#लग्न एक दृष्टीकोन…!

लग्न एक दृष्टीकोन…!

             लग्न हा विषयच तसा खास, कधी गमतीदार, कधी अचानक नकळत काहीतरी सरप्राइजेस घेऊन येणारा ठरतो. लग्नात सहसा हुंडा ही पद्धत चुकीची असते, हे आपण जाणतो. हल्ली आपल्याला भरपूर नव्या व इतर काही लग्नपद्धती माहित झाल्या, ज्यांप्रमाणे आपण लग्न ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट पार पाडतो. मुळात लग्नासाठी दोन मन जुळणं महत्वाचं असलं तरी आपण सर्वप्रथम जातगोत यातूनच पहिले सुरूवात करतो. ही गोष्ट खरी आहे. लग्नासाठी बरेच मुलं हल्ली जात पाहूनही प्रेम करतात कारण विचारलं तर सरळ सांगतात, घरच्यांना बाहेरची मुलगी नाही चालणारं. अरे! ही बाहेरची म्हणजे अमूकतमूक दोघंही वेगळ्या जातीचे एवढचं ना! पण आज हे एवढं कॅज्युअल असणं नाही चालतं कारण आम्हाला स्टेटस, रेप्युटेशन या गोष्टींची पर्वा असते. खरतरं हा समाजचं भरकटलेला आहे त्यात काय एखादं-दुसऱ्यालाच नावं ठेवणारं ना! पण जाऊद्या हे सोडून मुद्यावर येऊ. लग्न. लग्नात अनेक प्रसंग असतात ज्यात समोरच्या दोन मंडळींच एकमेकांशी नातं हळूहळू घट्ट होतं जातं. पण अशा अनेक घटनाही घडतात की, काही नातेवाईकांमधे खुसखुशीत खटके अचानक उडू लागतात. कारण शुल्लक असतात पण तरीदेखील इथे काही व्यक्तींना दोन कुटूंबातल्या महत्वाच्या व्यक्तींकडून जरासं अटेंशन मिळवायचं असतं, असं का होतं हे ज्याला त्याला ठाऊक. त्यानंतर बस्ता वगैरै या खरेदीशी आपण चीरपरिचीत असालचं. थोडक्यात काय तर खरेदीच ती. पण अशा खरेदीत कुणीतरी एक हमखास असतचं जे सगळ्यांच व्यवस्थित पार पडल्यावर काहीतरी चांगल भेटलं नाही म्हणून नाक वाकडं करून बसणारं! मग महिलांच्या खेम्यात त्याबद्दल गम्मददार चर्चा रंगून जातात. प्युअर काॅमेडी ऐकायची इच्छा झाली ना, मग बायकांच्या काही गोष्टी तुम्ही लग्न जमेपासून ते लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐकायच्या. ठहाकेवर ठहाके लावून हसला नाहीत तर…. तर काही नाही सोडा, असो. तर मुळात लग्नातले अनेक मुद्दे राहिले त्यातला महत्वाचा सांगतो मुलीकडच्यांवर लग्नात काही गोष्टी अमूकतमूक पद्धतीनेच घडल्या पाहिजेत यासाठी बऱ्याचदा दबाव टाकण्यात येतो. हे अत्यंत चुकीच आणि घाणेरड्या प्रकारतलं वर्तण असतं तरी मुलीकडचे आदेश समजून मुलीखातर प्रसंगी काहीही करायला तयार होतात; मुळात या बाबी कोणी एक्सप्लोअर करत नाही. का? कारण मुलीकडचे नंतर मागचं विसरून जातात आणि मुलाकडच्यांना गरज उरत नाही.
               लग्न जवळून न्याहाळत असताना एक त्रयस्त व्यक्ती म्हणून जेव्हा कधी तुम्ही दोन्ही बाजू वर आणि वधू शांत व बारकाईने तपासता तेव्हा पहिल्याच क्षणी वाटतं मुळातचं हे लग्न होतयं कशासाठी आणि का? सध्याच्या जनरेशनची काही मुलं थेट लग्न न केलेलं बरं असाच स्टॅंड काही दिवस घेऊन वावरतात पण आई-बाबांच्या काही गोष्टींपुढे त्यांना नमतं घ्यावचं लागतं. तुम्ही लग्न करताना एक योग्य दृष्टीकोन बाळगला पाहिजे जसं की, उदाहरणार्थ. शहरात राहणारा तो आणि ती यांना दोघांनाही नोकरी आहे. पण जेव्हा कधी एखाद्या जाॅबची शिफ्ट चेंज असेल तर घरातल्या दोघांपैकी एकाने एखाद्या वेळेला कामावर जाण्याआधी नवऱ्याने हलकासा चहा करून बायकोला दिला किंवा बायकोने सकाळचा नाश्ता करून नवऱ्याला दिला तर अशाने घरातलं वातावरण कायम शांत व आनंदी राहतं. कारण बायको जी आपली सहचारिणी असते तिला तुमच्याकडून फार काही मोठ्या अपेक्षा नसतातं, तेच जर तुम्ही छोट्या-मोठ्या कृतींमधून बायकोवर प्रेम दाखवत राहिलात तर बायको कायम समाधानी राहिलं आणि त्यात तुमचे घरात कधी वाद होण्याचे प्रकारही घडणार नाहीत, मग अशाने सगळं स्थिर राहिलं. मुळात आज ना प्रत्येक नात्यात प्राॅफीट आलं, पैशाचा विचार आला, काही अंशी  बायकोचं माहेरी हळूच नवऱ्याच्या नजरेखालून पैशांची मदत करणं आलं थोडक्यात यांसारख्या अनेक बाबींनी लग्नासारख्या नात्याची गम्मत घालवून टाकली. आणखी एक म्हणजे हल्ली अलीकडे होतयं असं की, नवरा बायको हे आधी परस्परांशी आमनेसामने बोलायचे, चेष्टा – मस्करी करायचे, लहानसे वाद- विवाद आणि मग रूठणं- मनवनं यायचं. पण हल्ली तेवढी सिंम्पीसिटी खरचं उरलीये का एखाद्या नात्यात याचा विचार करावा लागतोयं. हल्ली लग्नाच्या एक ना एक गोष्टीचं भांडवल करून टाकल्याप्रमाणे गत झालिये. आणि या सगळ्यात कधीकधी मुलगा आपल्या आईवडीलांच्या काही निर्णयाविरूद्ध स्वत:चा स्टॅड घेऊ शकत नाही, ही आठकाठी काही अंशी भरपूर मॅटर क्रिएट करते. पण मुलांना समजलं पाहिजे की, काही बाबी आपण आईवडीलांना समजावल्या पाहिजेत, आपण त्यांना समजावू शकतो. पण अशावेळी इमोशनल हत्यारं अफाट प्रमाणात डोकं वर काढतात. तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे न भरकटता समोरच्या स्थितीला हाताळणं जमलं पाहिजे. लग्नाबद्दलचा सर्वात महत्वाचा आजचा हटके दृष्टीकोन म्हणालं तर तो हाच की, आजकाल मुलीदेखील हुंडा घेत आहेत. काही मुलींकडून सर्सार मुलांची पिळवणूकही झालेली आहे. अर्थात या बाबी प्रतिष्ठेच्या खोट्या पदराखाली झाकून राहिल्या जातात एवढचं काय ते नवलं! पण एक गोष्ट आहे, मुलींकडून हुंडा इनडायरेक्टली व साॅफ्ट काॅर्नर राखून घेतल्या जातो, ज्याची भनक सहजासहजी लागणं जरा कठीण आहे कारण इथे मुलींकरवी भावनांच भांडवल करून त्याचा फायदा घेतला जातो. मुळात लग्नाच पावित्र्य आणि लग्नाची खरी गम्मत, लग्नाची खरी व्याख्या हे सर्व परतायला हवं एवढचं.

लेखक -किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: