#BULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी


BULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी

बैल हा शेतात काम करणारा प्राणी तो गवत खाताना अतिशय भराभरा खातो व कामही खूप करतो म्हणून एखादा माणूस जेव्हा खुप अन्न खातो तेव्हा बैलासारखे खाऊ नको असे लोकं म्हणतात, तसचं हा बैल जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या शिंगाचा वापर करून दुसऱ्यावर धावून जात असतो।  मुळात बैलाचा स्वभाव हा आक्रमक आहे , तो शांत असेपर्यंत चांगला असतो पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा आवाक्याच्या बाहेर जातो।

आणि दुसरे आहे अस्वल, हे अस्वल थोडे शांत स्वभावाचे व रेंगाळत चालणारे असते,  म्हणजे अस्वल हा बैलापेक्षा थोडा मवाळ  स्वभावाचा प्राणी आहे , तर ह्या दोन प्राण्यांच्या स्वभावावरून मार्केट मध्ये बुल मार्केट व बियर मार्केट असे शब्दप्रयोग होतात।

बुल मार्केट म्हणजे बाजारातील तेजी तर बियर मार्केट म्हणजे मंदी ।

Bull market शेअर बाजारातील तेजी दर्शविते मग ही तेजी

संपूर्ण बाजारातील राहू शकते किंवा एखाद्या शेअरची. बुल मार्केट मध्ये लोक नेहमी भाव वाढण्याची आशा ठेवून आक्रमकपणे गुंतवणूक करीत असतात ,

त्याउलट bear market म्हणजे बाजारातील मंदी असणारी स्थिती या स्थितीत investors निराशावादी असतात व आपल्याला नुकसान होईल या भीतीने गुंतवणूक करताना खुप विचार करत असतात।

काही हुशार असणारे गुंतवणूक दार हे मंदीच्या वेळीच कमी भावात शेयर विकत घेऊन या मंदीचा सकारात्मकतेने सामना करतात।।।।Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: