हा Jr NTR चा सिनेमा एकदा बघाचं !!

साउथ इंडीयन सिनेमे हे एकदम अति अँक्शन दाखविणारे किंवा एकसारखी स्टोरी लाइन असणारे असतात असे म्हणून नेहमीच साउथ इंडस्ट्री ची मजाक उडवली जाते , ज्या बाँलीवुड मध्ये फक्त हिरोईन चे कपडे कसे कमी दाखविले जातील फक्त यावर लक्ष दिले जाते ते लोक साउथ सिनेमांना नावे ठेवतात, खरं बघायचं झालं तर त्यांची एक पिक्चर फक्त एकाच राज्यात एवढे पैसे कमविते कि बॉलीवूड मुवी सगळ्या देशात रिलीज होऊन तेवढा पैसा कमवू शकत नाही, साउथ इंडस्ट्री मधली एक गोष्ट आपल्याला  खूप आवडते ती म्हणजे ते लोक हिरोईन ला खुप छान सुसंस्कृत दाखवतात म्हणजे तिकडच्या सिनेमात काम करणाऱ्या हिरोईन अस्सल भारतीय वाटतात नाहीतर इकडच्याबद्दल बोलायचं काही कामच नाही, ते तर तुम्ही जाणताच,  बरं असो।


जेव्हा मला खुप बोर व काहीतरी मनोरंजन करूशा वाटते तेव्हा मी युट्यूबवर एक सिनेमा बघतो, हाच सिनेमा मी कदाचित 30 पेक्षा जास्त वेळा बघितला असेल व कधीही मला बोर होत नाही व एक एक सीन बघताना कमालीचा आनंद होतो।


तर या सिनेमाचं नाव आहे जनता गॅरेज हा साउथ इंडियन सिनेमा आहे व यामध्ये मोहनलाल, ज्युनिअर एनटीआर, सामंथा, नित्या मेनन यांनी काम केले आहे। मोहनलाल यांच्या बद्दल जेवढे बोलले तेवढे कमीच आहे, अस ऐकण्यात आले होते कि जेव्हा जया बच्चन यांना विचारण्यात आले की तुम्हाला कोणत्या हिरो बरोबर काम करायला आवडेल?  तेव्हा त्यांनी सांगितले कि त्यांना जर मोहनलाल यांच्या बरोबर काम करायला मिळाल तर ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप आनंदाची असेल, मोहनलाल यांना ‘द कम्लिट अँक्टर ‘ म्हणण्यात येते।

ज्युनिअर एन टी आर बद्दल काही सांगायची गरजचं नाही हा नायक अँक्शन चा बाप आहे तो जेव्हा गुंडाना मारतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट खरी वाटते,  रणबीर सिंग चा सिंबा हा एन टी आर च्याच सिनेमाचा रिमेक होता।  

सिनेमाची भारावून टाकणारी कथा आहे सोबतच अँक्शन सीन अंगावर काटे आणणारे आहेत, बाप मुलाच बिघडलेलं नातं,  आपल्या मोठ्या भावासाठी गॅरेज खोलून देणारा छोटा भाऊ, लोकांवर झालेला अन्याय न पाहू शकणारा सत्यम व आपल्या वडीलांचा मोठा भाऊ (मोठेवडील) व त्यांच्या परीवारासाठी  आपल्या प्रेमाचा हसतहसत त्याग करणारा आनंद ,व आपलं प्रेम व आपल्या वडिलांच्या विचारांच्या संघर्षात फसलेली दिया । काय कहानी आहे बाँस,  काही सीन्स बघताना प्रत्येक वेळी  डोळ्यातून अश्रू कधी वाहून जातात हे कळतचं नाही । त्याग, समर्पण व जनतेसाठी असणारे प्रेम, लोकांना मदत करण्याची वृत्ती यामुळे प्रत्येक पातळीवर हा सिनेमा मनामध्ये घर करून जातो।

युट्यूब वरती या सिनेमाचं हिंदी डब वर्जन बघुन जर इतकं छान वाटतं असेल तर ओरिजिनल भाषेत हा सिनेमा कसा वाटत असणार पण आपल्याला तेलुगू समजत नसल्यामुळे आपण हिंदीतच बघु शकतो।  

marathicinereview.co.inmarathicinereview.co.in

तर सिनेमाची कथा थोडक्यात बघुया।

सत्यमचा (मोहनलाल)  चा छोटा भाऊ हा त्याला गावाकडून शहरात हैदराबादमध्ये घेऊन येतो व त्याला एक गॅरेज उघडून देतो कारण सत्यम सुद्धा पहिलेपाहुन त्याच व्यवसायात असतो, त्यांनंतर एका मुलीवर बलात्कार करून तिला मारले जाते व ती मुलगी नेहमी आपली गाडी दुरुस्त करायला सत्यमच्या गॅरेज मध्ये येत असते पण ही घटना झाल्यामुळे सत्यमला तिच्या वडिलांकडून माहीती पडते, ते लोकं पोलिसांत जातात पण त्यांना मदत मिळत नाही तर सत्यम ला या गोष्टीची भयंकर चीड येते व तो त्या सर्व गुन्हेगारांचा वध करतो।  या सत्यमच्या प्रेमळ व मदतगार स्वभावामुळे त्याच्याकडे भरपूर लोक मदत मागण्यासाठी येत राहतात व ते जनता गॅरेज फेमस होते। सत्यम चांगले काम करण्यासाठी कुणालाही मारायला मागे पुढे बघत नसतो।  

नंतर सत्यमचा लहान भाऊ व त्याच्या पत्नीची हत्या होते, त्यामुळे सत्यम च्या भावाचा मेवणा त्याच्यावर भयानक चिडतो कारण सत्यमच्या भावाशी प्रेमविवाह केल्यामुळे त्याची बहीण मरण पावलेली असते आणि याच गोष्टीचे प्रायश्चित्त म्हणून त्यांचं दोघांचं छोट बाळ सत्यम त्या मेवण्याकडे देतो व त्याला कधीही न भेटण्याची शपथ घेतो।

नंतर तो मुलगा मोठा झाल्यावर आनंद (एनटीआर)  हैदराबादमध्ये येतो व सत्यमच्या मुलाशी त्याचा वाद झाल्यामुळे त्याची सत्यमशी ओळख होते,  व तो सत्यमसोबत जनता गॅरेज चे काम करायला लागतो,  पण सत्यमचा मुलगा हा त्याच्या पूर्ण पणे विरोधात गेलेला असतो त्याला लोकांची सेवा करणे इत्यादी गोष्टी आवडत नाहीत आणि त्यामुळे सत्यम आनंद ला ओळख नसतानाही जनता गॅरेज ची जबाबदारी देतो कारण आनंदचे आणि सत्यमचे विचार एकमेकांना पटणारे असतात, त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नसते की तो त्याच्या भावाचा मुलगा आहे म्हणून।  

नंतर कसा सत्यम आपल्या स्वतःच्या मुलाला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी कसा स्वतःच्या हाताने मारतो व आनंद कसा आपल्या वडिलांच्या मोठ्या भावाला व त्यांच्या पत्नीला आईवडीलां पेक्षाही जास्त प्रेम करतो ह्या गोष्टी खुपच हृदयाला स्पर्श करून जातात।   मुलगा मोठा झाल्यावर त्याने कसे वागावे व कशी आपल्या वडीलांची जबाबदारी समर्थपणे घ्यावी हे आनंदचे कॅरेक्टर बघून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शिकू शकतो, तसेच ज्या मुलीवर आपण इतकं प्रेम करतो आणि जर तिच्या वडिलांची इच्छा नसल्यामुळे कसा आनंद आपल्या प्रेमाचा त्याग करतो अर्थात तिचे वडील लग्नाच्या विरोधी नसतात पण आनंदच्या मारामारी मुळे आपली मुलगी विधवा होईल हीच भीती त्यांना असते।

तर सिनेमा अप्रतिम आहे जर आपल्याला वेळ असेल व चांगले काहीतरी बघायची इच्छा असेल तर नक्कीच “ जनता गॅरेज “ बघावा व त्यापासून खुप काही गोष्टी शिकाव्या ।।।।।। जयहिंद।।।।।

ते सर्व लोक ज्यांचा हा सिनेमा बनविण्यात सहभाग आहे ते खरचं अभिनंदनास पात्र आहेत।।।।।।।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: