#आणि जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

कोणीतरी आँफिसात ,”काय आडनाव तुमचे सरजी ?”

आडनाव नव्हते लागत त्याला जात हवी होती माझी

आता यंत्रणेतही जात घालून कपटीपणा दाखवता

आणि जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

कोणाच्या प्रियकरात

प्रियकराच्या प्रेमात

प्रेमाच्या पावित्र्यात

पवित्र असणार्‍या हृदयात

हृदयाच्या सौंदर्यात ,कशाला डाग दाखवता?

जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

देशाच्या राजकारणात

राजकारणाच्या निवडणूकांत

निवडणूकांच्या प्रचारात

प्रचारात येणाऱ्या मतदारांत

मतदारांच्या मनात ,कशाला जाती धर्माचे जहर पेरता

जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

गंभीर घटनांत

घटनेतील पिडितांत

पिडीतांच्या दुःखात

दुःखाच्या डोंगरात

डोंगराएवढ्या यातनांमध्ये कशाला लोकांत फूट पाडता

जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

जात धर्म करू करू देश अंधारात ढकलला

प्रगती आणि विकास मागील पायाने परतला

बेरोजगार बघा कसा उपासाने मेला

आणि शेतकऱ्याला आमच्या कर्जाने नेला

असे लोकांना गट बनवू बनवू लढवता

जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

माझी जात एकच आहे ती म्हणजे ‘भारतीय’

माझ्यासाठी माझ्या जात, धर्म इत्यादी जे काही असेल

त्याच्याअगोदर माझा देश आहे ।

जो व्यक्ती जात, धर्म बघून जर कोणाच्या जवळ जात असेल

तर त्याने आपला मेंदू निकामी झाला आहे असे समजावे।

© all rights reserved

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: