आयुष्यमान खुराणा स्टारर, “शुभ मंगल ज्यादा सावधान “

शुभ मंगल ज्यादा सावधान

काल शुक्रवारी हा आयुष्यमान खुराणा स्टारर सिनेमा प्रदर्शित झाला,  यामध्ये आयुष्यमान सोबत नीना गुप्ता ,गजराज राव व जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत।

सिनेमा मुख्यतः एका विषयावर आधारलेला आहे तो विषय म्हणजे समलैंगिक संबंध ।

एका मुलाचे दुसऱ्या मुलावर असणारे प्रेम समाज स्वीकारतो का?  जेव्हा आईवडिलांना आपला मुलगा गे आहे असे माहिती झाल्यावर त्यांची अवस्था काय होते ?  इत्यादी गोष्टींचे दर्शन हा सिनेमा बघताना आपल्याला होते।

या सिनेमाला बघायला जाताना एक मनोरंजन करण्याची अपेक्षा न ठेवता जर आपण एका सामाजिक बदलाची व काहीतरी नवीन बघायची अपेक्षा ठेवली तर आपल्याला आपलसं करून टाकेल।

फक्त नुसत्या मनोरंजनाची अपेक्षा ठेवून जे प्रेक्षक जातील त्यांना हा सिनेमा अतिशय रटाळवाणा वाटेल।

कथा

ही कथा तेव्हाची आहे जेव्हा भारतात समलैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा होते पण आता तसे नाही कारण सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही असा निर्णय दिलेला आहे।

तर  कार्तिक (आयुष्यमान खुराणा)  व अमन (जितेंद्र कुमार) हे दोघे गे पार्टनर असतात व एका ठिकाणी सोबत काम करत असतात । एकदा त्यांचा एक मित्र व त्याची गर्लफ्रेंड घरून पळून जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा मित्राच्या गर्लफ्रेंड(भूमी पेडणेकर – पाहुणी कलाकार ) ला घरून पळविण्याची जबाबदारी यांच्या दोघांवर असते।  ते मित्राच्या गर्लफ्रेंड ला पळविण्यात यशस्वी तर होतात पण ते दोघं कार्तिक व अमन यांच्या मागे त्या मुलीचे वडील व त्यांचे लोकं लागतात।

अमन च्या चुलत बहीणीचे लग्न असते सुरुवातीला तर त्याची जाण्याची इच्छा नसते पण ते लोकं मागे लागल्यामुळे तो कार्तिक ला घेऊन लग्नात पोहोचतो।

लग्नाला वरात ट्रेन नी जात असते तेवढ्यात अमनचे वडील (गजराज राव)  ट्रेन मध्ये अमन व कार्तिक ला किस करताना बघतात व ही गोष्ट सगळ्यांना माहिती होते,  नंतर पुन्हा एकदा लग्न समारंभात ते किस करतात व यामुळे अमन च्या बहिणीचे लग्न मोडते ।

एक वैज्ञानिक असलेले अमन चे वडील हे सगळं मानायला तयार नसतात व ते अमन ला स्वतः मरायची भीती दाखवून एका मुलीशी लग्न करण्यासाठी तयार करतात।

ज्या मुलीशी अमन चे लग्न होणार असते ती एका दुसर्‍या मुलावर प्रेम करत असते पण तो मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने घरचे तयार होत नाहीत म्हणून ती अमन गे असताना सुद्धा त्याच्याशी लग्नाला तयार होते,  जेणेकरून ती लग्नानंतर आपल्या बॉयफ्रेंड शी संबंध ठेवू शकेल।

शेवटी लग्नाच्या दिवशी ती मुलगी अमन च्या आईचे दागिने घेऊन फरार होते व सुप्रीम कोर्टाचा फैसला येतो कि समलैंगिक संबंध गुन्हा नाही म्हणून। शेवटी घरचेपण त्या दोघांच्या अमन व कार्तिक च्या नात्याला सहमती दर्शवितात।

कार्तिक (आयुष्यमान खुराणा)  हा आपले प्रेम मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतो व प्रसंगी अमनच्या वडीलांचा मारही खातो।

हि सर्व कथा अतिशय सिरीयस विषय असूनसुद्धा दिग्दर्शकाने एका छान काँमेडी स्टाईल मध्ये दाखविल्याने बघण्यात मजा येते।

सिनेमाचे प्लस पॉईंट्स।

गजराज राव व नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा “बधाई हो” प्रमाणेच आपल्या अँक्टिंग ने चाहत्यांची मने जिंकली आहेत अमन (जितेंद्र कुमार)  च्या आईवडींलांच्या भूमिकेत ते एकदम फीट बसतात ।

गाँगल  –  गाँगल हे अमनच्या चुलत बहीणीचे पात्र आहे, प्रेक्षकांना हसविण्यात खूप मदत करते। तिचं नावं रजनी असते पण तिच्या एका डोळ्यात प्रॉब्लेम असल्याने ती नेहमीच गाँगल घालून असते म्हणून सर्वजण तिला गाँगल म्हणतात।

केशव –  हे पात्र एका अमन च्या चुलत भावाचे आहे जो सतत टँबवर काहीतरी आँनलाईन माहिती वाचून सर्वांना हसविण्याचे काम करतो,   त्याची खूप मजा येते व तो आपला सकारात्मक प्रभाव पाडून जातो।

खरं तर या सिनेमाचां खरा नायक म्हणजे या सिनेमाची कथा आहे।

म्युझिक बर्‍यापैकी आहे,  काही गाणी जुनीच रिमिक्स केलेली असल्यामुळे म्युझिक मध्ये नवीन काही नाहीच।  पण बरं आहे।

का पाहावां?

सिनेमा चांगला आहे,  काहीतरी नवीन विषय बघायला मिळेल पण यावर खूप लोक टीका ही करतील।  खरं तर मल्टीप्लेक्स व मेट्रो सिटी मधील प्रेक्षकांना सिनेमा आवडेल पण सिंगल स्क्रीन थेटर किंवा छोट्या शहरांत या विषयावर लोकं तेवढे सकारात्मक बघायला मिळत नाहीत।

पण सिनेमा चांगला आहे, पाहायला काही हरकत नाही।   फक्त मुलगा मुलाला किस करताना दाखविल्याने लहान मुलांना शक्यतो बघायला घेऊन जाणे टाळावे।

रेटिंग

कथा  ⅘

दिग्दर्शन   ⅘

म्युझिक  ⅖

अँक्टिंग   5/5

ओवरआँल चित्रपट 3/5

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: