वडीलांना काही सांगायचे होते, शेवटी राहूनच गेले !!

(या कथेत लेखक ग्रामीण भागाशी निगडित असल्यामुळे वडीलांसाठी बाप असा शब्दप्रयोग केला आहे, याचा अर्थ ते वडीलांची रिस्पेक्ट करीत नाहीत असे समजू नये, त्यांचे वडीलांवर खूप प्रेम होते)

माझा बाप दिवसभर शेतात कष्ट करायचा व संध्याकाळी घरी आला की आईवर जोरात ओराडायचा गरम पाण्यासाठी, त्याच एक रोजंच वाक्य, “ए पायघाशे झालं कावो पाणी गरम?” त्याला आंघोळीसाठी गरम पाणी लागत असे म्हणून तो आला की आई सगळे कामं बाजूला ठेवून चूलीवर गरम पाणी ठेवायची।

शेतात काम करणारा माणूस पण नेहमी टापटीप पांढरे कपडे घालून राहायचा ,मला माझा बाप खुप आवडायचा मी त्याच्याशिवाय राहु शकत नसे जो जिथे जाईल तिथे त्याच्याच मागे राहायचो।   डोक्यावर केस नव्हते पण त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर हात लावायला खूप आवडायचं , ढोल पायजामा, पांढरा शर्ट आणि गळ्यात पांढरा दुपट्टा असा माझ्या बापाचा ड्रेसकोड असायचा व दिसायला पण गोरापान माझा बाप होता ।

आमच्या घरी झोपायला पूर्वी दोन खाटी होत्या, त्याला मी लहानपणी बाज अस म्हणायचो तर त्यातल्या एका खाटेवर मी बापासोबत झोपायचो, बापाची कंबर पकडुन झोपण्यात एक अलग च मजा होती।  कधी कधी तो शेतात रात्री राखणीला गेला की माझ्या झोपेची वाट लागुन जायची।  आईशिवाय राहणं मला जमत होतं पण बापाला सोडून राहणं खुप कठीण होतं।

शेवटी तो दिवस आलाचं जेव्हा बापापासून वेगळ राहण चालू झालं, गावामध्ये 7 वी नंतर शाळा नव्हती म्हणून वसतीगृहात राहायलो गेलो पण तीनही वर्षे सारखा आजारी असायचो, बापाशिवाय राहणे कठीण होते मी गावामध्ये असताना प्रत्येक वर्षी 1 ला यायचो पण 10 वी मध्ये 40 टक्के घेऊन पास झालो।  सततच्या आजारपणामुळे शरीराची वाढ झाली नाही व लहान मुले माझ्यापेक्षा मोठी दिसू लागली।

नंतर महाविद्यालयात असताना बापापासून वेगळ राहायची सवय झाली, चांगली शरीरयष्टी कमावली आणि पदवी मध्ये प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झालो ,शिक्षण पूर्ण केल्यानंतर परत गावी आलो नोकरी मिळत नव्हती म्हणून मग बापाच्या सोबत शेतात कामाला जात असे पण बापाला ही गोष्ट आवडत नसे तो म्हणायचा की “शहरात जाऊन एखादी नोकरी बघ इकडे शेतात काम करून काही भलं नाही “अस म्हणायचा ।

माझे नोकरी साठी प्रयत्न चालू होते पण माझा अभ्यास कमी पडत होता व त्याचे कारण म्हणजे मी गावामध्ये पोरांसोबत राहून दारु पिणे ,झगडे करणे अशी कामे करायला लागलो। माझा बाप ज्याला माझ्यावर खुप अभिमान होता त्याच्या कानावर ही गोष्ट पडली व तो खुप खचुन गेला। बापाने कधिच माझ्यावर हात उचलला नाही , पण माझे फालतु कामे बघुन तो निराश झाला व माझ्याशी बोलणेच बंद केले।

बाप बोलत नाही या गोष्टीचं मला खुप दुःख  झालं व अचानक कुणालाही न सांगता मी घर सोडून शहराकडे आलो,  कधी हॉटेलात तर कधी एखाद्या कंपनीत काम केलं पण बापाचा फोन आला नाही मी पण घरी गेलो नाही, अस करता करता 3 वर्षे निघुन गेली, बापाची खुप आठवण यायची व डोळ्यातून अश्रू यायचे, आपण आपल्या बापासाठी काही करू शकलो नाही याची खंत मनामध्ये सलत होती।

एक दिवस मनामध्ये ठरवलं की बापासाठी काहीतरी अस करायचं की बापाची मान ताठ झाली पाहिजे, कंपनी सोडली आणि लायब्ररी गाठली, काम करुन थोडे पैसे जमा झाले होते त्यामुळे समोरचं निदान एक वर्ष मला अडचण होणार नव्हती।

दिवसरात्र अभ्यास करायचो खूप मेहनत घेतली व एक दिवस माझ्या मेहनतीचे फळ मिळाले  ,एका नावाजलेल्या बँकेत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली ,माझा आनंद गगनात मावेनासा झाला ,असं वाटलं बापाला आतातरी भेटावं पण सततचा अभ्यास करून माझ्या शरीराची काठी झाली होती व जवलचे पैसे पण संपले होते मग विचार केला की अशा अवस्थेत बाप बघेल तर त्याला बरं वाटणार नाही म्हणून नोकरी जाइन केल्यानंतर 3 महीन्यानी दिवाळी च्या सुट्टीत घरी जायचे ठरवले।

नोकरी सुरू झाली ,पैसे आल्यावर बापासाठी मस्त नवीन शर्टपीस व पायजम्यासाठी चांगले महागडे कापड घेतले व रोज हाच विचार करायचो कि बापाशि काय बोलणार मी ,मग मनात खूप गोष्टी आठवायच्या व डोळे भरून यायचे।

माझं माझ्या बापावर एवढ प्रेम होते की जीवनात माझ्यासाठी  सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझा  बाप होता , मी बापापासुन 3.5 वर्षे दूर राहून माझं आयुष्य ते 3.5 वर्षे व्यर्थ घालवले असे मला वाटत होते ,एकदा कधी बापाची कंबर पकडुन त्याच्याजवळ झोपतो अस वाटत होतं।

एकदा असाचं दुपारी आफिस मध्ये मिटिंगमध्ये होतो तर मोबाईल सायलेंट होता,  जवळपास 2 तास मिटिंग चालली, संपल्यानंतर फोन बघितला तर माझ्या गावाकडील मित्राचे 22 मिस्ड काल होते, मी विचार केला की त्याने कधीही 2 वर्षापासून मला फोन केला नव्हता मग हा कशाला एवढे फोन करत असेल??  तसाच मग माझा अभिमान जागा झाला व विचार आला की आता मी अधिकारी झालो आहे म्हणून कदाचित हा फोन करतं असेल व मी आपल्या साहेबी विचारांमुळे त्याला फोन केला नाही।

पुन्हा परत त्याचा काँल आला तर म्हटला,” जिथेकुठे असशील तिथुन लगेच घरी ये “ आणि फोन ठेवला,  मला काही सुचत नव्हते की नेमकं काय झालं असेल कारण तो अश्या पद्धतीने मस्करी करणारा मुलगा नव्हता । मग मी माझ्या मामाला फोन केला की नेमकं काय झालं असेल म्हणून । तर मामा बोलला की “तुझ्या वडीलांना हार्ट अटँक आला आहे आणि जिथे कुठे असशील तिथुन लवकर घरी ये। “  .  मला सुचतचं नव्हत की काय करावे ते थोडा वेळ तसाचं बसून राहिलो ,ज्या बापाला भेटायचं रोज स्वप्न बघत होतो त्याची बातमी आली ती पण खुप गंभीर स्वरूपाची ,माझं स्वप्न मोडल्यासारख वाटत होतं , कोणी माझ्या डोक्यात एखाद्या लोखंडी राँड ने प्रहार केला असेल अशी अवस्था झाली व टेबलवरच ढसाढसा रडायला लागलो, हे बघून माझ्या बँकेतील मित्रांनी माझे डोळे पुसले व त्याना मी सांगिल्यानंतर एक मित्र म्हणाला, “हे बघ हार्ट अटँक आल्यानंतर पण माणूस वाचू शकतो तू वेळ न दवडता लवकर घरी जा “ त्याचे हे शब्द ऐकून मला थोडा दिलासा मिळाला व मी गावाकडे निघालो।

मी घरापासून 300 किमी दूर होतो तर घरी जायला मला दुसरा दिवस उजाडला, मला वाटलं बाप दवाखान्यात असेल पण मामांनी सरळ घरीचं बोलावून घेतलं, घराजवळ खूप गर्दी होती व सगळे लोक कोणाची तरी वाटं पाहात होते, मी गेल्यावर अचानक बसलेले उठायला लागले व मला समजायला वेळ लागला नाही ।  माझा बाप मला न भेटताच निघून गेला होता आणि एका शेवटच्या गोष्टीचा न सांगताच शेवट झाला।  सारखं मला अपराध्या सारखं वाटत होतं, व माझा बाप नजरेसमोर च जळून खाक झाला।  नंतर काही दिवसांनी मला शेतातल्या गोठयात दारुच्या रिकाम्या बाटल्यांनी भरलेली तीन पोती दिसली, तर मी विचारपूस केल्यावर समजले की माझा बाप मी घर सोडून गेल्यावर खुप दारु प्यायला लागला होता, त्यालापण माझ्यावर खुप प्रेम होते पण तो कधी बोलून दाखवत नव्हता।  मला असं नेहमीच वाटायचं की मी बापाशिवाय राहू शकत नाही पण माझ्या बापाचे ही माझ्यावर खूप प्रेम होते। आजही आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवल्या पण बापाची कमी प्रत्येक क्षणी जाणवते। ती शेवटची गोष्ट बापाला सांगायची राहुन गेली होती ती आजही मनाच्या एका कोनट्यात घर करून राहते। जर तुमच्याही मनात अशी एखादी गोष्ट असेल तर वेळ निघून जायच्या आत नक्की आपल्या बापाला सांगा,  त्याला ऐकायला छान वाटेल आणि तुम्हाला सांगायलाही।

बाप पाहिजे माझा बाप पाहिजे

घरी बोलावणारी प्रेमळ हाक पाहिजे

मुक्त जगण्याला थोडा धाक पाहिजे हरविलेला स्वप्नातला माझा बाप पाहिजे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: