# हे नवीन खाजगी क्षेत्रातील मुले सरकारी अधिकाऱ्यांपेक्षाही करतात दहापट जास्त कमाई!!!!

हे 4 नवीन खाजगी क्षेत्रातील मुले सरकारी अधिकाऱ्यांपेक्षाही करतात दहापट जास्त कमाई!!!!

हल्ली भारतामध्ये एक फँड चालू आहे ते म्हणजे जेव्हा मुलीचा बाप आपल्या मुलीसाठी नवरा शोधायला निघतो तेव्हा एक गोष्ट त्याला पाहिजे असते ते म्हणजे त्याचा होणारा भावी जावई हा सरकारी नोकरीत असावा व याच समजुती मुळे सरकारी नोकरीत आल्यावर मुलांचे लग्न लवकर जमते।   सरकारी नोकरीत असणारी प्रतिष्ठा, मान व मुख्य म्हणजे नोकरी टिकण्याची शाश्वती यामुळे प्रत्येक मुलीला व तिच्या घरच्यांना मुलगा हा सरकारी नोकरीतलाच हवा असता,  व त्याचे उलट खाजगी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना मुली मिळायला वेळ लागतो कारण खाजगी नोकरी टिकेल कि नाही याची शाश्वती खुप कमी असते।

पण आजच्या काळात यातील काही गोष्टी बदललेल्या आहेत व करियरच्या निर्माण झालेल्या नवनवीन संधी यामुळे आपला भावी पती हा सरकारी नोकरीत नसला तरी खाजगी काम करूनही त्याहीपेक्षा दहापट जास्त पैसा कमविणारा असू शकतो।

सध्याच्या काळात अश्या काही  करियरच्या संधी आहेत ज्यामध्ये लोक भरपूर पैसा कमवित आहेत।

1 अँप डेवलपर –  

खरतरंं हे काम सॉफ्टवेअर व आयटी शी संबंधित असून या क्षेत्रात काम करणारे लोक भरपूर पैसा कमवित आहेत कारण या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांकडे स्मार्टफोन आहेत व प्रत्येक कंपन्या या आपले अँप बनवतात, जसे न्युज चॅनल, बँक, इ कॉमर्स  इत्यादी।  हे प्रोफेशनल अँप्स बनविण्यासाठी डेवलपर्स भरपूर पैसा घेतात व या सेक्टर मध्ये सध्या बूम असल्यामुळे जर तुम्हाला एखादा अँप डेवलपर मुलगा मिळत असेल तर लग्न करायला काही हरकत नाही। कारण त्याची कमाई एवढी आहे की सरकारी अधिकारी तेवढा पैसा कमवूच शकणार नाही।

2 ब्लाँगर  –

ब्लाँग किंवा वेबसाइट चालविणारे लोक हे भरपूर पैसा कमवित असतात।

एका ब्लाँगरने एक गोष्ट शेयर केली होती ती म्हणजे त्याच्याकडे भरपूर पैसा असूनही त्याचे लग्न जमत नव्हते कारण मुलीकडच्या लोकांना तो काय व कसे पैसे कमवितो हे समजत नव्हते पण तो महिन्याला 20 ते 25 लाख रूपये कमवित होता,  तर आता बोला एखादा सरकारी अधिकारी एवढा पगार कमवू शकतो काय?  हा कदाचित भ्रष्टाचार करून कमवेलही पण त्याला पकडले जाण्याची भीती राहील,  सध्या इंटरनेटवर वेगवेगळे ब्लाग लिहीणारे लोक पणं भरपूर पैसा कमवित आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातील एखाद्या चांगल्या व्यक्तीशी लग्न करून मुली सुखी संसार करू शकतात।

3   युट्यूब क्रिएटर

सध्याची जनरेशन ही युट्यूब हा प्लँटफार्म खुप जास्त बघते पण तुम्हाला माहिती आहे का हे काम करून लोक लाखो रुपये महिन्याला कमवित आहे,  ध्रुव राठी, अमित भडाना सारखे युट्यूबर महिन्याला 30 ते 50 लाख रूपये कमवितात,  आता तुम्हीच बघा कुठलीही नोकरी न करता हे लोक एवढे पैसे कमवित आहेत।

आता हे क्षेत्र भल्याभल्यांना आकर्षित करत आहे कारण बरेचसे सरकारी अधिकारी ही युट्यूब चॅनेल चालवितात

उदाहरणार्थ  – IAS  अधिकारी असलेले दीपक रावत हे एक युट्यूब चॅनेल चालवून त्यावर त्यांचे धाडसत्रांचे व कारवाई चे विडियो टाकत असतात व त्यांच्या चॅनेल वर एक मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत।

तर युट्यूबर ही  लग्नासाठी एक चांगला पर्याय असू शकतो।

4  इ कामर्स व्यावसायिक –

इ कामर्स व्यावसायिक हे ही सध्याच्या युगात करोडपती झालेले आहेत,  हे लोक आपले आनलाइन स्टोअर ओपन करून वेबसाइट व अँप च्या माध्यमातून आपला माल लोकांना आनलाइन विकतात व भरपूर नफा कमवितात आणि सध्या हे क्षेत्र खूप वाढलेलं आहे, कारण सर्व गोष्टी आनलाइन स्वस्त व घरपोच मिळतात ,तसेत किंमतीमध्ये फसवणूक होत नाही त्यामुळे ग्राहक आनलाइन माल बोलवितात म्हणून आजकाल भरपूर मुले नोकर्‍या सोडुन या व्यवसायात आली आहेत, तर हा ही भावी पती शोधण्यासाठी मुलींना पर्याय उपलब्ध आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: