#पृथ्वीचा अंत किती दूर?

पृथ्वीचा अंत किती दूर?

काही वर्षांपासून सतत असे बोलले जाते की पृथ्वी ज्यावर संपूर्ण मानवजातीची वस्ती आहे ती नष्ट होणार म्हणून,  या गोष्टींत बर्‍याच प्रमाणात तथ्य आहे।

अनेक वर्षांपासून विचांरवंत व वैज्ञानिक लोक या संदर्भात बोलत असतात,  काही वर्षांपूर्वी हाँलीवूड चा चित्रपट सुद्धा येऊन गेला होता ज्याचे नाव होते 2012 ।

या चित्रपटात दाखविले होते की 2012 ला संपूर्ण पृथ्वी एका नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होते व मग वैज्ञानिक लोक काही अशी जहाजे बनवितात ज्याद्वारे  सर्व संकटापासून काही लोकांना व प्राण्यांना वाचविण्यात येते व एका सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात येते।

तर खऱ्या आयुष्यात पण असे होऊ शकते का ?  तर याचे उत्तर आहे,  हो होऊ शकते  ।  पृथ्वीला काही गोष्टींचे धोके आहेत,  जर ते धोके वेळीच ओळखले गेले नाही तर पृथ्वीला संपायला वेळ लागणार नाही व संपूर्ण मानवी जीवन धोक्यात येईल।

तर जाणून घेऊया पृथ्वीला कोणत्या गोष्टींपासून धोके आहेत ते।

बाह्य धोके —  पृथ्वी हा ग्रह सौरमंडळातील ग्रहांपैकी एक आहे , तो स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो ,  सौरमंडळासारखे असे अनेक सौर मंडळ मिळून आकाशगंगा तयार होते।  व अशा अनेक आकाशगंगा अंतराळात आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे ।

तर जेव्हा अंतराळात असे अनेक ग्रह अस्तित्वात आहेत त्यामुळे काही धूमकेतू व काही ग्रहांचे तुकडे हे पृथ्वीच्या मार्गात अडथळे आणत असतात, असे खूपदा यापूर्वी घडलेले आहे, परंतू शास्त्रज्ञांना पृथ्वीला वाचविण्यात यश आले

पण जर का असा एखादा मोठा तुकडा पृथ्वीच्या मार्गात येऊन पृथ्वीवर आदळल्यास मानवजातीचे खूप मोठे नुकसान होऊ शकते।

पृथ्वीची वाढत जाणारी उष्णता –

विकासासाठी अनेक देशांचा कल उत्पादने वाढविण्यावर असतो,  त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन व प्रदूषण केले जाते परिणामी ओझोन चा थर कमी होऊन उष्णता वाढते।   या सततच्या वाढत्या उष्णतेमुळे थंड प्रदेशातील बर्फ वितळत असतो व यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो।

जर याच गतीने उष्णता वाढत राहिल्यास ओझोन थर अत्यंत कमी होईल व सुर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही।  व मानवजातीचे जगणे पृथ्वीवर अशक्य होऊन जाईल।

आंतरराष्ट्रीय वाद

अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय वाद होत असतात,  या जगाने याआधीच दोन महायुद्धे बघितली आहेत,  या युद्धां मुळे व स्वरक्षणासाठी अनेक राष्टे नवनवीन युद्ध साहित्य निर्माण करत असतात जे जगाच्या विनाशासाठी कारणीभूत ठरू शकते।   जसे की अणुबाँब,  हायड्रोजन बाँब इत्यादी।

अमेरिकेने जापानच्या ज्या शहरांत हिरोशिमा व नागासकी वर अणूबाँब टाकले होते,  आजही तिथले लोक अपंग जन्मास येतात अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात यावरून याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपल्याला कळते।

राष्टांराष्टामध्ये झालेला वाद जर जास्त प्रमाणात विकोपाला गेला तर पृथ्वीला खूप मोठे नुकसान होऊ शकते ।

लोकसंख्या वाढ

पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे व यामुळे काही गरीब देशांत अत्यंत हलाखीचे जीवन लोक जगत आहेत। जर ही लोकसंख्या वाढ अश्याच गतीने होत राहिली तर काही दिवसांनी लोकांना अन्न मिळायला खूप मेहनत करावी लागणार।  

त्यामुळे अन्न मिळविण्यासाठी साहजिकच एकमेकांना मारण्यात येईल व अराजकता माजेल त्यामुळे पृथ्वी वर भविष्यात वाद वाढण्याची शक्यता आहे।

त्याला कारण आज सर्व जगातील संपूर्ण संपत्ती काही मूठभर लोकांच्या हाती एकवटलेली आहे व जास्तीत जास्त लोक हे उपासमार, रोगराई व गरीबी च्या विळख्यात अडकलेले आहेत,  असेच जर चालू राहिले तर बहुसंख्य असलेल्या गरीबांच्या मनात श्रीमंतांविषयी राग निर्माण होईल व प्रसंगी ते जगण्याच्या संघर्षात एकमेकांना मारायलाही मागे पुढे बघणार नाहीत।

भूकंप व सुनामी

भूकंप व त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती जगाला हादरवून सोडतात व यामुळे जगाला बरेच नुकसान होते ।  ज्याप्रमाणे राग मनात धरून असलेला माणूस पलटवार करतो त्याचप्रमाणे निसर्ग आपला राग यारूपात तर बाहेर काढत नाही ना?  याचाही विचार व्हायला हवा व जे निसर्गचक्राला अडथळे निर्माण करतात असे कुठलेही प्रयोग करू नयेत ।

प्रदुषण

पृथ्वीवर जिकडेतिकडे भयानक प्रदूषण वाढलेले आहे व कोणी कुठेपण कचरा फेकून जातो।  प्लास्टिकने तर पुरता पृथ्वीची खूप वाट लावली आहे कारण हे विषारी प्लाँस्टिक कधीच सडत नाही व त्याची विल्हेवाट लावणे खूप कठीण होऊन बसले आहे । हे असेच जर चालू राहिले तर पृथ्वीवर माणसांप्रमाणे कचरा पण जागोजागी दिसेल।

आज सर्व मानवजात मिळून या गंभीर विषयावर चर्चा करणे फार गरजेचे आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: