राधे विरूद्ध लक्ष्मी बाॅम्ब? कोणाची प्रतिष्ठा पणाला लागणार?

राधे विरूद्ध लक्ष्मी बाॅम्ब? कोणाची प्रतिष्ठा पणाला लागणार?

सध्या २०२० साली ईदच्या शुभमुहूर्तावर दोन बाॅलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, अर्थातच दोन्ही चित्रपटांची कमाई यावेळी स्टारडमसोबतच चित्रपटाच्या आशयावरही अवलंबून असेल याची आपण जाणं ठेवायला हवी. कारण गेल्या काही वर्षांमधे बाॅलिवूडचा प्रेक्षकवर्ग नक्कीच अधिक जागरूक झालायं असं म्हणावं लागेल. ज्या चित्रपटांनी आशय सांभाळून निर्मिती केली अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी भरगोस प्रेम दिलयं; हे मान्य करावचं लागेल. तर मुळात नुकत्याच गेल्या काही वर्षात अक्षय कुमारने स्वत:चा एक वेगळा स्टॅंडर्ड सेट केलायं, असं म्हणायला गेल्यास वावगं ठरणार नाही. अक्षय कुमारचे मागील जवळपास सलग चार- पाच चित्रपट अगदी सुपरहिट गेलेत. त्यातही महत्वाचं म्हणजे, अक्षय कुमार दरवेळी आपल्या भुमिकांना वेगवेगळ्या पैलूंवर लोकांसमोर मांडतो आहे; ही विशेष कौतुकाची बाब म्हणावी लागेल. पण दुसरीकडे अक्षयची जी जंग जुंपणार आहे ती  थेट “सलमान खान” शी .

सलमान खानने आजवर बाॅलिवूड इंडस्ट्रीत जो दबदबा कायम ठेवला आहे, त्याची बातच वेगळी. परंतु गेल्या काही चित्रपटांतून तो प्रेक्षकांवर हव्या तेवढ्या ताकदीचा प्रभाव नाही पाडू शकला. त्याला कारण चित्रपटाची कथा आणि तिचं तोडकंमोडकं ठरलेलं दिग्दर्शन. पण मुळात आता जेव्हा ईदला सलमान विरूद्ध अक्षय येणार आहेत; तेव्हा सलमानच बहुचर्चित राधे ज्याच दिग्दर्शन स्वत: प्रभू देवा करत आहे तर दुसरीकडे अक्षयचा हटके अंदाज असलेला लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपटही तेवढ्याच प्रमाणात चर्चेत आहे. याआधी सलमानने अक्षयकडे “लक्ष्मी बाॅम्ब”ची तारीख बदलण्याची गोष्ट केली होती, परंतु अक्षयच्या म्हणण्यानुसार जर आम्ही तारीख आधीच घोषित केली असेल तर ती का बदलावी? हा प्रश्न उपस्थित झाला. परंतु नंतर सलमानच्या सांगण्यानुसार ईदच्या दिवशी अक्षयशी टक्कर होण्यास सलमानचा कोणताही आक्षेप नसेल.


               सलमान खानचा ‘राधे’ आणि अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या वर्षी ईद दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकणार तर या संघर्षामुळे प्रेक्षक व त्या त्या चित्रपटांचे वितरक प्रचंड नाराज झाले होते, पण त्यात सलमानने आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सलमानने सांगितले की, “प्रेक्षकांना व वितरकांना घाबरून जाण्याची गरज नाही. चांगली गोष्ट म्हणजे रिलीजच्या वेळी बरेच लोक एकत्र येत आहेत.

ईदसारख्या मोठ्या उत्सवात तीन ते चार चित्रपटांची निर्मितीही करता येईल. कोणाच्याही चित्रपटाचा एकदुसऱ्यावर परिणाम होणार नाही.” सलमानच्या या वृत्तीमुळे प्रदर्शक-वितरक या बंधुवर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे. त्यावर मोठे वितरक अक्षय राठी म्हणाले की, जर एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट येत असतील तर ते एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. या स्केलच्या निर्मात्यांना माहित आहे की, संघर्षाच्या वेळी चित्रपटाचा व्यवसाय काय असू शकतो? सर्वात महत्वाची बाब म्हणजे राधे चित्रपटाच्या मोशन प्रेझेंटेशनवरून तरी तो तगडा अॅक्शनपट व मसाला मूव्ही असल्याचं स्पष्ट होतं आहे. मुळात राधे चित्रपटाच्या थिमने सलमानच्या मागील काही चित्रपटांवरून फरक न पाडता आगेकूच करत असल्याचं जाणवतं आहे. इकडे अक्षय कुमार जो एका ट्रान्सजेन्डर भुमिकेत असल्याच दिसतं आहे, लक्ष्मी बॉम्ब हा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेलच याबाबत दुमत नाही. परंतु सध्या या क्लॅशमुळे सलमान खानची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागल्याचं दिसतं आहे.

By kiran bandu pawar

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: