माझा बँक ऑफ बडोदा मध्ये वेल्थ मॅनेजर या पदासाठी झालेला इंटरव्ह्यू।

माझा बँक ऑफ बडोदा मध्ये वेल्थ मॅनेजर या पदासाठी झालेला इंटरव्ह्यू।

डिसेंबर 2018 मध्ये बँक ऑफ बडोदा मध्ये वेल्थ डिपार्टमेंट मध्ये भरण्यात येणाऱ्या जागांची जाहिरात आली होती,  त्यामध्ये बँकिंग क्षेत्रात काम केलेल्या लोकांकडून आवेदन मागविण्यात आले होते,  तर मी अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी तो फॉर्म भरलेला होता,  कारण सततच्या असणार्‍या कामामुळे ती गोष्ट विसरून गेलो होतो।

दिनांक 17 मार्च 2019 ला सकाळी 9 वाजता माझा पेपर होता, नेहमीप्रमाणेच सकाळी जास्त वेळ उशीरापर्यंत झोपायच्या सवयीमुळे मी रात्री झोपलो नाही कारण जर रात्री झोपलो तर सकाळी माझ्यानी उठणे होणार नव्हते व सकाळी उठून 80 किमी सेंटरवर जायचे होते।

पेपरला गेलो व माझा पेपर अतिशय चांगला गेलेला होता, मी सर्व प्रश्न तर सोडविले नव्हते पण जेवढी उत्तरे क्लिक केली ती सगळीच बरोबर होती।

नंतर काही दिवसांनी मला मोबाईल वर मेसेज आला कि मी परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणून।

लिखित परीक्षेत चांगले मार्क्स असल्यामुळे माझी मुलाखत पहिल्या दिवशी पहिल्याच बँच ला होती।

मुलाखतीचा दिवस

बँक ऑफ बडोदा च्या विभागीय कार्यालयात मुलाखत होती।  सकाळी 9 च्या माझ्या बँच ला आम्ही सगळे 18 जण होतो।

त्यांनी सर्वांना एका वेटींग रूम मध्ये बसविले व एक एक प्रमाणे डॉक्युमेंट वेरिफिकेशन व नंतर मुलाखत अशा क्रम चालू होता,  तसेच एका आयटी कंपनीचा व्यक्ती परिक्षेच्या वेळी देण्यात आलेले फिंगरप्रिंट व मुलाखती चे फिंगरप्रिंट स्कँनर द्वारे  मँच करून बघत होता कि ज्यामुळे एक गोष्ट कंफर्म होत होती कि परिक्षा दिलेलाच व्यक्ती हा मुलाखतीला आला आहे असे।

काही वेळा नंतर माझा नंबर आला व मी आत गेलो।

आतमध्ये जवळपास 7 ते 8 लोकं बसली होती,  परवानगी घेऊन आत गेलो व त्यांनी बसायला सांगितले।

1  नंतर पँनेल हेड नी ‘स्वतःबद्दल सांगा ‘ अशी सुरूवात केली

मी माझं शिक्षण आणि करियरबद्दल सांगितल्यानंतर लगेच त्यांनी विचारले कि,

2  समजा एक व्यावसायिक ज्याची सगळी कागदपत्रे बरोबर आहेत व त्याला तुम्ही लोन देत असाल तर सर्वप्रथम तुम्ही काय बघाल?

उत्तर – सर मी सर्वात पहिले त्यांचा पँन क्रमांक घेऊन त्यांचा CIBIL  स्कोर चेक करणार, त्यामुळे अगोदरच तो लोन साठी इलिजीबल आहे की नाही ते कळेल।

3  डेरिव्हेटिव  काय आहे? , आता वेगळा व्यक्ती विचारत होता ।

उत्तर – शेयर मार्केट मध्ये नफा मिळविण्यासाठी किंवा भविष्यात होणार्‍या नुकसानीपासून वाचण्यासाठी जे advance  मध्ये करार केले जातात त्याला डेरिवेटीव असे म्हणतात।

4  बीटा काय आहे?

उत्तर –  systematic risk  ज्या एककात मोजली जाते त्याला बीटा असे म्हणतात

5    हेजिंग काय आहे?

उत्तर  –  या प्रश्नाचे उत्तर येत होते पण थोडा वेळ थांबल्यामुळे त्यांनी लगेचच दुसरा प्रश्न विचारला। मी पण साँरी म्हणून समोरचा प्रश्न ऐकला।

6    बँक ऑफ बडोदाचे कुठल्या इंशुरंस कंपनी सोबत टाय अप  झाले आहे  ?

उत्तर  –  india first life  सोबत  लाइफ इन्शुरन्स साठी व  star  सोबत जनरल इंन्सुरन्स साठी टाय अप झालेले आहे  ।         ( सध्या बँक ऑफ बडोदा सोबत चोला इंशुरंस आलेली आहे पण मुलाखतीच्या वेळेस नव्हती) ।

नंतर काही सोपे प्रश्न विचारण्यात आले।

7   डिमॅट काय आहे??

उत्तर –

आनलाईन शेयर ट्रेडिंग सुविधा देणाऱ्या खात्याला डिमॅट खाते असे म्हणतात,  सुरूवातीला शेयर विकणे किंवा खरेदी करणे यामध्ये कागदपत्रांचा समावेश असायचा पण हे  आनलाइन खात्यानी ट्रेडिंग करायला कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही, म्हणून  de-materialised  या अर्थाने त्याला डिमॅट असे म्हणतात।

8  SIP काय काय आहे?

उत्तर –

SIP म्हणजे  systematic investment plan  याचा अर्थ जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार एकावेळी  lumsum payment  करू शकत नाहीत तेव्हा त्यांना महिन्याला थोडे थोडे पैसे भरण्याची सुविधा देण्यात येते त्यास  sip  असे म्हणतात।

नंतर काही वेगळे प्रश्न।

9  तुम्हाला चांगली नोकरी असताना तुम्ही इकडे का आलात ?

उत्तर –

सर प्रत्येक माणसाने आपली प्रगती करण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला हवेत असे मी मानतो व आपल्या कुवतीनुसार मोठ्या पदावर जाण्याचा सर्वांना अधिकार आहेच,  त्यामुळेच मी इकडे आलेलो आहे ।

10  आम्ही तुम्हाला ही नोकरी का द्यावी?

उत्तर  –  

मी बँक ने घेतलेली परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेली आहे, त्यामुळे मी हुशार आहेच,  शिवाय मी माझ्या करियर चे सर्व दिवस या संबंंधित क्षेत्रातच घालविलेले आहेत त्यामुळे या क्षेत्रात लागणारे सर्व ज्ञान माझ्याकडे आहे याचा तुमच्या बँकेला निश्चितच फायदा होईल व मागील जेवढ्या ठिकाणी मी काम केले आहे तिथे मला अनेक पुरस्कार माझ्या चांगल्या व स्पीडी कामामुळे मिळालेले आहेत,  शिवाय कुठल्याही परिस्थितीत मी कठीण समस्या योग्य प्रकारे हाताळू शकतो।

मला वाटते एवढी कारणे मला नोकरी देण्यासाठी पुरेशी आहेत।

इंटरव्ह्यू पँनेल मध्ये एक अशी व्यक्ती बसलेली होती जी काहीही प्रश्न विचारत नव्हती पण माझ्याकडे टक लावून बघत होती, मला असे वाटतयं कि ती व्यक्ती मी खरं बोलतयं कि खोटं बोलतोय याचं जजमेंट करत होती।

अशा पद्धतीने माझा एक नेहमीप्रमाणेच यशस्वी इंटरव्ह्यू पार पडला।

वेल्थ मॅनेजर हे पद बँकिंग मधील  investment banking  या क्षेत्राशी संबंधित आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: