वाढता अन्याय, न्यायालयांची हतबलता, आता स्त्रीनेच अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचायला हवं……

वाढता अन्याय, न्यायालयांची हतबलता, आता स्त्रीनेच प्रतिकार करावा…


                  जे काही मला सांगायचं आहे आज खऱ्या अर्थाने तर तरुणाईला एक गोष्ट गांभिर्याने सांगाविशी वाटते ती म्हणजे भलेही मुलगी कोणी असली तरी तुमचा तिच्यावर कुठलाच जोर-जबरदस्तीचा अधिकारच नसतो. सध्या जे घडत असलेल्या घटना आणि त्यांवर लेख येतात आणि त्यावरून लेखांच्या प्रतिक्रिया वाचून थक्क व्हायला होतं. हिंगणघाट प्रकरणात ज्या प्रकारे मुलीला जाळण्यात आलं ते इतकं घृणास्पद होतं की, सांगण कठीण आहे. आज मुलींना एकच सांगायचयं तुम्ही सक्षम बना तीच उत्तम बाब आहे. प्रत्येक मुलीने किंवा स्त्रीने सध्या लक्षात घ्यावं, परिस्थिती अचानक ओढावते त्यामुळे दरवेळी तुमच्या मदतीला कोणी पोहोचेलचं असं नाही, त्यामुळे स्त्रीने अशा स्थितीत अडकल्यावर न घाबरता, न डगमगता प्रतिकार करण्याची धमक दाखवली पाहिजे. ती धमक आतून यायला पाहिजे कारण त्यावेळी प्रश्न तुमच्या अब्रूचा किंवा जिवाचा असतो. आणि कोणाकोणाला आळा घालणार आहात? रोज पुन्हा एक अॅसीड अटॅक, रोज पुन्हा एखाद्या स्त्रीला मारणं, जाळणं अशा घटना घडतायेत. आपल्याकडे  गुन्ह्याला जोपर्यंत कडक आणि दहशत निर्माण करणारी शिक्षा होत नाही ना तोपर्यंत हे असले प्रकार एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या भारत देशात चालतचं राहतील. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करतोय आणि नुकताच छपाक प्रदर्शीत झाला. पण मुळात खरचं आज मला वाटतं आपण षंढ होऊन सर्व पहात राहतोय. त्या चित्रपटातून अॅसीड हल्ला झालेल्या त्या स्त्रीने किती मेहनतीने उभ केलयं स्वत:च आयुष्य; आमच्या लोकांनी ती जिद्द पहायला हवी होती ना…
          आणि काय तर एखादी पोस्ट फाॅरवर्ड, डी. पी बदलणं हे चालूच राहतयं आपल्यकडणं. मीसुद्धा अपवाद नाहीये. घरी बसून एखाद्या विषयावर बोलणं सोप्पयं. काहीतरी करावं लागेल तेव्हाच बदल दिसेल. मला वाटतं आपण मिळून सबंध आठवडे-दोन आठवडे रेल्वे बंद केल्या पाहिजेत, बसेस चा रस्ता रोको करायला हवा, संपूर्ण आठवडा एकाच मागणीवरून झटायचं ते म्हणजे शिक्षा अशा नराधमांना जोपर्यंत थरकाप उडवणारी शिक्षा होत नाही तोपर्यंत ही जनता मागे हटणार नाही असं ठामपणे एकदा करून बघायला हवंच ना आपण. मला मान्ययं आपण मोर्चे काढून काही करू शकणार नाही पण किमान काही दिवस थेट देशच बंद केला तर… ?  आणि नराधमांची थेट मुंडकीच उडवली तर…. तर दहशत बसेल ना अॅसीड हल्ला करणाऱ्यांवर आणि भर रस्त्यात मुलीला जाळणाऱ्यांवर… असं झाल तर प्रत्येक मुलाचा वा तरूणाचा हात थरथरेल…. मुळात आपल्या देशात अशा गुन्हेगारांना वकील मिळतो आणि तोच त्या गुन्हेगाचं मानसिक संतुलन बिघडल्याच्या गोष्टींचा आधार घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे किती योग्य? याचा विचारच करत नाही कधी आपण. शेवटी एकच कळकळीनं सांगणय स्त्रीला तू ऊठ आणि स्वत:च्या रक्षणासाठी स्वत:च खंबीर हो. कारण आज तुझ्या रक्षणासाठी इथे कोणीच येणार नाही कारण हा समाज पूर्णत: षंड झालाय.
              आज जवळपास कित्येक वर्षे उलटली आणि किती तारखाही उलटल्या आणि कालपरवा दिल्ली उच्च न्यायालयं म्हणालं की, दोषींना जिवंत राहू द्या काही दिवस… अरे काही लाजा वगैरे विकून खाल्यात का तुम्ही? काय कामाचे अशे निर्णय देणारे जज आणि वकील… श्रीमंताकडून अमाप पैसा घेऊन सगळीकडेच यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. ती निर्भयाची आई बिचारी धरणीवर धाय मोकलून रडते आहे आर्जव करते आहे मुलीच्या इज्जतीला लुटणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून… आणि हे कोर्ट असं जे फाशीची तारीख सरळ सरळ फेटाळून लावतं. खरचं या प्रकरणानंतर वाटतयं आज सगळी माणुसकीच संपली. कुणी एक चांगल राहिलं नाही. जनावरं काय ती असतील ती त्यांच्या विश्वात सुखी. पण एक गोष्ट सडेतोड इथून पुढे व्हायला पाहिजे ती म्हणजे, बलत्काराल्या जागीच ठेचून लोकांच्या जमावाने खूनच करून टाकावा थेट… का ठेवायचीये अशी दरिद्री घाण तुम्हाला पुन्हा पुन्हा या देशात….
मुळात निर्भयाच्या आईची हाक ऐकणारे उरलेत किती हल्ली??? का नाहीयेत ते हात आज फाशीसाठी मदतीला जे एरवी कॅन्डल मार्च काढून पळत सुटले गल्याबोळांमधून… छी आहे अशा दरिद्री निर्णयावर ज्यात बलत्काराल्या फाशी द्यायला इतकी वर्षे घालूनही अजून फाशीची तारीख बदलतचं राहिल्या जाते…
निर्भया तुझ्या आत्म्याचा शाप लागत असेल तर लाव तो शाप या देशातल्या तमाम जनतेला. ही नपुंसक झालेली जमात आहे; यांना आज मनोरंजनासाठीच आणि ट्वीस्टेड हक्कांवरूनच राजकारण करायचयं. एवढचं! आणि खरचं माफ कर ताई. न्यायालयांची ही अशी खालावलेली व्यवस्था कशी का का जिवंत आहे, तेच कळत नाही.  मागे उत्तर प्रदेशात घडलं असचं चक्क कोर्टात साक्ष द्यायला जाणाऱ्या युवतीला रस्त्यातचं संपवण्याचा प्रयत्न केला, हे किती घृणास्पद म्हणावं? मुळात हिंगणघाट नंतर औरंगाबाद, निर्भयाच्या दोषींना लवकर शिक्षा न होणं, इतर ठिकाणी अजून बलात्काराचे गुन्हे चालूच असणं काय हे? माझ्या देशात एवढी अराजकता कधीपासून माजली आहे. माझ्या देशात आजूबाजूला बघावं तर केवळ नको असलेली दरिद्री हैवाणचं उभी आहेत. देश भिकेला लागेल की काय एक दिवस अशी वेळ दिसतेयं जणू समोर.
               गेल्या काही दिवसांखाली एक ट्रेंड सुरू झाला. प्रत्येक पुरूषाने एक ट्रेन्ड सुरू केला तो म्हणजे, जवळपासच्या भागात रात्री अपरात्री एखाद्या स्त्रीवर भयंकर प्रसंग ओढावताना दिसला तर फोन केल्यावर मदत म्हणून ते तिथे जातील. पण मुळात आमलात आणताना यातल सत्य एकदा तपासा.
१) एक म्हणजे, मुलगी सर्वप्रथम संकटात तिच्या जवळच्यांनाच फोन करणार कारण ते नैसर्गिकरित्या घडून येतं.
२) दुसरं म्हणजे, तुम्ही एक किमी अथवा अर्धा किमी परिसरात पोहोचेपर्यंत जर त्या नराधमांनी तिला दुसऱ्या ठिकाणी लपवून ठेवलं तर? किंवा तुम्ही पोहोचेपर्यंत तिच्या अब्रूवर हात उठला तर?
३) त्यामुळे मुलीला सांगा तुम्ही सक्षम बनायला ती ऊलट चांगलीच बाब आहे. पण डान्स सोडून किंवा तिची आवडीचा क्लास सोडून तिला फक्त कराटे शिक हे निर्णय लादणारे तुम्ही आम्ही कोण? तिला दोन्ही गोष्टी शिकू द्या ना.
४)आज प्रत्येक मुलीने लक्षात घ्यावं, परिस्थिती अचानक ओढावते त्यामुळे दरवेळी आमच्यापैकी कोणी मदतीला पोहोचेलचं असं नाही, त्यामुळे स्त्रीने अशा स्थितीत अडकल्यावर न घाबरता, न डगमगता प्रतिकार करण्याची धमक दाखवली पाहिजे. ती धमक यायला पाहिजे कारण त्यावेळी प्रश्न तुमच्या अब्रूचा असतो. अडचणीत आल्यावर ठरवा मनाशी की आता लाथ द्यायची ती थेट समोरच्याच्या अवघड जागी, कोणी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही. तुम्ही स्वत:ची अब्रू वाचवलीत हेच मोठ समाधान असेल त्यावेळी. हे सर्व करालचं पण आणखी एक करा दरवेळी घराबाहेर पडताना तुमच्याजवळ एखादी पर्स  किंवा काही बाळगा त्यात काही तुमचं संरक्षण करतील या वस्तू ठेवा. उदा. स्माल धारधार चाकू, चटणी पुड, पेपर स्प्रे जो अडचणीत समोरच्याच्या डोळ्यात मारून तुम्हाला पळता येईल असं काहीसं.
            बाकी मुळात मला एवढचं बोलायचं होतं. बाकी सर्वस्वी विचार तुम्हीच करायला हवा. देश सक्षम बनवण्यासाठी मुलीला सक्षम राहणं, आजच्या घडीला तरी गरजेचचं आहे.

By kiran pawar

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: