##”वर्दी का दम” एक थ्रील आणि सामाजिक भान जागवणारा चित्रपट…!

“वर्दी का दम” एक थ्रील आणि सामाजिक भान जागवणारा चित्रपट…!

दक्षिणेमधील अ‍ॅक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर कायमच लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर हिंदी भाषेतून एक-एक दक्षिण चित्रपट प्रदर्शित होत आहेत. साऊथचा एक चित्रपट यूट्यूबवर रिलीज होण्यापूर्वीच व्हायरल होत होता. जो की नंतर “आडंगा मारू” हा चित्रपट हिंदीमध्ये “वर्दी का दम’ या नावाने रिलीज झाला. साउथ मूव्ही वर्दी का दममध्ये जयम रवी, राशी खन्ना, पन्नावनान, बाबू अँटनी, संपत राज, मुनीशांक, सुब्बू पंचू आणि माइम गोपी मुख्य भूमिकेत आहेत. जयम रविचा अ‍ॅक्शन फिल्मचा जाॅनर नक्कीच पाहण्यासारखा आहे. मुळातच जर तुम्ही साऊथच्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही एकदा हा चित्रपट अवश्य पहायलाच हवा. वर्दी का दम हा चित्रपट मागे येऊन गेला. जयम रवि आणि राशि खन्ना स्टारर या चित्रपटाला उत्तम असा आयएमडीबी चा देखील शिक्का मिळाला. या चित्रपटाने युट्यूबवर येताच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तब्बल 38 मिलीयन व्हूज क्राॅस केले या चित्रपटाने, तेही केवळ युट्यूबवर. साऊथ इंडियन चित्रपट नेहमीच त्याच्या एक्शनच्या काही आगळ्यावेगळ्या करामतींमुळे सोशल मिडीयात हसण्याचा भाग बनत राहिला असला तरी त्याला अपवाद अनेक साऊथ इंडियन सुपर असे सायकोलाॅजिकल थ्रिलर किंवा मर्डर क्राईम बेसड् थ्रिलर चित्रपटांनी नक्कीच तोडीस काढलं आहे. एवढ्या उच्च दर्जाचे दिग्दर्शन थेट पदार्पणातच कार्तिक थांगवेल यांनी “वर्दी का दम” यातून दाखवून दिलयं, हे निव्वळ त्यांचं कामाबद्दल असलेल्या डेडिकेशची कमाल व उपलब्धी म्हणावी लागेल. त्या वेळी युट्यूबवर सलग पाच चित्रपट रिलीज झाले ज्यात 12 मिलीयन व्हूज मिळवत हा चित्रपट टाॅप मने दुसऱ्या स्थानी राहिला. या चित्रपटाच्या कथेचा गर्ता फार रोचक आणि गुंतवून ठेवणारा आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक काही क्षणही दुसऱ्या इतर विचारात भरकटताना दिसत नाही. खऱ्या अर्थी इथेच एक दिग्दर्शक सार्थ ठरत असतो; असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
                     “वर्दी का दम” असं या सिनेमाचं हिंदी डब वर्जन नाव आहे. मुळात या सिनेमात असलेला अभिनेता म्हणजे “जयम रवि” जो की एक थ्रिलर आणि अॅक्शनपट अभिनेता साऊथ इंडियन सिनेमांमधून समोर आला. त्याचं मुळ नाव हे रवि मोहन असलं तरी फॅन्समधे त्याची क्रेझ ही जयम रवि या नावानेच आहे. वर्दी का दम हा चित्रपट नक्कीच आजच्या देशाच्या महिलांच्या सुरक्षेबाबतचे असलेले प्रश्न गांभिर्याने दर्शवतो. मुळात एखादं बलात्कार प्रकरण घडतं आणि त्यानंतर त्यातून कित्येक वर्षे ऊलटूनही कोर्टात न्याय मिळत नाही अशी काहीशी परिस्थिती भारतात तरी सध्या निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे, राजकारण. राजकारणी आपली एखाद्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी कोणत्या गोष्टीचा कसा वापर करून घेतील हे सांगता येणं सर्वसामान्यांना कठीणचं आहे. बऱ्याचवेळा असंही घडतं की मोठ्या घरातील अमीरबापजाद्यांचे मुलंमुली काहीतरी अघटित करून बसतात मात्र त्यांना सहजरीत्या जामिन वा सुटका मिळते. “वर्दी का दम” हा चित्रपट एक आशय आणि प्रत्येकाच्या मनात नवी उमेद जाग करण्याच काम करतो. या चित्रपटात “राशी खन्ना” ही साऊथ इंडियन सिनेमातील चिरपरिचित व सुंदर अभिनेत्रीदेखील आहे. मुळातच दिग्दर्शक “कार्तिक थांगवेल” यांच्या या चित्रपटाकरिता स्पेशली आऊट आॅफ गुण द्यावेसे वाटतात. एखाद्या चित्रपटाची कहानी तगडी असावीच परंतु शिवाय दिग्दर्शन कोणत्या दिशेने त्या कथेला न्यायं देतं, हे पाहणं तितकचं प्रभावी आणि सक्षम ठरतं, कारण अंती कॅप्टन आॅफ शीप म्हणजेच दिग्दर्शकालाच प्रेक्षकांवर चित्रपटातून प्रभाव पाडायचा असतो. मुळातच साऊथ इंडियन सिनेमांच्या पटकथेचा लहेजा बखुबी वठवण्यात या सिनेमालाही यश मिळाले आहे. तुमच्या पापण्यांची नजर जशी उत्सुकता वाढत जाते तशी खालीदेखील पापणी पडत नाही. प्रत्येक पुढच्या क्षणाला काय होईल हा उत्कंठावर्धक सिनारियो योग्यरितीने यात हाताळला आहे.
             या चित्रपटाच्या मुळ कथेकडे वळूयात. रवि हा या कथेचा नायक आहे, जो नुकताच एक सब-इंस्पेक्टर म्हणून पोलीस खात्यात दाखल झालायं. पण सुरूवातीलाच त्याला जुना इन्स्पेक्टर एक केस सहज हाताळायला पाठवतो पण तिथे रवि मात्र थेट वेगळचं कांड करून परततो. मुळात रवि हा कायद्याच्या नियमांनुसार चालनारा सब इन्स्पेक्टर आहे, त्याचं म्हणणं आहे की, जर पोलीस हा पब्लिक सर्वंट आहे तर पोलिसाने पब्लिकची आणि पब्लिकसाठीची कामे करावीत ना की, बिझनेसवाल्यांच्या वा राजकारण्यांच्या दलाल्या कराव्या. रविची एक साधी सरळ विचारसरणीची फॅमिली आहे. ज्यात आई वडील सोबतच भाऊ व भावाची पत्नी आणि त्यांच्या दोन क्यूट गोड अशा जुळ्या मुली. रवि अजून लग्न न केलेला व्यक्ती आहे. तो आपल्या कमी गरजांमधेही समाधानी राहिल असा माणूस आहे. या सगळ्या झमेल्यात त्याला एक गर्लफ्रेंडदेखील आहे, थोडक्यात ही तीच राशी खन्ना. रविची गर्लफ्रेंड अगदीच सरळ स्वभावाची आहे. म्हणजे इतरांसारख तिचं जग अजिबात नाहीये. ना कधी अधूनमधून तिने रविला छळलं किंवा रविच्या कामाच्या वेळी तिने मधीच आडकाठी आणली नाहीये. हां पण एक गोष्ट आहे, तिच्या घरी रविबद्दल सगळे जाणून आहेत. म्हणजे भविष्यातल्या लग्नाबद्दल आधी कोणालाच त्यांच्या एकत्र असण्याच्या तक्रारी अशा नाहिच आहेत.
                रवि नव्याने आपली ड्युटी सांभाळत असताना एका रात्री त्याची खटपट ही एका अमीर बापाच्या पोरासोबत होते, रविचे सिनीअर्स रविला तिथे माघार घ्यायला लावतात. पण रविचं मन तिथे शांत होतं नाही, त्याच्या म्हणण्यानुसार लोकांना लायसन्स नसने वगैरेंवरून अडवायचं आणि बड्या बापाच्या पोरांना ओव्हरस्पीड असूनही सोडून द्यायचं? मग पुढे काय? रवि थेट त्या मुलाला पबबाहेर काढून भयानक शिक्षा देत मारतो. पण त्या घटनेपासून नंतर सार काही बदलतं जातं, एका रात्री घडणारा एका मुलीचा खूण रविचं आख्ख आयुष्य पणाला लावून जातो. रविला ती केस स्वत:कडे ठेवून त्याचे धागेदोरे यशस्वीपणे लावायचे असतानाच त्याचे सिनीअर्स त्याला केसवरून काढून टाकतात. मुळात मोठ्या बिझनेसमॅन्सचे चौघेही मुले त्या रात्री झालेल्या मुलीच्या बलात्काराला व मृत्यूला जबाबदार असतात, आणि हे फक्त सर्वात आधी रविला कळतं. तो नकळतपणे पुरावे गोळा करण्याआधीच त्यांना जेलमधे टाकतो त्यानंतर मात्र खुन्नस सुरू होते. ते बलात्कारी चार ते पाच जण प्लॅन करून रविच्या फॅमिलीतल्या सर्वांना कायमचं संपवून टाकतात, जिवंत राहते ती फक्त एक रविच्या भावाची मुलगी जिने लहान वयात आपल्या कुटूंबाला मरताना पाहिलेलं असतं. त्या प्रसंगाने रविची गर्लफ्रेंडदेखील खचून जाते पण रवि मात्र त्या चार-पाच जणांना मारायचचं ठरवतो. पुढे तो त्याची ड्युटी सोडून एक साधारण मनुष्य म्हणून जगायला लागतो. हे सगळं पोलीस दलाच्या विरोधात पोलीसात राहून करता येणार नाही यासाठी त्याचा पुढील प्लॅन रेडी असतो. तो एकेका बिझनेस मॅनला त्यांच्या मुलाला तेच मारणार असं सांगून देतो. थोडक्यात बापाकरवीच अमानुष बलात्कारी मुलांचा मृत्यू अशी जबरी योजना तो आखतो. त्यानंतर पुढे चार वा पाचही जणांमधील एकेकाचं मृत्यू होणं, हा थरारका रोमांच सुरू होतो. रवि कशा प्रकारे पोलीस दल सोडून पोलीसांच्याच व बिझनेस मॅन्सच्याच डोक्याने कशा प्रकारे एकेकाची विल्हेवाट लावत जातो; खरचं हे पाहण्यासारखं आहे. या कथेतून सांगण महत्वाचं एक आहे की, जर नियम आहेत तर ते प्रत्येकासाठी एकच आहेत. का म्हणून बिझनेस वाला वेगळा किंवा का म्हणून राजकारणी अथवा सेलेब्रिटी वेगळा हे यातून घेता तर येतचं शिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बलत्कारांन्या जागीच ठार करता आलं तर किती बरं होईल, हादेखील इम्पॅक्ट हा चित्रपट आपल्यावर पाडून जातो. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे या चित्रपटाची खासीयत ही दिग्दर्शकाने दाखवली आहेच, शिवाय जयम रविने साकारलेला रवि हा अप्रतिम आहे.

कथेसाठी गुणांकन:- 4/5
अभिनयासाठी गुणांकन:- 3.5/5
दिग्दर्शन आणि मांडणी:- 4.5/5
एकूण गुणांकन:- 4/5

By  किरण पवार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: