#विवाहबाह्य संबंध (extra marital affairs)

विवाहबाह्य संबंध (extra marital affairs)             संशय ही गोष्ट फार भयानक ठरते. लग्नानंतर काही पुरूष आपल्या स्त्रियांच्या साध्या मनमोकळ्या स्वभावावरही संशय घेऊ लागतात आणि त्यातून बरेच खटके उडू लागतात. या अनेकशा संशयाच्या घटनांनी नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरू व्हायला वेळ लागत नाही. पुरूषांचा जो मुळ स्वभाव असतो की, बारक्या गोष्टीत लक्ष न घालणे तो लग्नानंतर बायकोच्या बाबतीत बदलला जातो. हा स्वभाव बायकोच्या अगदीच बारक्या गोष्टीकडे लक्ष ठेवण्याइतपत जेव्हा येतो तेव्हा बायकोच्या मनातही आपल्या नवऱ्याबधद्दल हळूहळू संशयाचं नात तयार होण्यास सुरूवात होते. मग या सर्व झटापटीत शहरात सहसा घटना कधीकधी डिव्होर्स पर्यंत येऊन पोहोचतात तर कधीकधी नातं केवळ दोघांकडूनही भविष्यातील फायद्याकरिता टिकून ठेवलं जातं आणि दोघही आपापले शारिरीक सुख शोधू लागतात. मग लग्नाचं पावित्र्य धुडकावून जो तो बाहेर संभोगाच्या आनंदात खूश आणि कूल माईंडने जगू लागतो. मग ते नातं सरळमार्गी हळूवार रित्या मन विभक्त झालेली असतानाही चालू राहतं केवळ एक औपचारिकता म्हणून. काही वेळा बाहेरचे संबंध सर्व शारीरिक सुखासाठी ठेवून असलेली नाती ही केवळ नातेवाईक आणि घरच्यांच्या स्टेटसकडे पाहून जपली जातात. मुळातच संशय ही गोष्ट फार वाईट आहे. पण मुळात नवराबायकोने एकमेकांना विश्वासात घेणं या ठिकाणी महत्वाचं ठरतं, जे आज होतं नाही. कारण मोस्ट आॅफ सोसायटी आज इंडिपेंडट थोडक्यात अवलंबून न राहणारी आहे त्यामुळे आपण थेट आपल्याला काही देणघेणं नाही या हिशोबाने हर एक नात्यात वागत जातो नी संवाद करणं सोडून दिल्या जातं मग विश्वासात घेण्यासाठी काही मार्ग उरतचं नाहीत.
             आता आणखी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, प्रेम एकतर काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मधे लग्नाआधी प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत त्या नवऱ्याचे अथवा बायकोचे संबंध सुरू राहतात. अर्थाट शेवटी काही वर्षांच प्रेम आणि त्यात असलेली बाॅंडींग यांची सहसा विसरणं पडणं शक्य होतं नाही. पण मुळात लग्नाआधी असलेल्या प्रेमपकरणांबद्दल दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांसोबत आधीच क्लिअर केलं पाहिजे की, इथून पुढे आपण दोघेही एकमेकांचे सर्वस्व आहोत. भूतकाळ घडून गेला तर आता तो विसरून नव्याने सुरूवात करूयात. पण हे क्लिअर करताना बऱ्याचदा पुरूष मंडळी चाणाक्ष वागण्याचा प्रयत्न करून पार्टनरला गोत्यात टाकतात. आपल्या देशात काही प्रकरणात लग्नानंतरही नवऱ्याकडूनच बायकोवरदेखील बलात्कार होते, याची अनेकांना खबर नाही. मुळात अशे बलात्कार होताना बायको ही नाईलाजाने संभोग करायला लागते पण एकवेळ तिला चान्स मिळताच ती बाहेर एखाद्यावर भाळून त्याला तिचं सर्वस्व अर्पण करायला तयारच होते. अर्थात स्त्रीचं मन हे फार स्वार्थी जरी असेल तरी संभोगासारख्या महत्वाच्या गोष्टीत जर पार्टनर हा हुशार आणि प्रेमाने वागणारा असला तर स्त्री बाहेरच्या जगात इतर सुखासाठी डुंकूनही पाहत नाही. मुळात जेव्हा पार्टनरकडून हवं ते प्रेम हवी ती काळजी आणि हवं ते अटेंशन मिळतं नसेल तर साहजिक आहे स्वभावानुसार माणूस हा प्राणी मग तो पुरूष असो वा स्त्री, तो बाहेरच्या प्रेमाची व शारिरीक सुखाची अपेक्षा करायला सुरूवात करतो. दारूच्या प्रकरणातही पार्टनर्स एकमेकांना सोडून बाहेर हात मारू लागतात. कारण दारूने बऱ्याच वेळा पुरूष स्वत:वरील प्रत्येक गोष्टीत असलेला आत्मविश्वास एक प्रकारे गमावतो. आणि नंतर पुढे यातून अनेक प्रकरणं घडतात.
         लग्नानंतर बायको लाॅयल राहतं नाही, अशी बरीचशी प्रकरणे आज घडतात. या प्रकरणांना एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे, शारिरिक गरज. होय! सध्या किंवा आज लोकांना उघडउघड सेक्सबद्दल बोललेलं फारत चालत नसलं तरी सेक्स करणं किंवा होणं ही एक प्रत्येक मानसाच्या शरीराची गरज आहे. तुलनेने जर या शारिरीक गरजेचा आपण विचार केला तर स्त्रीच्या शारिरीक रचनेत आतून बरेचशे हाॅर्मोनल चेंजेस त्या मानाने लवकर होऊ लागतात. अशात बऱ्याचदा आपला नवरा हा दिनरात कामाच्या व्यापात असल्यावर त्याचा संभोग करण्यासाठी तेवढा उत्साह पत्नीसोबत टिकल्या जात नाही आणि मुळात स्त्री साठी संभोग हा योग्यरित्या परिपूर्णपणे होणं; ही बाब अत्यंत समाधानाची असते. जर यत्खचितपणे असं होतं नसेल किंवा स्त्रीला तिचं योग्य प्रकारे शारिरीक सुख मिळतं नसेल तर ती बाहेरच्या पाऊलवाटा शोधायला सुरूवात करते. लग्नानंतर म्हणायला गेलं तर प्रमाणात नवरेदेखील लाॅयल राहत नाहीत, त्यानांही बाहेरची वाट धरणं गोड वाटतं. पुरूष मंडळी जेव्हा बाहेरची वाट सोयिस्कर ठरवतात तेव्हा दोन महत्वाची कारण त्यापाठी असतात एकतर त्यांना बायकोला पाहूनचं रसभंग झाल्याची भावना त्यांच्या मनात तयार होते किंबहुना काही केसेसमधे पत्नीवरचं असलेलं “प्रेम”. होय प्रेमचं! कारण बऱ्याच पुरूषांकरिता प्रेम म्हणजे सात्विक वा निखळ ही भावना रूजलेली असते आणि ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तिच्यासोबत कधी संभोगाच्या नजरेतून तिच्याकडे पाहिलेलं नसतं आणि या कारणास्तव दोघांमधे बिनसतं. मग अशा प्रकरणातील स्रीयादेखील आपला मार्ग नव्याने शोधायला कचरत नाहीत; अर्थात अशा प्रसंगात कोणाला चूक नी कोणाला बरोबर ठरवावं, हे कळत नाही. परंतु नवराबायकोंनी परस्पर एकमेकांशी वेळ काढून सर्व बाबींबद्दल बोललं पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतं पुढच्या वाटेचं नियोजन केलं पाहीजे.
        मुळात अशा काही घडणाऱ्या गोष्टींच मूळ म्हणाल तर ते आहे; विश्वास, प्रेम किंबहुना शारिरीक सुखाच्या गरजा. आता या तिन गोष्टी सोडता इतर कोणत्याही गोष्टीमुळे आपले पार्टनर्स हे एकमेकांना सोडत नाहीत किंवा बाहेरच सुख शोधत नाहीत. त्यामुळे या बाबींवर एकच व्यवस्थित पर्याय उरतो तो म्हणजे, पार्टनर्सने एकमेकांना विश्वासात घेऊन एखादा निर्णय घेणं किंवा पाऊल टाकणं. त्यामुळे बघा जर समजलं असेल तर नक्की आमलात आणण्याचाही प्रयत्न करा.

By किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: