#”भूत पार्ट वन: द हाॅंटेड शीप”  भितीदायक असलेला एक उत्कृष्ट चित्रपट….

         “भूत पार्ट वन: द हाॅंटेड शीप”  भितीदायक असलेला एक उत्कृष्ट चित्रपट….

                        भूत सिनेमाची स्टारकास्ट फार उत्कृष्टरित्या निवडली गेली आहे, असं म्हणावं लागेल. कारण बहुतांशी भितीदायक अंगावर अचानक भिती उमटवून जाणाऱ्या चित्रपटांना खऱ्या अर्थाने कलाकारच्या कुशलतेची गरज लागत असते. मुळातच या चित्रपटातली भुमी असो वा विकी कौशल आणि त्याच्यासमवेतली इतर मंडळी यांनी अभियन अगदी उत्तमरित्या साकारला आहे. खऱ्या अर्थी एका बाजूला विकी कौशल याचंच कसब पणाला लागलेलं पाहून प्रेक्षकाला ठाम प्रचिती येते की हा एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अभिनेता आहे. आणि त्याने मेहनतीने या सगळ्या गोष्टी मिळवल्या असं म्हणायला हरकत नाही. “भानू प्रताप सिंह” जे या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत ते मुळातच पटकथालेखनही दर्जाच करतात आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच या चित्रपटात झाल्याच प्रेक्षकांना दिसतं आहे. या सिनेमात मीराचा पात्राचा रोल केलेल्या सारा हीनेदेखील अभिनय उत्कृष्ट केला असं म्हणता येईल. या चित्रपटाच्या एकून एक कडीवर बारीक नजर प्रेक्षकांची त्या समोरच्या पडद्यावर अशी टिपून राहते की, ती काही हलतच नाही. या चित्रपटाच्या कथेत उत्तम प्रसंगाची निर्माती केली गेली आहे. कदाचित अशा प्रसंगांना तोड देता येणार नाही. थोडक्यात सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने हा चित्रपट अगदीच प्रभावी आहे. या सिनेमाचा सर्वस्वी दर्जा हा कथा, कथानकाचा लहेजा आणि त्याला पुढे खेळवत ठेवणं यावर अवलंबून राहिला आहे. या सिनेमात गाणीदेखील प्रसंगी बखुबी दिमाखात वाजताना दिसली. परंतु त्याहीपलीकडे जाऊन आवाजाचा म्हणजेच साऊंड्सचा योग्य वापर करणं नेमकं काय असतं ते हा चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार नाही. चित्रपटाला साजेसं असं क्लास बॅकग्राऊंड म्युझीकदेखील आहे. बॅकग्राऊंड म्युझिकचा दर्जा आणि त्याचं महत्त्वही नक्कीच अलीकडे वाढलं आहे.
                 आता मुळ गाभ्यातली बाब म्हणजे, भूत या सिनेमाची कथा. भुतकाळातील चुकांची सांगड घालून पॅरलल पद्धतीने जो कलाकारांचा वावर या पडद्यावर दिसतो तो आपल्याला चित्रपटात रस निर्माण करतो. चित्रपटातील लहान मुलगी आणि तिच्याअवतीभोवती फिरत राहणारी कहानी अगदी थोड्या क्षणांसाठी आपल्याला अस्वस्थ करून टाकते. आपल्यालाच जाणवत राहतं की, काहीतरी चुकीच घडेल तर कुणीतरी ते थांबवावं. प्रेक्षक एवढ्या आत्मियतेने कथेच रूढ होतो जातो ना की, आपण थिएटरमधे बसूनही मनात सारं चालू देऊन क्षणात इथून पळूनही जाऊ असं काहीसं डोक्यात भिनवू लागतो. मुळात या सिनेमाची सारी कथा जरी दुनियेस आधीच माहित राहिली तरीदेखील ह्या चित्रपटाने प्रत्येक पुढच्या सिन्समधील सस्पेन्स एवढा राखून ठेवलायं की, तुम्ही विचारही करू शकत नाही. मुळात हॅलुसीनेशनमधे जाणारा प्रत्येकजणचं हा सायको अथवा पूर्णत: वेडा कधीच नसतो. आणि  या सिनेमाचा नायक विकी थोडक्यात “पृथ्वी” हादेखील जरा काही अंशी असा आपल्याला पहायला मिळतो. साहजिक बाब आहे जर एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही वारंवार भुताटकी वगैरे अशा गोष्टींबद्दल सांगत असाल तर तो सहज तुम्हाला खोट्यात काढणार पण विचार करा त्याने तुमच्याचसोबच भूत पाहिलं तर आणि भुताने हल्ला केला तर??? तर मग जी परिस्थिती होती ती फार हलाखीची असते. अशीच स्थिती यात पृथ्वीच्या जिगरी मित्रावर ओढावते. भूताचा जो सहवासाचा गंध असतो तो काहीसा निराळाच आणि या चित्रपटात ज्या प्रकारे त्याची दखल घेतली गेली ते पाहण्यासारख आहे.
            भूत या सिनेमाची कथा रंगलेली आहे ती सी बर्ड या जहाजावर. हे जहाज चुकून २०१२ साली मुंबईच्या समुद्रकिनारपट्टीवर येतं आणि त्यानंतर शीपींग विभागात कामाला असलेले पृथ्वी व त्यासोबतचे इतर काहीजण या जहाजाला परत समुद्रात नेण्याच्या मार्गी लागतात. परंतु हे महाकाय जहाज सहजासहजी काही केल्या परत आत नेणं शक्य होतं नाही. या कथेला भुतकाळ हा जास्त आहे, परंतु त्याचबरोबर वर्तमानात पृथ्वीला होणारा भूताकडून चलबिचल असा त्रासही भरपूर आहे. जहाजाच्या आत गेलेला पृथ्वी सुरूवातीला होणाऱ्या विचीत्र घटनांनी सुन्न पडून जातो. पण एका ठिकाणी तो खात्रीपूर्वक शोध घेतो की, या जहाजावर एका जिवंत मुलीचं आस्तित्व आहे. पण या सगळ्यात त्या जिवंत मुलीचा त्या भुताच्या आत्म्याशी संबध काय? किंवा ह्याच जहाजात त्या मुलीला नेमकं काय साध्य करायचयं असे प्रश्न पृथ्वी व त्याचा मित्र रियाझ यांच्यासमोर उभे राहतात. पण एका डाॅक्टरची मदत घेत पृथ्वी एका योग्य दिशेत शोध घ्यायला सुरू करतो. ते डाॅक्टर सांगतात की, जहाजावरील मुलगी पझेसिव्ह आहे पण ती कोणामुळे पझेस झाली हे कळणं गरजेच आहे? अन्यथा तिच्या अडचणी दूर होणार नाहीत. परंतु शेवटी पृथ्वीला भेटलेल्या एक व्हिडिओ क्लिपद्वारे त्या सी बर्ड जहाजावरील एका जिवंत व्यक्तीचा शोध लागतो, ती व्यक्ती म्हणजे वंदना. खूप वर्षे आधी जेव्हा सी बर्ड हे कॅप्टन आणि वंदनाच्या ताब्यात होतं तेव्हाची गोष्ट म्हणजे, वंदनाची मुलगी मीरा त्यावेळी अचानक गायब होते. त्यानंतर पुढे बऱ्याच घडामोडी घडतात नी त्या सी बर्डवरील अनेक लोक आत्महत्या करतात. ही कहानी समजल्यानंतर एक व्यक्ती सगळ्या गोष्टीत मीस असल्याचं दिसून आल्यावर शोध लागतो. आणि तोच व्यक्ती “भूत” बनून सी बर्डवर वावरत आहे. त्याला त्याच्या एका खास मिशनपर्यंत पोहोचण्यासाठी तो जहाजावर एका जिवंत मुलीचा सहारा घेऊन राहतोयं, हे कळतं. शेवटी डाॅक्टर, पृथ्वी, वंदना व पृथ्वीचा मित्र रियाझ एका रात्रीत त्या भूताचा माग काढत त्याच्यासमोर खडे राहतात. मुळात कथेचा शेवट खूपच इंटरेस्टिंग आहे पण तो शेवट आणि इतर कथेतील धागेदोरे तुम्हाला शोधायचे आहेत; मुळात एक गोष्ट आहे, ज्या गोष्टी हाॅंटेड असतात त्याच गोष्टी काहीशा गडबड निर्माण करणाऱ्या असतात. तेव्हा आवर्जून हा सिनेमा पहा, पण मोलाचा सल्ला एकट्याने पाहणं टाळा.

कथेसाठी गुणांकन:- 4/5
अभिनयासाठी गुणांकन:- 3.5/5
दिग्दर्शन आणि मांडणी:- 4.5/5
एकुण गुणांकन:- 4/5

नाव:- किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: