“आठवणीतीली ती “

माणसाला जगण्यासाठी काय लागते?  प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतील जसे कोणी म्हणेल पैसा, प्रसिद्धी, कोणी म्हणेल परिवार, कुटुंब ,कोणाला प्रेम लागतं प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो व त्यानुसार जिवनात त्या त्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो ।

मी पण एक सामान्य माणूस, माझं पण तसचं होतं मी माझ्या जीवनात पैश्याला सर्व काही मानायचो अगदी या क्षणापर्यंत पण अचानक माझा विचार बदलला का ते माहिती नाही पण सध्या तरी मला असे वाटते कि पैसा माणसाला भौतिक सुख देऊ शकतो पण मनाला शांती मिळण्यासाठी जे  सुख पाहिजे ते पैसा देऊ शकत नाही।

माणसाच्या गरजा एवढ्या प्रचंड आहेत कि त्याला आपल्या वयाच्या प्रत्येक पायरीवर अलग अलग गोष्टींची गरज असते कारण वयानुसार आपल्या गरजा ह्या बदलत जातात।

बुद्धाने सांगितले आहे कि प्रत्येक दुःखाचे कारण हे तृष्णा आहे म्हणजे आपली नवनवीन गोष्टी मिळविण्याचा अट्टाहास म्हणजे तृष्णा व यासाठी च आपण सतत दुखी होत असतो।

आता माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण मी सुखी का नाही?  ज्या पैशासाठी मी अहोरात्र मेहनत केली नोकर्‍या बदलल्या, व्यवसाय केला पण तो पैसा मिळविल्यानंतर मी सुखी का नाही????

मला सतत असे वाटते काहीतरी राहुन गेलं या जीवनात करायचं किंवा ती गोष्ट का मिळाली नाही? आणि जेव्हा मिळाली तेव्हा मला तिची किंमत कळली नाही । ती राहुन गेलेली गोष्ट म्हणजे माझं प्रेम ।

एक मुलगी होती महाविद्यालयात असताना तिचे खूप प्रेम होते माझ्यावर अर्थात माझेही होतेच , ती नेहमी म्हणायची चल ना लग्न करूया।  

कधीपण काहीही करायला तयार असायची माझ्यासाठी पण तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब होती, मला नेहमी वाटायची की ती इतकी सुंदर आहे, चांगल्या घरची आहे तर नक्कीच तिला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळणार व आपण तर तिला तेवढे सुख देऊ शकणार नाही म्हणून हा विचार करून तिच्याशी बोलणे कमी केले।

त्यावेळी दुःख तर खूप होत होते पण खरे प्रेम हे आपल्या प्रेयसीच्या सुखासाठी तिचा त्याग करण्यात आहे असे वाटले कदाचित मी त्यावेळी बरोबर असेन किंवा नसेन हे सांगता येत नाही।

आज जवळ भरपूर पैसे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत पण रोज कधी ना कधी तिची खूप आठवण येते।

ती आपल्या संसारात सुखी आहे की नाही माहीती नाही पण तिला खूप चांगला नवरा मिळाला,  तो तिची खूप काळजी घेतो  ही गोष्ट जेव्हा कानावर येते तेव्हा खूप चांगले वाटते।

प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे, जेव्हा आपलं प्रेम आपल्याकडे असतं तेव्हा माणूस खूप खूष असतो आणि जेव्हा प्रेम दूर पण असतं तेव्हा ते आपल्याला चांगला माणूस बनवून जातं ।

आणि प्रेम दूर आहे म्हणून मी उगाचच देवदास सारखा दारू पित बसत नाही, मी आयुष्याचा आनंद घेतो आणि  स्वतःला धन्य समजतो की मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलयं ती खरचं किती चांगली आहे ना?  जिच्यामुळे माझं आयुष्य बदललं।

काहीतरी असेल तिच्यात म्हणून तिची आतापण मला आठवणं येतेय।

दोघांची भेट शक्य नसतानाही जे केलं जातं ते खरं प्रेम

दुसर्‍याच्या सुखासाठी स्वतःचे सुख त्याग करणे म्हणजे खरं प्रेम

वर्षानुवर्षे सुंदर आठवणीत रमवतं ते खरं प्रेम

आणि

कितीही टेंशन असूद्या जे स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातं व ओठांवर अलगद हसू फुलवतं ते खरं प्रेम।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: