्वारे वेगवेगळ्या लोकांकडून गोळा केलेल्या रकमेलाच म्युच्युअल फंड असे म्हटले जाते।

म्युच्युअल फंडाचे प्रकार (असेटच्या आधारावर)

म्युच्युअल फंड हे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे कोणतीही गुंतवणूकीचे उत्पन्न हे दोन प्रकारचे असते ते म्हणजे एक फिक्स्ड किंवा स्थायी तर दुसरे फ्लेक्झीबल किंवा अस्थायी म्हणून आपल्याला गुंतवणूकीच्या उत्पन्नानुसार तीन मुख्य प्रकार समजून घ्यावे लागतील।

1 इक्विटी किंवा ग्रोथ फंड

ज्या फंडाचे पैसे इक्विटी किंवा कॅपिटल मध्ये लावले जाते व ज्या फंडाचे उत्पन्न अस्थायी स्वरूपाचे असते अशा फंडाला इक्विटी फंड म्हणतात,  इथे जरी उत्पन्न अस्थायी असले तरी फायदा पण भरपूर प्रमाणात होऊ शकतो कारण ज्या कंपनीत पैसा लावला जातो तिचा परफार्मंस चांगला राहिला तर चांगले पैसे मिळू शकतात,  फंड मॅनेजर हे एक्सर्ट असल्यामुळे नुकसान होण्याचे प्रमाणही कमी असते,  तरीसुद्धा हा फंड अस्थिर असल्याने नुकसान होणारच नाही याची कोणीही शाश्वती देवू शकत नाही।

2 डेब्ट किंवा इन्कम फंड

या फंडामध्ये पैसे हे  कर्जरूपाने दिले जातात, जेव्हा मोठमोठ्या कंपन्यांना पैशाची गरज पडत असते तेव्हा ते या फंडाचे पैसे कर्ज म्हणून घेतात व एका ठराविक व्याजासह परत करतात, या फंडात नुकसान होत नाही म्हणून याला इन्कम फंड म्हणतात, जरी नुकसान होत नसले तरी होणारा फायदा हा इक्विटी फंडाच्या तुलनेत कमीच असतो। जो लोक जास्त रिस्क घ्यायला तयार नाहीत त्यांच्यासाठी हा फंड एक चांगला पर्याय आहे।

3 हायब्रिड फंड

हा फंड वरील दोन्ही चे मिश्रण आहे, यामध्ये एक टक्केवारी ठरवून गुंतवणूक केली जाते उदा,  30 % इक्विटी 70% डेब्ट या प्रकारे,  टक्क्यांचे प्रमाण स्कीमनुसार कमी अधिक होऊ शकते।   

बँलेंस्ड फंड

बँलेंस्ड फंड हा हायब्रिड फंडाचाच एक प्रकार आहे, यामध्ये दोन्ही इक्विटी व डेब्ट हे समप्रमाणात 50-50% गुंतवले जातात।

हे तीन असेटच्या आधारावर असणारे मुख्य प्रकार आहेत बाकी येणारे सर्व फंड या अंतर्गतच येतात।

संरचनेच्या आधारावर प्रकार

1 ओपन एंडेड फंड

या स्कीममध्ये गुंतवणूकदार कधीही येऊ शकतो व कधीही बाहेर पडू शकतो। म्हणून याला ओपन एंडेड फंड म्हणतात।

2 क्लोज एंडेड फंड

या योजनेमध्ये गुंतवणूकदार एका विशिष्ट ठराविक अवधितच स्कीममध्ये येऊ शकतो व व ती विशिष्ट कालमर्यादा संपल्यानंतरच पैसे काढु शकतो।

3 इंटरवल फंड
ही स्कीम ओपन एंडेड व क्लोज एंडेड चे मिश्रण आहे यामध्ये दोघांच्याही काही सुविधा दिल्या जातात , या फंडामध्ये ठराविक इंटरवल नंतर गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीची सुविधा मिळते।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: