आयुष्यात नेहमी आनंदी राहायचे असेल तर……….

प्रत्येक माणुस हा आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टी मुळे दुखी  असतो,  असे क्वचितच काही लोक मिळतात जे स्वतःच्या जिवनात सुखी व समाधानी आहेत । इथे सुखी म्हणजे पैसेवाले नाही तर मनाने सुखी असणारे लोक कारण कुणाकडे भरपूर पैसा असला म्हणजे तो सुखी असतोच असे नाही ।

सुखी व आनंदी असणारे लोक हे जीवन काय आहे ते समजलेले असतात त्यामुळे ते सतत आनंदी असतात तर उलट ज्या लोकांना जीवन काय आहे हे समजलेले नसते ते लोक उगीचच फालतु गोष्टींचे टेंशन घेऊन आपले जीवन दुखी करून घेतात।  

आता मग हा प्रश्न पडतो कि आनंदी राहणारे लोक असं नेमकं काय करत असतील कि ते नेहमी खुश असतात, तर याचे उत्तर असे आहे की ते कुणाकडुनही अपेक्षा ठेवत नाहीत त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग कधीही होत नाही  ,आजच्या जगात माणसे दुखी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या कडुन ठेवल्या जाणार्‍या अपेक्षा व जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा अपेक्षा ठेवणारा दुखी होतो।

आईवडील मुलांकडून ही अपेक्षा ठेवतात की, मुलाने नाव कमवावे, खुप प्रगती करावी  आणि जेव्हा तो मुलगा नालायक निघतो व दाऊ पिऊन तमाशा करतो किंवा आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत तेव्हा त्याची आई वडील दुखी होतात। तो मुलगा कितीही प्रयत्न करत असेल तरी एवढ्या मोठमोठ्या अपेक्षा असल्याने त्याचे प्रयत्न दिसत नाहीत।  ते आईवडील असा विचार करत नाहीत कि जर त्यांनी थोडे जास्त पैसे कमावले असते तर मुलाला असे दडपणाखाली जिवन जगावे लागले नसते,  त्यामुळे सतत दुख त्यांच्या अवतीभोवती फिरत असते

जेव्हा एखादी बायको आपल्या नवर्‍याकडून एखादी अपेक्षा ठेवते कि तो तिला फिरायला नेईन, तिच्यासाठी महागाचे दागिने भेट देईल पण जर हे सगळं करण्यात नवरा असमर्थ ठरला तर ती दुखी होते व आपल्याला चांगला नवरा मिळाला नाही व आपले आयुष्य वाया गेले असे तिला वाटायला लागते पण त्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे तिचा नवरा तिच्यासाठी व मुलाबाळासाठी रात्रंदिवस काम करतो याचा तिला विसर पडतो।

तर अश्याचप्रकारे एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्यामुळे दुखावले जातात,  स्वताला सुखी व आनंदी राहायचे असेल तर माणसाने कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नये, जर आपल्याला काही पाहिजे असेल तर स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करावा,  कारण या जगात कोणीही कुणाची गुलामी करायला येत नाही,  प्रत्येकाचे शरीर, मन वेगवेगळे आहेत म्हणून दुसर्‍या चा आदर करावा व अपेक्षा सोडून द्यावी।

जो माणूस कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही तोच खरा सूखी असतो।

एकदा एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो कि ,”बाबा मी काय करू म्हणजे तुम्ही माझ्यावर खुप खुश होणार, तुम्हाला माझा अभिमान वाटेल? “

तेव्हा वडील म्हणतात, “बेटा तु खुप पैसे कमव, मग मी खुप खुश होईल व मला तुझा अभिमान वाटेल “

मग वडील मुलाला म्हणतात कि, “ बेटा तु पण सांग मी तुझ्या साठी काय करू कि तु पण माझा खुप अभिमान करशील ?“

तेव्हा मुलगाही म्हणतो कि, “बाबा तुम्ही पण खुप पैसे कमवा!! “  

पण आता प्रश्न हा निर्माण होतो कि मुलगा जवान असतो पण त्याचे वडील पूर्णपणे म्हातारे झालेले असतात ,त्यांनी वयाची साठ वर्षे पार केलेली असतात, म्हणून मूलांची अपेक्षा पूर्ण करणे हे त्यांच्यासाठी अवघड आहे  ,  सांगायचे तात्पर्य असे कि ज्या व्यक्तीकडुन आपल्याला काही अपेक्षित असते, तो व्यक्ती पण आपल्याकडून काही अपेक्षा ठेवू शकतो।
म्हणून जेव्हा म्हातारे आईवडील मुलांना शिव्या घालतात, तेव्हा मुलेही ,तुम्ही आमच्या साठी काय केले?  असे प्रतिप्रश्न विचारतात।  म्हणून आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे असेल ते स्वतःच्या जिवनात मिळवावे व कुणाकडुनही अवास्तव अपेक्षा ठेवू नये,  कारण तो प्रत्येक माणुस जो आपल्या आयुष्यात दुखी आहे त्याचे कारण म्हणजे त्याचा दुसऱ्याकडून झालेला अपेक्षाभंग ।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: