#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग।

राजकारणाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रंप हे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक व टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माते आहेत,  त्यांनी टी वी शो सुद्धा होस्ट केलेले आहेत व  काही हाँलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेले आहे।

डोनाल्ड ट्रंप यांच्या कडे “ the trump organisation “ नावाची रियल इस्टेट कंपनी आहे ज्याचे  trump tower नावाचे हेडक्वार्टर मँनहँटन येथे आहे , या कंपनीचे पूर्वीचे नाव elezabeth trump and son असे होते कारण ही कंपनी डोनाल्ड यांची आजी एलिझाबेथ या मुलासोबत म्हणजेच डोनाल्ड चे वडील फ्रेड ट्रंप यांच्या सोबत सांभाळत होत्या पण नंतर जेव्हा डोनाल्ड यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनीचे नाव बदलण्यात आले।

डोनाल्ड यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता ही कंपनी डोनाल्ड ची मूले सांभाळतात ।

ट्रंप यांची फॅमिली।

ट्रंप यांनी तीन वेळा लग्न केली आहेत व त्यांना पाच मुले आहेत।

  1. त्यांची पहिली पत्नी इवाना झेल्निकोव्हा या माँडेल होत्या ,  त्यांच्या पासून डोनाल्ड यांना तीन मूले आहेत ,1) डोनाल्ड जुनियर 2)इवांका  आणि 3)एरिक ।  

इवांका आताच ट्रंप यांच्यासोबत भारतात येऊन गेली होती व त्यांचे ताजमहल चे फोटो सोशल मीडियावर बरेच वायरल झाले होते । इवांका चे पती जारेद कुशनर व इवांका दोघेही राष्ट्रपती ट्रंप यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत व कुशनर यांचाही रियल इस्टेट व न्यूजपेपर पब्लिशिंग इत्यादी अनेक व्यवसाय आहेत ।

इवांका चे भाऊ डोनाल्ड जुनियर व एरिक हे वडीलांचा व्यवसाय सांभाळतात।

2)  पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर ट्रंप यांनी दुसरे लग्न 1993 मध्ये अभिनेत्री मारला मँपेल्स यांच्याशी केले

या लग्नापासून त्यांना टिफनी नावाची मुलगी आहे। ती एक माँडेल आहे।

3) नंतर 2005 मध्ये ट्रंप यांनी माँडेल मेलेनिया यांच्याशी लग्न केले त्यांच्यापासून एक मुलगा आहे ज्याचे नाव बँरन ट्रंप असे आहे।

राजकीय जीवन

ट्रंप हे सध्या रिपब्लिकन पार्टी मध्ये असले तरी त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले आहेत,  काही काळ ते डेमोक्रॅटिक पार्टी चे सदस्य होते,  1999 ते 2001 या काळात रिफार्म पार्टी चे सदस्य होते व 2011 ते 2012 या काळात इंडिंपेडंट पक्षाचे ते सदस्य होते।

डोनाल्ड यांची हेअरस्टाइल

काही लोकांचे असे म्हणणे होते कि डोनाल्ड यांचे केस नकली आहेत व ते आपले टक्कल लपविण्यासाठी नकली केसांचे विग लावतात पण बर्‍याच वेळा टीवी शो मध्ये काही लोकांनी त्यांचे केस त्यांच्या अनुमतीने ओढून बघितलेले आहेत,  तेव्हा ते खरे असल्यासा भास होतो पण नक्की खरी वस्तुस्थिती काय ते ट्रंप यांनाच माहित ।

ट्रंप यांच्या राजकारणातील महत्त्वाचे मुद्दे

डोनाल्ड ट्रंप यांचे राजकारण मागच्या निवडणूकीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित होते ते म्हणजे  ,

1 अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोकणे

2  अमेरिकन लोकांच्या नोकर्‍या वाचविणे

3 देशावरचे राष्ट्रीय कर्ज कमी करणे

4 इस्लामिक आतंकवाद संपविणे

या मुद्यावर अमेरिकन लोकांनी त्यांना भरभरून मते दिली होती।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: