शेती व्यवसायात येण्यापूर्वी या 5 गोष्टींचा आधीच विचार करा

शेतीची सुरूवात करण्यापूर्वी

जर तुम्ही शेती करायचे ठरविले असेल तर काही गोष्टी तुम्हाला पहीलेच कराव्या लागतील त्या मुद्देसूद समजून घ्या.

1  सातबारा

सर्वप्रथम आपल्या शेताचा सातबारा बघुन घ्या व आपल्या शेतावर किती लोकांची नावे आहेत ते माहीती असणे खुप महत्त्वाचे आहे कारण बरेच लोक शेतीला सुरूवात केल्यानंतर जेव्हा तुम्ही काही करायला जाता तेव्हा नातेवाईक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून जर शेतीला सुरुवात करण्यापूर्वीच वडीलांना समजवून सांगा व शेतीतील जो काही भाग तुमच्या वाट्याला वडील देणार असतील त्यावर शेती सुरु करा . कारण जास्तीत जास्त शेतकर्‍यांना आपल्या भावा बहीणीकडुनच त्रास होत असतो त्यामुळे परपरांगत शेतकर्‍यांच्या प्रमाणे  स्वतःला भांडण तंट्यात ओढवून घेऊ नका. आणि हे जर शक्य होणार नसेल तर शेतीत पडूच नका कारण याची तुम्हाला समोर खुप मोठी किंमत मोजावी लागू शकते कारण मित्रांनो जर तुम्हाला चांगला शेतकरी बनायचे असेल तर त्या गोष्टीची जबाबदारी तुम्हाला मिळणे आवश्यक आहे.

2 शिक्षण

जर तुमचे शिक्षण चालू असेल आणि दुसरीकडे नोकरी साठी प्रयत्न चालू असताना शेतीची जबाबदारी घेऊ नका, तुम्ही वडिलांसोबत काम करू शकता पण बाकी गोष्टी मध्ये मन असेल तर पूर्णकालीक शेतकरी बनू नका, जेव्हा तुम्ही मनाचा निर्धार पक्का केला असेल तरच शेतीत या,  शेतीमध्ये पण तुमच्या शिक्षणाचा भरपूर फायदा होणार आहे हे लक्षात ठेवा.

3  शेतीची कामे

शेतीमधील कामे तुम्हाला येतात काय याची खात्री करून घ्यावी नाहीतर बऱ्याच लोकांना साधे बैल पण सांभाळत नाही तर शेतीत येण्यापूर्वी या गोष्टीचं वडिलांकडून योग्य ते प्रशिक्षण घ्या कारण कोणत्याही व्यवसायमध्ये आपल्याला दुसर्‍या व्यक्तीवर अवलंबून राहता येणार नाही आणि जर असे झाले तर तुम्ही शेतीमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही.

4 शहराचे आकर्षण

बर्‍याच  युवा शेतकर्‍यांना शहरातील राहणीमानाचे आकर्षण असते ते तिकडे राहणार्‍या आपल्या मित्रांना बघुन स्वतःला कमी समजतात तर हे लक्षात ठेवा की तुम्ही स्मार्टवर्क करुन शहरातील लोकांपेक्षा ही चांगले आयुष्य जगु शकता तर मी इथे चुकीच्या ठिकाणी आलो आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका .

5 मेहनत व आरोग्य

कुठल्याही कामात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते तर शेतीत त्याहीपेक्षा जास्त लागते तर तुमची मेहनत करायची तयारी असेल तरच शेतीत यायला हवे तसेच शेती करण्यासाठी तुमचे आरोग्य चांगले आहे ना याची पण खबरदारी घ्यायला हवी.

वरील गोष्टी जर बरोबर असतील तर समजा शेतीत यायला तूम्ही यायला तयार आहात ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: