#विमा पॉलिसी घेताना….

विमा पॉलिसी घेताना सामान्य लोकांना नेहमी असा प्रश्न पडलेला असतो कि term plan  आणि  endowment plan  मध्ये काय फरक आहे?  कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे  टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात।  

जीवन विमा घेणे हे ज्या लोकांवर एक कुटुंब अवलंबून असते त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण जर आपल्याला काही झाले तर आपलें कुटुंब खुप मोठ्या संकटात सापडू शकतं त्यामुळे कुटुंब प्रमुखाने जो कमवता आहे त्याने विमा पॉलिसी अवश्य काढावी ,आता तर जवळपास सर्वच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना विमा देत असतात व बँका पण नवनवीन विमे अगदी स्वस्तात आपल्या ग्राहकांना देतात ।

        आपण स्वतः जीवनविमा काढत असताना आपल्या समोर दोन पर्याय असतात 1 term plan 2 endowment plan

1 term plan   –   या प्रकारच्या पॉलिसी मध्ये आपण एक ठराविक रक्कम भरतो त्यावर मोठे इंसुरन्स कवर मिळते पण जर आपल्याला जर काही नुकसान झाले नाही तर ते पैसे परत मिळत नाहीत , ही पॉलिसी एक ठराविक काळात आपल्याला कवर देत असते त्यामुळेच याला term plan असे म्हणतात।

टर्म पॉलिसी ह्या कमी पैशात जास्तीत जास्त इंशुरंस कवर देत असतात ।।

मोठमोठ्या कंपन्या 500 रुपये महिन्याला 1 करोड insurance cover पर्यंतचे  term plans  विकत आहेत।

2  endowment plan –

Endowment plan  हे इंशुरन्स आणि गुंतवणूक या दोन्हींचे combination  असतात,  या मध्ये जर विमा धारकाला काहीही झाले नाही तर भरलेले पैसे अतिरिक्त पैश्यांसोबत परत मिळतात  ,जे टर्म पॉलिसी मध्ये मिळत नसते,  पण ह्या प्रकारात मिळणारे विमा कवर हे टर्म प्लँन पेक्षा कमी असते।

तर आपण आपली गरज ओळखून दोनपैकी एकाची निवड करू शकतो।  साधारण लोक हे पैसे परत मिळतात म्हणून  endowment plan  ची निवड करतात पण  जर आपण आपल्या कुटुंबावर प्रेम करत असाल तर  term plan  घ्यायलाही काही हरकत नाही कारण  जर आपल्याला अचानक काही झाले तर आपल्या कुटुंबाला भरपूर पैसे मिळतील व मुलांचे शिक्षण व इतर कामे आपण नसतानाही सहज होऊ शकतील।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: