#तापसी पन्नूचा ” थप्पड “

#थप्पड

अनुभव सिन्हा यांचा थप्पड हा सिनेमा प्रदर्शित झाला ह्या सिनेमाने अक्षरशः मनात घर केलेलं आहे व जे लोकं सिनेमा समजतात त्यांनी ह्या सिनेमाला खूप पसंत केलेलं आहे।

प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे। काही लोकं या सिनेमाची नकारात्मक पब्लिसिटी करीत आहेत पण एक चांगला विषय म्हणून हा सिनेमा खरचं एक काहितरी नवीन स्त्रीशक्ती ची ताकद दाखविणारा आहे।

मित्रांनो भारतात पुरूष प्रधान व्यवस्थेमुळे महिलांची स्थिती सुरूवातीपासूनच महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती,  त्यांना चूल आणि मूल यातच गुंतविले जात असे , नवरा मेल्यावर सती जावे लागे असे अनेक अन्याय स्री वर होत होते पण आपल्या समाजसुधारक महापुरूषांच्या प्रयत्नामुळे स्त्रीयांना नवीन जीवन मिळाले।  

आता स्री शिकू लागली, नोकरी करू लागली,  समाजात नाव मिळवू लागली पण खरचं या स्रीला पुरूषांएवढे अधिकार मिळतात का???  हो कायदेशीर मिळत असतील ही पण घरात तिची काय अवस्था असते,  प्रत्येक गोष्ट नवर्‍याला विचारल्याशिवाय करता येत नाही,  कामावरून ऊशीर झाला की हजारो प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात,   किती मोठ्या पदावर असली तरी जणू सर्वांची काळजी घेण्याचा ठेका जणू त्या स्रीनेच घ्यावा असचं आजही पुरूषांना वाटते,

म्हणजे एका अर्थाने पुरूष आजही स्त्री पेक्षा श्रेष्ठ आहे अशीच पुरूषी मानसिकता पाहायला मिळते।

तर या सिनेमात अशीच एक छोटीशी गोष्ट दाखविण्यात आली आहे जी बघायला तर छोटीशी वाटते पण त्या गोष्टी साठी ती नायिका खूप संघर्ष करते व मी ही आजची स्त्री आहे,  माझी काहीही चूक नसताना मी कशाला सहन करू असं तीचं म्हणणं असते।

लोकं तिला समजविण्याचा प्रयत्न करतात काही तिच्या बाजूने तर काही विरूद्ध बाजूने पण ती आपल्या मतावर ठाम असते। व माघार घेत नाही।

कथा

तर तापसी पन्नू ही आपल्या नवरा आणि सासू सोबत चांगले आनंदी आयुष्य जगत असते,  ती आपल्या घरच्या लोकांची खुप सेवा करते,  काळजी घेते  व  त्यांच्याशी नीट वागते त्यांचे आयुष्य अत्यंत मस्त चाललेले असताना

अचानक एके दिवशी आँँफिसच्या पार्टीत तिचा नवरा तापसीला सर्वासमोर  एक थापड मारतो ।

हा प्रकार झाल्यानंतर तिला खुप खराब वाटतं पण ती खूप विचार करते , की माझं काहि अस्तित्व नाही का? तो मला असं कसं मारू शकतो?  व ती नंतर नवर्‍याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेते।

सर्व लोकं तिला समजविण्याचा खूप प्रयत्न करतात व नवराही माफी मागतो पण तिचा निर्णय ठाम असतो,  

आपली काहीही चूक नसताना फक्त नवरा झाला म्हणून तो आपल्याला कसे मारू शकतो हाच विचार तिच्या मनात घुसमट करत असतो।

आता काही लोकं म्हणतील की नवर्‍याला एक थप्पड मारायचा ही अधिकार नाही का?  तर मित्रांनो हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही या विषयाला कोणत्या दृष्टीने बघता,  पण दुसरीही बाजू चूक नाहीच।  

सिनेमामध्ये एक सोशल मँसेज आहे व कलाकारांनी उत्कृष्ट कामं केलेले आहे, सिनेमाचे छोटेछोटे डायलॉग अत्यंत चांगले आहेत ।

म्युझिक ठीकठाक आहे व अनुभव सिन्हा यांच डायरेक्शन कमालीचं आहे।

तर काही पुरूषी अहंकारी मानसिकता असणारे किंवा आताही स्त्री पेक्षा पुरूष श्रेष्ठ असे मानणारे लोकं या सिनेमाचा विरोध करतील किंवा काय फालतुगिरी आहे असे म्हणतील,    पण एका स्त्रीची अस्मिता जागविणारा हा चित्रपट तुम्ही नक्की बघाचं।

सिनेमा बघताना तुम्हाला फालतुचे टपोरी लोकांचा ओरडण्याचा त्रास होणार नाही कारण ज्या लोकांना सिनेमाची जाण आहे असेच लोक सिनेमा बघायला येतील।

रेटिंग

कथा 4/5

डायरेक्शन ⅘

अँक्टिंग  ⅘

म्युझिक  ⅖

सिनेमा  ⅗

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: