# सख्खा भाऊ पक्का वैरी!!

 
        आज सख्खा भाऊ पक्का वैरी ही परिस्थिती का आहे?

आजकाल श्रीमंत असो की गरीब 90 % लोक हे स्वतःच्या भावाशी दुश्मनी ठेवून आहेत,  लोकांना दुनियाभराच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतील पण स्वतःच्या घरी मात्र भावाला पक्का दुश्मन समजतात। हे असं का होते?

              या महत्वाच्या प्रश्नाचं एक महत्वपूर्ण कारण म्हणालं तर प्रॅक्टीकल लाईफ जगण्याच्या अट्टहासात भावनांचं संमिश्र गुंता करून ठेवणं आणि त्यात स्वत: अडकणं. ह्याच थेट उत्तर कदाचित कळणार नाही पण काही उदाहरण देऊन या गोष्टी समजून घेऊयात. लहानपणापासून समजा लहान आणि मोठ्या भावाने वेगवेगळा मित्रपरिवार आहे. आणि पुढे चालून आधी मोठ्याला नोकरी लागली किंवा तो स्टेबल झाला अशात जर लहान भावाला ऐन अडचणीत कोणी पैसे मागितले आणि ते पैसे मोठ्या भावाकडून घेऊन दिले तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहतं किंवा कालांतराने ज्याचे त्याचे ज्याला त्याला पैसे परत मिळतात असं समजलं. तरी काय होतं की, लहानग्या भावाबद्दल मोठा भाऊ नकळतं कोणा एखाद्या व्यक्तीला पैशांच सहज बोलून जातो तेव्हा अकस्मात का होईना तो व्यक्ति जो कोणी असेल तो थेट सल्ले द्यायला लागतो कशाला त्यांना पैशांची गरज पडली, असलं नीट विचार करा तुम्ही आजकाल काय भरौसा त्या भावाच्या मित्रावर? थोडक्यात काय तर जर आपण आपल्या व्यवहाराची गोष्ट कोणत्याही एका जवळच्या असो वा इतर कोणा व्यक्तीजवळ काढली तर तो आपल्या मनात एक इनसिक्युरिटीची भावना पेरतो. अर्थात हीच गोष्ट अनेक व्यवहारांना लागू ठरते. काहीवेळा कसं होतं, ही इनसिक्युरिटीची भावना समोरच्याच्या मनात नसताना त्याकडून पेरली जाते कारण त्यावेळी समोरच्याला तुमची जास्त काळजी असते ना की, तुमच्या पश्चात घडणाऱ्या पार्श्वभूमीची. त्यामुळे माझं म्हणणं हे आहे की, काही नाती ठराविक अंतरावर ठेवावीत. जसं की, भावाला केलेली मदत आपण कोणाला सांगायचीच नाही, हे एवढं सोप्प होऊ शकतं.
              ही गोष्ट झाली इतर अमूकतमूक नात्यांमधली नंतर गोष्ट येते ती, भावाभावांमधील नात्यात मिसळलेल्या बायकोची. अर्थात या गोष्टीत तुम्ही म्हणाल की, एखाद्या स्त्रीला गालबोट लागलं जातं पण जी फॅक्ट आहे ती अशी की, एखाद्या अवघड काळात त्या अमूकतमूक स्त्री साठी तो नवराचं जो काही तिचं सर्वस्व आहे. तिच्यासाठी नवऱ्याचा भाऊ हा नंतर आहे, आणि स्वत:च्या आयुष्यात जराशी चलबिचल सुरू झाल्यावर कुठेकुठे स्त्रीचे निर्णय ऐकण्याचं पुरूष ठरवतो. मग अशात एखाद्याबद्दल मनात साॅफ्ट काॅर्नर तयारही होतो आणि काही जवळच्यांबद्दल हार्ड वाईटशा काही भावनाही डोक्यात निवळू लागतात. मुळात पहिली गोष्ट ही की, संपत्तीचे जेव्हा भाग वगैरे करायच्या काही गोष्टी असतात तिथे समान भाग भावांच्या वाट्याला येत असले तरी त्यांच्या पत्नी एकमेकांच्या आपल्या पतीकडे सारखी एखाद्या आणखी काहीतरी हवंच्या आशेत काही ना काही बारीकसारीक आडकाठी काडून जातात, मुळात शक्यतो स्त्री इतकी बारीक नजर पुरूष ठेवत नाहीत आणि जेव्हा त्या एखाद्या मिस झालेल्या अनावश्यक गोष्टी समोर येतात तेव्हा भावाला वाटतं राहतं की, माझाचं भाऊ मला फसवतोयं. खरतरं हे वाटणं अगदी चुकीच आहे. पण मुळात दोन्ही भावांनी एकमेकांसोबत जर व्यवहार केले तर स्पष्ट मत आहे की, त्याची भनक दोघांनीही आपल्या बायकोंना होऊ देता कामा नये. मुळात ते दोघे भाऊ लहानाचे सोबत वाढलेले असतात त्यांनी एकमेकांना जीव लावलेला असतो काहींनी प्रसंगी जीव वाचवलेलाही असतो मग अशा दोघांचा गरज पडेल तिथे एकमेकांसाठी उभं राहणं गरजेचच आहे; त्यालाच आयुष्यातील कुटूंबातील अडचणींना सामना करणं म्हणावं. पण जेव्हा व्यवहार होतात तेव्हा त्याची खबर भावांव्यतिरिक्त इतर कोणाला नसता कामा नये. अगदी पत्नीलाही.
           आज सख्खा भाऊ पक्का वैरी असण्याचं कारण सगळ्यांना माहीतीये की, पैसा आहे. पैशाव्यतिरिक्त कधीतरी अशा तुरळक घटना आहेत ज्या की, स्त्री किंवा प्रेमप्रकरणातून भावांच्या वैराचं कारण ठरल्या पण त्यांची गणती जरा कमी आहे. पण प्रेमप्रकरणं शक्यतो मिटवता येतात. त्याला जरी पुढे चालून अडचणी आल्या तरी एक पर्टिकूलर पाॅईंटवर माणसाला त्याची चूक कळून येते. आता मुळात पैशांच आणखी एक सोप्प उदाहरण देतो, समजा माझं नाव उमेश आहे आणि मी अमेय साठी अक्षय या मित्राकडून पैसे घेतलेत. त्यावेळी मी अक्षयला तात्पुरतं माहित नाही होऊ दिलं की, पैसे अमेयसाठी आहेत. आणि एकवेळ माझ्यावर अशी वेळ आली की, माझ्याकडे पैसे कमी पडत आहेत पण नेमकं त्याहीवेळी अमेय मला पैसे परत करू शकत नाहीये; आता अशात समजा अमेयची परिस्थिती खूपच वाईट आहे तर चुकून त्यावेळी एखाद्या मित्राला मी म्हटलं की, यार अम्या ला टाइमिंगवर पैसे दिले त्याने आत्ता मला दिले तर बरं होईल आणि मी अक्षयचे नंतर देऊन टाकीन. यानंतर मित्राचा रिप्लायं फिक्स असणारं, तू अम्याला कशाला पैशे दिले? किंवा तू इथून पुढं कुणालाचं पैशे देत जाऊ नको. तर या अशा वाक्यांनी त्या अचानक गोत्यात सापडलेल्या माझ्या म्हणजे थोडक्यात उमेशच्या डोक्यात हेच चालणार की, इथून पुढे मी अम्याला पैशे देतचं नाही. भलेही अम्याने नंतर दिलेल्या त्यानेच डेडलाईन पर्यंत पैसे रिटर्न केले तरी नेक्स्ट टाईम जी आडकाठी मनाला एका दुसऱ्याच मित्राकडून लागली ती नंतर कधीतरी मध्ये डोकावणार आणि मी पुढील व्यवहारात अमेयला पैसे देताना आधी शंभर वेळा विचार करणारं. थोडक्यात ह्या अशा गोष्टी आहेत जिथे तुम्हाला व्यवहार नई नातं ज्या त्या व्यक्तीकडेच ती भावना ठेवता आली पाहिजे, कारण ज्या मित्राने सल्ला दिला त्याने त्यावेळी मला अडचणीत पाहूनच सल्ला दिला म्हणून त्याचं काही चुकलं असं पूर्णत: आपण म्हणू शकतं नाही किंवा अमेयने भलेही वेळेत पैसे दिलेत परंतु तरी एक निगलेक्ट करणारा अॅप्रोच तयार झालाचं ना…? त्यामुळे या वर दिलेल्या पहिल्या किंवा इतर उदाहरणांवरून एकच सांगतो, सख्खा भावाला पक्का वैरी समजायचं नसेल तशा भावनांना आधीच मनात कोणाला पेरायची संधीच तुम्ही दिली नाही पाहिजे. हे काम आपलयं की, कोणाजवळ किती आणि काय बोलायचं? मन प्रत्येकाजवळ व्यक्त करणं हे कधीकधी नव्हे, तर कधीही घातकचं आहे. त्यामुळे बघां सांगितलेलं पटलं असेल तर!

मित्रांनो आपला भाऊ म्हणजे आयुष्यात खूप मोठा आधार असतो,  कोणाचाही भाऊ कधीही आपल्या भावाबद्दल वाईट विचार करित नाही म्हणून हे नातं जपा,  या नात्याची वाट लावणाऱ्या तिसर्‍या व्यक्तीला कधीही मध्ये आणू नका,  जर बायको आग लावायचे काम करीत असेल तर तिलाही समज द्यावी,   वडीलांनी कमविलेल्या पैसा, संपत्तीसाठी जसे भांडता तसेच वडीलांनी निर्माण केलेल्या नात्याला वाचविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा।   तुमचा भाऊ जे आयुष्यात तुमच्यासाठी करू शकेल ते कोणताही व्यक्ती करू शकणार नाही।

By किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: